Skip to main content

दिवाळीचे विष्णूपूजन !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आली दिवाळी ! आपण नेहेमीप्रमाणेच लक्ष्मीपूजन करणार. तसेही आपण एरवी लक्ष्मीचीच पूजा-अर्चना करत असतोच. लहानपणापासून ह्या ना त्या स्वरूपात आपलं लक्ष्मीपूजन सुरूच असतं. बालपणी आपण परीक्षेतल्या मार्क्सरूपी लक्ष्मीच्या मागे धावतो. मग चांगल्या कॉलेजच्या, मग नोकरी, प्रमोशन, चांगला जोडीदार, चारचाकी गाडी, ३ बीएचके फ्लॅट, मुलांसाठी प्रतिष्ठित शाळा, सेकंड होम... ही यादी न संपणारीच असते. पण म्हणतात ना... लक्ष्मी चंचल असते. तिच्या मागे लागणार्‍याच्या हातात ती कधीच सापडत नाही. मग लक्ष्मी असते कुठे? लक्ष्मी असते भगवान विष्णूच्या चरणांशी.

पुणे तिथे काय उणे- (२nd होम) जागा सुचवा.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 01/11/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.

" दि पा व ली च्या हा र्दि क शु भे च्छा "

मला पुणे खूप आवडते. मुंबई च्या मानाने थोडे शांत जीवन कसली घाई नाही, सावकाश, आणि ट्रेनचे वेळा पत्रक सांभाळायला नको.

चलती का नाम कोरोला...

लेखक जुईचे फूल यांनी शुक्रवार, 01/11/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर मधली कुठल्यातरी वीकेंड ची कुठली तरी सकाळ... मी नेहमी प्रमाणे हिंदी सिनेमातल्या बायका कश्या नवऱ्याआधी उठून आटोपून वगैरे बसतात... तश्शी सगळं आटोपून व्हॉट्स ऍप वरचे मेसेजेस वाचत बसले होते. अश्याच एका ग्रूप मध्ये मैत्रिणीने लिहिले होते, "नवरा गाड्या बघायला गेलाय, मुलं पण अजून उठली नाहीत, एकटीच आहे, बोअर होतय." तो मेसेज वाचला मात्र आणि तिथे खरी ठिणगी पडली. मी तो मेसेज जसाच्या तसा स्त्रीसुलभ आणि त्यातही पत्निसुलभ लाडिक जिव्हाळ्याने बाजूलाच आढारलेल्या नवऱ्याला ऐकवला. "आपण इथे येऊन झाली की आता दोन वर्षं! कधी घ्यायची गाडी?" नवऱ्याने एक दिर्घ श्वास घेतला.

दीपावली

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 01/11/2013 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 3053 public://devi.jpg 3052 public://Diwali_2013_Saarthbodh.jpg

दिवाळी अंकः तुमची शिफारस

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 01/11/2013 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘दिवाळी अंक’ हे आपल्या दिवाळीचं आणि मराठी संस्कृतीचं अविभाज्य अंग. १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’ प्रसिद्ध झाला. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा काळाच्या ओघात नामशेष झाली नाही हे विशेष. २०१२ मध्ये ८०० पेक्षा जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याची बातमी वाचल्याचं आठवतं. याच्या सोबत आता ‘ई दिवाळी अंक’ पण मोठ्या संख्येने निघत आहेत. बाकी महागाई वाढली तशा दिवाळी अंकांच्या किमतीही वाढल्या आहेत. मर्यादित बजेटमध्ये काही ठराविक दिवाळी अंक घेता येतात. ज्यांना वाचनालयात दिवाळी अंक मिळतात ते कदाचित अधिक दिवाळी अंक वाचत असतील.

दीपावली चे मागणे

लेखक sश्रिकान्त यांनी गुरुवार, 31/10/2013 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाचा झरा, प्रकाशाचा पाऊस, प्रेमाची रीमझीम, नातीगोत्यांचा संगम, लष्मीचा व्रषाव, समाधानाचा कीनारा, जीवनाचे वाहणे, कधी न थांबणे, मीसळपावकरांची दीवाळीं, आनंदी जावों, दीपावलीचे हे एकच मागणे.

गव्हाणी घुबडाच्या घरात.... समारोप..!! They are back...!!

लेखक गवि यांनी गुरुवार, 31/10/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा धागा भरुन वहायला लागला. घुबडाच्या न बांधलेल्या गबाळ्या घरात खूप जणांना डोकावण्याची उत्सुकता दिसली. नवीन प्रतिसाद शोधणं त्या धाग्यात कठीण झाल्याने हा आणखी एक धागा तयार करतोय. अजूनही चार अंडी शिल्लक आणि तीन पिल्लं बाहेर आहेत. चौथं पिल्लू बाहेर यायला विसरलंय की काय ??! पहिलं पिल्लू प्रचंड मोठं झालंय (तुलनेतच अर्थात). तिन्ही पिल्लांचे डोळे उघडले आहेत. यात गंमतीशीर प्रकार असा की सर्वात लहान पिल्लू (टिल्लू) हे सर्वात मोठ्या भावंडाला (दादा म्हणू) पकडून राहतंय.. जिकडेतिकडे दादाच्या प्रोटेक्शनमधे. ते जणू दादालाच आई आणि रक्षक समजतंय. घाबरलं की दादाला चिकटतं..

पुरातनासोबत काही क्षण : मध्यप्रदेशातील मितावली आणि पडावली मंदिरे

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 31/10/2013 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
मध्य प्रदेशातील चंबळ खोर्‍यात अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यापैकीच ह्या दोन जागा : मितावली आणि पडावली. नुकतीच इथल्या प्राचीन मंदिरांना भेट दिली. यापैकी नवव्या शतकातील बांधकाम असलेले मितावली येथील वर्तुळाकार मंदिर अजूनही बरेच सुस्थितीत आहे. आपल्या संसदेची वास्तू या मंदिराची प्रेरणा घेऊन बांधण्यात आली असे मानण्यात येते. छोट्या टेकडीवर स्थित मितावली थोडे दुर्गम भागातच आहे. ग्वाल्हेर - कानपुर हायवेवर १० किमीनंतर हायवे सोडल्यावर, पुढील २५ किमीचा रस्ता बरेच ठिकाणी खचलेला आहे. मात्र सभोवतालचे दृश्य रस्त्याबद्दलच्या वैतागाला थोडे सुसह्य करते.