जॉनी मॅड डॉग
जॉनी मॅड डॉग
आफ्रिकेतल्या एका देशात यादवी छेडली गेली आहे. एका गावावर हल्ला होतो आहे. हल्ला करणारे सैनिक हे अगदी १२ ते १५ वर्षांचे दिसताहेत. त्यांचा एक कमांडर मोठा दिसतो आहे. प्रत्येक घरातले सगळे लोक शिव्या घालून बंदुकीच्या जोरावर तुडवून बाहेर काढले जातात. गावाच्या चौकात एकत्र केले जातात. काही लोक दयेची याचना करत असतात. जे जास्त बोलतात ते लक्ष वेधून घेतात. एका क्षणात निवाडा होतो - गोळ्या अगदी सहजतेने चालतात. अशी चौकशी आणि निवाडा चाललेला असतानाच एका लहान दहा वर्षाच्या मुलाला पुढे आणले जाते. त्याचा बाप म्हणतो त्याला सोडा यात मुले कशाला? सैनिकातला एक जण विचारतो तुझा कोण तो?
मिसळपाव