(७२ मिनिटांचा हिशोब - पुरूषही काही कमी नाहित)
रविवारची सकाळ. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.
तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार.
तर ऐका,
आपले वाचा,
" भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात. "
बसला ना झटका...!!
असेच आणखी दोनचार झेलायची तयारी करून खाली सविस्तर वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------
आधुनिक भारताच्या अत्यानुधिक महिलांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारे वृत्त -
वृत्तसंस्था, झुमरीतलैया
भारतीय महिला दिवसभरात भारतीय पुरुषांच्या तुलनेत सरासरी ७२ मिनिटे अधिक कार्यालयीन काम उपसत असल्याचे एका गुप्त सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक शहरात हीच बाब कमी-अधिक फरकाने अधोरेखित झाली आहे. "नारी शक्ती तिथे युक्ती अन पुरुषांपासून मुक्ती" हे ब्रीदवाक्य असलेल्या "सखी तू होऊ नकोस दुखी" या संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात भारतभर महिला मनुष्यबळाचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
(बातमी इथेच थांबली असती तर काही प्रश्न नव्हता, पण तिच्या उत्तरार्धात पत्रकारसखीने खास बायकांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोमणा मात्र संभाव्य धोक्याची चाहूल देणारा होता... तर ऐका... आपले वाचा...)
कामाच्या बाबतीत भारतीय पुरुष भारतीय महिलांपेक्षा पिछाडीवर असले, तरी भारतीय पुरुषांनी वेतनाच्या बाबतीत ही कसर भरून काढली आहे. निर्धारित वेळ काम करूनही पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेतन मिळत असल्याचे देखील या सर्वेक्षणात सामोरे आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
वाक्यावाक्याला भारतीय पुरुष असा उल्लेख वाचून आजवर स्वत:ला जेवढा "भारतीय" असल्याचा अभिमान वाटत होता तेवढीच आता "भारतीय पुरुष" असल्याची लाज वाटू लागली होती. काही नाही, मी ठरवले, या बातमीला उत्तर द्यायचेच. खून का बदला खून, आंख का बदला आंख, तसेच सर्वेक्षण का बदला सर्वेक्षण.... मात्र मला एकट्याला सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने मी केवळ निरीक्षण करून एक अहवाल बनवायचे ठरवले अन लागलीच कामाला लागलो. महिन्याभरात स्वताच्याच ऑफिसमधील पुरूष कर्मचार्यांच्या निरीक्षणावरून भारतीय पुरूषांचे ऑफिसकाम प्रत्यक्षात कसे चालते यावर मी एक दसकलमी अहवाल बनवला. बस तोच पुरुष जनहित मे जारी तुमच्या समोर सादर करत आहे.
७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. -
पुरूषही काही कमी नाहित
१) पुरूष मुळात सकाळी सकाळी ऑफिसातच येत नाहित. पुरूष जात्याच वक्तशीर असल्याने रात्री ज्यावेळी झोपलो असु त्याच्या बरोब्बर १२ तासांनी ते ऑफिसमध्ये पोचतातच. ही वेळ पाळण्यासाठी प्रसंगी आंघोळ करणे, नीटनेटकी इस्त्री करणे वगैरे गोष्टींना काट देण्यात येते. वेळ पाळणे महत्त्वाचे. ऑफिसमध्ये आल्याआल्या काम सुरू करण्यापुर्वी एक चहा मारून मगच जागेवर पोचतात जेणेकरून पुढील कामाला भरपूर उर्जा मिळेल.
२) जागेवर आल्यानंतरही कॉम्प्युटरची कळ न दाबता हे आधी इतर महिला सहकार्यांवर एक नजर मारतात. आज कोणी काय नवीन विशेष घातले आहे का याचा आढावा घेतला जातो. असल्यास खर्या-खोट्या स्तुतीसुमनांचा मारा होतो. कारण अर्थातच स्पष्ट असते. गीव्ह आणि टेक.. तू मला लाईन दे अन् मी तुला लाईक करतो..!
३) आल्यानंतर काही वेळातच दुपारी जेवायची वेळ. ही वेळही काटेकोरपणे पाळली जाते. कारण कितीही अर्जंट काम असले तरी हे फारवेळ उपाशी राहू शकत नाहीत. जेवणाकडे फारसे लक्ष न देता आजुबाजुच्या टेबलांवरील गप्पांकडे किंबहुना गप्पा मारणार्यां(मुलीं)कडे बघत, दुसरीकडे मेरा बॉस तेरे बॉससे ज्यादा च्यु* कैसे यावर सखोल चर्चासंवाद होतात. आपापल्या प्रोजेक्टमधील नव्या पाखरांचे सखोल परिक्षण होते. त्याच बरोबर कधी येत्या मॅचमध्ये टिममध्ये कोण असणे/नसणे उपयुक्त आहे यावरही अभ्यासपूर्ण मते मांडली जातात. पुरूष बायकांसारखे तसेच जेवण झाल्यावर देखील तश्याच गप्पा मारत बसून राहत नाहीत. लगेच उठतात आणि "सुट्टा" मारायला जातात. दुर्दैवाने सिगारेट प्यायला जायचा विभाग दूर असल्याने त्यांचा काहि वेळ तिथे जाण्या येण्यात जातो पण त्याला इलाज नाही. जे सिगारेट पित नाहीत ते अनेकदा जागेवर तडक परतात आणि मजल्यावर फार गर्दी नाही बघुन तिकीटांची प्रिंट काढणे, एखाद्या नव्या 'मैत्रिणी'बरोबर सुखदु:खे शेअर करणे वगैरे कार्यात व्यस्त असतात.
४) डबे धुण्यात वगैरे पुरूष वेळ वाया घालवत नाहीत. तो वेळ (आता पटु न शकणार्या , किंवा ते वय पार केलेल्या) स्त्री सहकार्यांची टर उडवणे, त्यांच्या सास बहु सिरीयल्स बद्द्ल त्यांना चिडवणे, येत्या विकांताचे प्लानिंग, मोबाईलवर 'व्हॉट्स अॅप'वर अमोघ कार्य करत राहणे यात सत्कारणी लावतात.
५) जेऊन जागेवर आल्यावर यांना खरंतर ऑफिसचे काम करायचे असते पण लगेच प्रेयसीचा किंवा बायकोचा फोन येतो. शेवाटी पुरुष असल्याने आणि त्याच्या ऑफिसला असल्याने बरेवाईट काय ते खरेखोटे न सांगता एका शब्दात चांगलेच होते बोलून फोन ठेवण्याची कितीही इच्छा असली तरी तसे केल्याने येऊ शकणारे भावी वादळ लक्षात घेऊन तो घरी बोलता न येणार्या विविध कौटुंबिक प्रश्नांवर किंवा लग्न व्हायचे असल्यास संभावित कौटुंबिक प्रश्नावर चर्चा करतो.
६) त्यानंतर काही वेळातच दुपारचा चहा येतो. तेव्हा बरेच पुरुष मुकाट्याने चहा पिऊन लगेच कामाला सुरुवात करतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारायला बाहेर पॅंट्रीमध्ये जातात, मात्र सिगारेट-चहा संपताच परत येतात. मात्र त्या दरम्यान कालच्या म्याचच्या स्कोरची रिवीजन, रात्री जागून पाहिलेल्या फुटबॉल म्याचेसचे स्कोर्स, राजकीय घडामोडी इत्यादींचा धावता आढावा घेतला जातो. जागेवर परतल्यावर जेव्हा बायका चिवडा-फरसाण खाण्यात बिझी असतात तेव्हा पुरूष मंडळी विकांताच्या पिक्चरांची तिकीटे बुक करणे, ब्यांकांच्या/फोन कंपन्यांच्या एजंटांना फोन करून त्यांची 'मारणे', शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सखोल अभ्यास करणे यात अत्यंत व्यस्त असतात. याशिवाय नव्या कारची, स्कुटर्सची, फोनची, क्यामेरांची (आणि मुलीची) मॉडेल्स याचा सखोल अभ्यास करण्याचे अधिकचे कामही यांच्यावरच असते ते वेगळेच.
७) जरा उन्हे उतरू लागली की ऑफिसने देऊ केलेली जिम, विविध खेळांच्या सुविधा यांचा पुरेपूर लाभ घेण्याचे काम यांच्यावरच टाकले जाते. अर्धा-पाऊण तास जीम, काही वेळ टेनिस किंवा बॅडमिंटन आदी कोर्टांना यांनी वापरात ठेवले नाहि आणि दुपारचा चहा पिण्यात वेळ घालणार्या महिलावर्गावर ही जबाबदारी सोडली असती तर सार्या इन्स्ट्रुमेन्ट्सना गंज लागला असता.
८) इतका व्यायाम केल्यावर, ऑफिस सुटायच्या वेळी यांना निसर्गनियमानुसार पुन्हा भूक लागते. यावेळी कोणी चहा तर आणून देणार नसतो. मग पुन्हा कँटिनकडे मोर्चा वळतो. यावेळेपर्यंत लग्न झालेला स्त्रीवर्ग घरी निघुन गेला असल्याने, यावेळी कँटिनला उगवणार्या तारकांकडे विशेषत्त्वाने लक्ष दिले जाते. अर्थात इथे ही गप्पा मारणे हे ओघाने आलेच. निव्वळ लक्ष गेले म्हणून एखादिला बघितले गेले असे यांचे कधीच होत नाही.
९) दिवसभर विविध गोष्टिंवर वेळ खर्च झाल्याने त्यांना डिस्टर्ब करणारा स्त्रीवर्ग घरी गेल्यावर यांचा वेळ ऑफिसचे काम करण्यात जातो. अर्थात एकीकडे लाईव्ह कॉमेंट्री वाचणे किंवा चॅटिंग करणे वगैरे चालुच असते. शिवाय यावेळी परदेशातील मित्र जागे होत असल्याने 'व्हॉट्स अॅप'वर खूपच वेळ द्यावा लागतो.
१०) उशीरा ऑफिसमध्ये थांबणे हा प्रकार यांच्या बाबतीत नेहमीच आढळतो. पुरूष ही अतिशय कष्टप्रिय जमात असल्याने श्रमपरिहार म्हणून कुठे 'बसायचे' यावर रात्रीच्या सिगारेट गटात चर्चा होते आणि अतिशय कष्टपूर्ण दिवसाची सांगता होते.
तर मित्रांनो........ हे असे असते. यावरून असे म्हणता येईल की मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने ७२ मिनिटे जास्त काम करण्याची शक्यता चुकीची असून पुरूषही तितकेच किंबहुना थोडे अधिकच काम करत असल्याने हा सर्व्हे सर्वस्वी चुकीचा आहे असे म्हणावे लागेल.
या अहवालाशी सहमत नसाल तर इथे याच खाली मोठ्या संख्येने स्वाक्षरी करा. येत्या बैलपोळ्याआधी आपल्याला याची एक प्रत दैनिक फेकानंदच्या कार्यालयात सादर करायची आहे. पुढील कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..!!
धन्यवाद,
अहवाल सादरकर्ता - तुमचा पुरुषमित्र ऋषिकेश
तळटीप - सदर लेख कल्पनेवर आधारीत असून आपल्या जवळपास असेच काहीसे द्रुष्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा........ आणि हो, हलकेच घ्या हं.
याद्या
9480
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
=)) =)) =))
(No subject)
कारण कितीही अर्जंट काम असले
एडिट करायला विसरलो!
In reply to कारण कितीही अर्जंट काम असले by तुमचा अभिषेक
बाकी आपले मत बरेचसे जुळलेले
In reply to कारण कितीही अर्जंट काम असले by तुमचा अभिषेक
कुछ जम्या नई..
निषेध ...
+१००
In reply to निषेध ... by छोटा डॉन
बापरे! डॉन्याने वर त्रिवार
जे सिगारेट पित नाहीत ते
पुरुष कार्य(?)क्षमतेवर
गमतीदार.
+१
In reply to गमतीदार. by कवितानागेश
धागा वाचुन ताबडतोब "या" चे
अर्थातच!!
आयला सुडक्या
In reply to अर्थातच!! by सूड
असतात काही गैरसमज! असोत बापडे
In reply to अर्थातच!! by सूड
एखादवेळेस आपण जाड होत चाललोय
In reply to अर्थातच!! by सूड
अगदी! आपण जाड होतोय असं
In reply to एखादवेळेस आपण जाड होत चाललोय by शुचि
मला तर सुंदर केशसंभार
In reply to अगदी! आपण जाड होतोय असं by रेवती
असे न वाटणारी स्त्री
In reply to एखादवेळेस आपण जाड होत चाललोय by शुचि
विडंबन
In reply to असे न वाटणारी स्त्री by सहज
तुमचा "सँपल सेट" खूपच संकुचित
In reply to अर्थातच!! by सूड
जाऊ दे ग पिलीयन, हे पुरुष चूक
In reply to तुमचा "सँपल सेट" खूपच संकुचित by पिलीयन रायडर
(No subject)
In reply to जाऊ दे ग पिलीयन, हे पुरुष चूक by शुचि
बरोब्बर...
In reply to जाऊ दे ग पिलीयन, हे पुरुष चूक by शुचि
आपलं "लॉजिक" ?
In reply to बरोब्बर... by पिलीयन रायडर
ओ मिस्टर धागा पाहीलात का?
In reply to आपलं "लॉजिक" ? by अग्निकोल्हा
तुमचा अभिषेक यांचा (मूळ धागा
In reply to ओ मिस्टर धागा पाहीलात का? by शुचि
उगाच माझ्यावर सरसकटीपणाचा
In reply to तुमचा अभिषेक यांचा (मूळ धागा by शुचि
मी ठेवणार कोणाची भीती आहे काय
In reply to उगाच माझ्यावर सरसकटीपणाचा by तुमचा अभिषेक
कोण आम्हा पुसणार ?
In reply to मी ठेवणार कोणाची भीती आहे काय by शुचि
असेल असेल !!
In reply to तुमचा "सँपल सेट" खूपच संकुचित by पिलीयन रायडर
हर्निया बिर्निया व्हायचा त्या
In reply to असेल असेल !! by सूड
माझ्या जिम मध्ये या.. असली
In reply to तुमचा "सँपल सेट" खूपच संकुचित by पिलीयन रायडर
(No subject)
In reply to माझ्या जिम मध्ये या.. असली by विश्वनाथ मेहेंदळे
अग्गंमाय!!!!
In reply to तुमचा "सँपल सेट" खूपच संकुचित by पिलीयन रायडर
नाही हो.. अगदी राक्षसी वजन
In reply to अग्गंमाय!!!! by धमाल मुलगा
>>लेग कर्ल ला तर एक पोरगी ७०
In reply to नाही हो.. अगदी राक्षसी वजन by पिलीयन रायडर
कर्ल च म्हणायचे आहे दादा...
In reply to >>लेग कर्ल ला तर एक पोरगी ७० by सूड
तुम्ही आधी शांत व्हा पाहु...
In reply to कर्ल च म्हणायचे आहे दादा... by पिलीयन रायडर
अहं...
In reply to तुम्ही आधी शांत व्हा पाहु... by अग्निकोल्हा
अशी सारखी चिडचिड का करताय ?
In reply to अहं... by पिलीयन रायडर
मुलींनी मुलांएवढा व्यायाम
In reply to >>लेग कर्ल ला तर एक पोरगी ७० by सूड
समजुतदारपणा...
In reply to नाही हो.. अगदी राक्षसी वजन by पिलीयन रायडर
आवडेश..
सदरहु लेख ||||| दालनातला
(No subject)
In reply to सदरहु लेख ||||| दालनातला by श्री गावसेना प्रमुख
हा हा हा. भारी.
सू़क्ष्म परिक्षण आवडले.
धन्यवाद काकू. अगदी मनातलं
In reply to सू़क्ष्म परिक्षण आवडले. by काकाकाकू
काकवा व्हर्सेस पुतणे.
सुडला प्रश्न
कुणी विचारलेच तर सरळ तोंडावर
In reply to सुडला प्रश्न by काकाकाकू
ॠष्या,
हा हा हा
In reply to ॠष्या, by धमाल मुलगा
आता हेच तूच लिहीलेलं आहेस म्हणून!
In reply to हा हा हा by ऋषिकेश
अखंड भारतातला(सर्व जग
-
सहमत. +११११११११
हा हा...
यावर एका सिनेमातल्या उद्धटपणा
In reply to हा हा... by दादा कोंडके