Skip to main content

घरे उजळती सारी

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 29/10/2013 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने मला परवा सांगितलं की त्याच्या मुलाला (म्हणजे त्याला स्वतःलाच) शाळेने दिवाळीसाठी एक `प्रोजेक्ट' दिलंय `प्रोजेक्ट'. ज्यात दिवाळीचे `गुड इफेक्ट्स आणि बॅड इफेक्ट्स' (मुळात हे आधी मला काय ते समजलं नाही) लिहून द्यायचे होते. बॅड इफेक्ट्स म्हणाला मी गूगल वरून काढले. (:D बर... म्हटलं मी) गुड साठी काही बघ ना जमतं का लिहायला, एखादी लिस्ट, एखादं ग्राफिक किंवा एखादी कविता. तेंव्हा सहज सुचली ही कविता काम करता करता.

(सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल?)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 29/10/2013 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
सणासुदीचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे घर आवराआवरीचं खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला झाडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल? आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी नारळाची वगैरे झाडं लावा, मग झावळी खाली आल्यावर हीर काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि साफसफाईची आणि नीटनेटकेपणाची हाईट" वाटते मला! तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि चिखलटिपणी!

आखिल भारतीय संसारी पुरुषमुक्ती संघटना.....

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 28/10/2013 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी जरा वादग्रस्त विषय आहे,पण जरा जुण्या जाणत्या मंडळीकडुन माझ्यासह समस्थ मि.पा.कर मंडळींना मार्गदर्शन मिळावे असे वाटते. तर मुद्दा पहिला, दिवाळीचा सण तोंडावर आल्यावर नेहमीप्रमाणे समस्थ गॄहस्वामिनी मंडळाची घर आवरण्याची,असतील नसतील ती भांडी घासण्याची आनी ती परत लावण्याची साथ फारच जोरदार पणे पसरते,यात नवरा नामक प्राण्याचे अतिशय हाल होत असल्याने (भांडी घासण्यासाठी नव्हे)पण उंचावरचे डबे काढणे,जाळ्या काढणे, पाण्याची मोटार दहावेळा चालु बंद करणे, गाद्या, बेड,सोफे हलवणे, माळी शोधणे,कलर देणार शोधणे,निघालेले भंगार विकत घेणारा शोधणे, सगळ्यात महत्वाच धडपडणारी आणी रडणारी चिल्ली पिल्ली सांभाळण्, आणी ह

चीत्कला

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 28/10/2013 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
चीत्कला चपळ चमके गगनी स्वर उमड घुमड घन प्रतिध्वनी थरकापे अवनी तपोवनी डोळ्यात आंसवे विद्ध मनी काळीज तळी अवखळ पाणी जळ खळाळे विकल होवोनी अस्वस्थ मेघ धावे कोणी चातक चोचीत शुष्क रमणी वेदना सखी मिरवे अंगी श्रम दाह शमे ना एकांगी शिडकावा तनभर भावुकसा व्हावा अमृतमय शतरंगी ……………. अज्ञात
काव्यरस

सगळ्यात पहिला लाडू कोणी बनवला असेल ?

लेखक घन निल यांनी सोमवार, 28/10/2013 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
सणासुदीचे दिवस आले न कि मला लहानपणा पासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे गोड धोड पदार्थ बनवण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिला लाडू कोणी बनवला असेल ? कधी बनवला असेल ? आणि कसा बनवला असेल ….

टोपीवाला आणि माकड

लेखक mohite jeevan यांनी सोमवार, 28/10/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक टोपीवाला शहरातून टोपी विकुण वाटेत झाडाखाली झोपलेला आसतो, झाडाखाली दुपारची विश्रांती घेत आसतो. जवळच्या झाडावर खुप माकडे खेळत आसतात, त्या झाडावरील खेळत खेळत एक माकड टोपीवाला झोपलेल्या झाडावर येते ,माकड त्या टोपीवाल्याला पाहते आणि त्याच्या आग़ांवर एक पेरु टाकते. टोपीवाला झोपेत आसतो आचानक तो जागा होतो, माकड त्याच्याकडे पाहुन दात दाखवते,टोपीवाला हातात काठी घेऊन त्या माकडाला मारायला जातो, पण आचानक ते माकड झाडांवरून खाली येते आणि टोपीवाल्याला म्हणतो, ‘का रे माकडा मला का मारतोस,मी पण तुझ्यासारखा माकडच आहे,’ ‘जा रे माकडा तुला मी काय माकड वाटलो का तुझ्यासारखा?,’टोपीवाला म्हणाला, ‘आरे विसरलास का पुर्वी

वीर-रसा ने माखलेल्या तीन लालबुंद कविता !!!

लेखक गुल-फिशानी यांनी सोमवार, 28/10/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो ! या माझ्या अत्यंत आवडत्या कविता आहेत. या मनाला छान उभारी देतात. वाचुन बघा कदाचित तुम्हाला ही या आवडतील !

देवासाठी काय करावे बरे

लेखक देशपांडे विनायक यांनी सोमवार, 28/10/2013 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ? हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !! हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!! संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !

भाग १ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

लेखक मन यांनी रविवार, 27/10/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पब्लिकचं लक्ष वेधून घेणं सोपं नाही. सातव्या आठव्या शतकात तत्कालीन ज्ञात जगातील फार मोठ्या भागावर इस्लामी राज्य पसरत होते. त्यांना कुणी यशस्वी आव्हान देणे हे ही दिव्यच मानले जाई. खरेतर असे कुनी आव्हान दिले होते, हे सुद्धा अल्पपरिचित असल्याचे दिसते. तर अशा एका योद्ध्याचा हा संक्षिप्त परिचय. पारशी लोकांचं गेलेलं राज्य त्यानं काही काळापुरतं पुन्हा उभं केलं.

बीट सूप : घरातील खाद्यक्रांतीचा साक्षीदार

लेखक अमेय६३७७ यांनी रविवार, 27/10/2013 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रांतीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे.