Skip to main content

कहे कबीरा (२)

लेखक शरद यांनी मंगळवार, 05/11/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
कहे कबीरा (२) कबीराचे विचार कबीरपंथीयांची भारतातील संख्या काही लाखांत आहे. त्यांचे मठ अनेक ठिकाणी असून मठाधिपतींची संपत्ती, त्यांचा जनमानसावरील प्रभाव इ. प्रचंड आहेत. आज सहा सातशे वर्षे परंपरा असलेल्या या पंथाची विचारसरणी काय, त्याचा पाया कोणता त्याचा आज विचार करावयाचा आहे. कबीरानंतर त्याच्या चेल्यांनी बरेच फरक स्वीकारले असले तरी इथे आपण कबीराचाच विचार करणार आहोत.चार भागांत याची विभागणी केली आहे. (१) कबीराच्या काळातील भारतातील विशेषत: उ. भारतातील समाजाची धारणा. याचा दबाव व्यक्तीवर पडतोच, कबीरावरही पडला. (२) संत रामानंदांचा कबीरावरचा प्रभाव (३) कबीराचे मत (४) कबीर व महाराष्ट्रातील संत.

फुकणं वाईट, फुकाडे नव्हे.

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 05/11/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेझीताईंचा 'फुकाडे' हा लेख वाचला आणि त्यात त्यांनी समस्त फुकाड्यांना निर्बुद्ध ठरवून टाकल्याने त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या भूमिकेवरच फक्त चर्चा होताना दिसली. मुळात, 'फुकणं हे फुकणा-या माणसासाठी वाईट का? त्याबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असूनही लोक या व्यसनाकडे आकृष्ट का होतात? एकदा हे व्यसन त्यांना जडलं की ते सोडायची इच्छा त्यांना का होत नाही? ती झाली तरी सहजासहजी हे व्यसन का सुटत नाही?

जॉर्डन ची वारी भाग 1

लेखक सौरभ_बडे यांनी मंगळवार, 05/11/2013 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी , मी मिपावर आतापर्यंत प्रेक्षक म्हणूनच वावरलो आहे . हापिसात उघडणाऱ्या खूप कमी वेब साईट पैकी मिपा एक. त्यामुळे कधीपण काम नसले कि मिपा उघडून सानिका ताई, अपर्णा ताई , पेठकर काका , गणपा आणि अगदी अलीकडे दीपक कुवैत यांच्या पाककृती बघणे आणि इतके छान छान पदार्थ आपल्याला कधी खायला मिळणार म्हणून हुरहुरणे हाच तो काय माझा छंद . लेखन या प्रकारात माझे ज्ञान अगदीच नगण्य आहे त्यात मी केलेले प्रवास हे वर्णन करण्याजोगे कधीच नव्हते म्हणून कधीच लिहायची वेळ आली नाही. पण काही दिवसांपूर्वी अचानक जॉर्डन ला जायचा योग आला आणि त्याच्या आठवणी सांगाव्याश्या वाटल्या म्हणून काय तो हा लेखनप्रपंच असो.

नायिका भेद

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 05/11/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते. खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो.

चित्रपट समीक्षा: क्रिश ३

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 04/11/2013 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट समीक्षा - क्रिश ३ दर्जा- * * * चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन कलाकार - निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन प्रिया - प्रियांका चोप्रा काया - कंगना राणावत काल - विवेक ऑबेरॉय सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू : हा खऱ्या अर्थाने सिक्वेल आहे. मागच्या दोन्ही चित्रपटांची (कोई मिल गया, क्रिश) कथा यात खरोखर पुढे सरकते. क्रिश ३ ची कथा क्रिश प्रमाणेच खूप किचकट आहे. रोहित मेहेरा हे त्यांचा मुलगा क्रिश आणि क्रिश ची पत्नी प्रिया सोबत राहत असतात. ते सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर एक प्रयोग करत असतात.

बैल आहे साक्षीला ..

लेखक साळसकर यांनी सोमवार, 04/11/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
..... त्या गजबजलेल्या बकाल वस्तीतून सौरभ आपल्या साथीदारांसोबत जीव मुठीत धरून चालला होता. इतरांची जणू रोजची पायाखालची वाट असल्यासारखे आरामात चालणे होत होते. सौरभला मात्र ते वातावरण अंगावर येत होते. आजूबाजुच्या वखवखलेल्या नजरा जणू त्याच्याच शरीराकडे लागल्या आहेत असा भास होत होता. अनोळखी रस्त्याने जाताना अचानक एखादे साखळधारी श्वान समोर यावे आणि त्याच्या जबड्यातून वीतभर बाहेर लोंबकळलेली लालचुटून जीभ पाहता कोणत्याही क्षणी तो आपल्या मालकाला हिसका देऊन आपल्या अंगावर तुटून पडून आपले लचके तोडेलसे वाटावे, अगदी असेच सौरभला त्या तिथे झाले होते.

हरवलेला विद्यर्थ

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 04/11/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे. आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली.

माणसाचा स्वभावाच आहे तो...

लेखक गजानन५९ यांनी सोमवार, 04/11/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचा स्वभावाच आहे तो... माणसाचा स्वभावच आहे तो कुनि कामाला पुढे ढकलतो, बॉस अप्रेजल पुढे ढकलतो, तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो, न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो. तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई, काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील. पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई... --------------------------------------------------------------------------- एक विनंती :- हे जे का

तपस्या

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 04/11/2013 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
का गं आज अशी शांत का ? कोणी बोललं का तुला ? विशेष काही नाही.

सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र.

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 03/11/2013 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, यंदाच्या मिपाच्या दिवाळी अंकातली एक कथा तुम्ही वाचली असेल, त्यातील कथानायक 'मदनकेतु' याच्यावर श्रीकृष्णाने एक महत्वाची जबाबदारी टाकली होती. ती म्हणजे नरकासुराच्या वधानंतर मुक्त केलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना प्राग्जोतिष्पुराहून द्वारकेपर्यंत सुखरूपपणे घेऊन जाणे. याबद्दल मदनकेतु म्हणतो: "... एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ?