Skip to main content

अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग १

लेखक गुल-फिशानी यांनी बुधवार, 30/10/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो !!! सर्वप्रथम एक गोष्ट नम्रपणे नमुद करतो की मी चित्रकला या विषयातील तझ नाही केवळ एक साधा रसिक आहे.

आली दिवाळी

लेखक जागु यांनी बुधवार, 30/10/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे बालपण एका गावात बागडण्यात गेले. गावात तसे सगळेच सण पूर्वी उत्साहाचे वाटायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधी पासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची रंगरंगोटी डागडूगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचं. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीक-सारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करावी लागत असे.

सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल?

लेखक खटासि खट यांनी बुधवार, 30/10/2013 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे फळ्यावर लिहून दाखवायचे खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल? आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी जिप्सम वगैरे आणा, मग भुकटी खाली पाडल्यावर साच्यात काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि हात कि सफाईची आणि कृष्णपृष्ठीयश्वेतशिंतोडीकरणाची हाईट" वाटते मला! तसेच इतर अन्य पदार्थांचे ही, जसे कि शामवदनसफेती !

मंतरलेले ते दिवस आता फिरून परत येतील का ?

लेखक psajid यांनी बुधवार, 30/10/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
दूरचित्रवाणीवर मोती साबणाची जाहिरात पाहीली ? तीच ती "उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली… " म्हणत पळणाऱ्या मुलाची ! किती छान ना ? जाहिरात फक्त १५ ते २० सेकंदाची मात्र संस्कृतीची आठवण देणारी… आजची दिवाळी बदललेची जाणीव करून देणारी ! किती छान वाटतं नाही सोनेरी इतिहासात पहाण्याला ? आता ते दिवस नाही म्हणून दुःख व्यक्त करत रडत नाही कारण आताचे आधुनिकतेने नटलेले, विज्ञानाचा साज चढवलेले हे दिवस ही वाईट नाहीत मात्र या दिवसांचे एकेक क्षण पकडताना होणारी दमछाक आणि येणारा थकवा मनाला आनंद देण्याकामी एकदम तोकडा पडतो.

किनारा

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 30/10/2013 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताचे पन्ख पसरुन काळपक्षी सांद्र क्षितिजे खुणावतो अन अस्वस्थ ललाटरेषा श्रांत चांदण्याचे कवडसे मोजत शोधत रहातात विसावा अन्तराळाच्या कुशीत ... तेव्हा रिकामे रस्तेही ... शोधत सरपटतात उद्याच्या प्रवासाची हरवलेली दिशा अन प्रसववेणा देणारी पहाट शोधू पहाते दिवसाच्या उजाडण्याचे कारण.. आणि आसमंताच्या नि:शब्द कूपात मी चाचपडत असतो आणि शोधत रहातो.. .....फक्त एका कुशीचा किनारा

देऊळ

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 30/10/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
गावापासून दूर टेकडीवर, एक वास्तू अशी खास होती जागेसाठी भांडणाऱ्यांनी, देवाला रहायला दिलेली; जागा होती सताड उघडी मातकट पायवाट, एकटीच दुहेरी पळत होती काही मोजक्या भक्तांच्या पायात, कधीतरी घुटमळत होती भिंती ढाचा तसे जुने, ऊन;वादळवारे खात निर्धास्त उभे होते वेळेला देवघर,क्षणी भक्तांस निवारा, असे त्यांचे काम होते दाराबाहेर उभ्या वृंदावनात, तुळस वाऱ्यावर डोलत होती अधूनमधून मिळणाऱ्या पाण्यावर, बहरायला ती शिकली होती प्रवेश करता देवळात, कासव समोर साष्टांग होते नजरेनेच पोसतो देव त्यास, हेच ते सुचवीत होते पुढे जाता घनगर्द; गंभीर, सुबक छान गाभारा होता ध्यान भग्न न हो देवाचे, म्हणून त्याचा पहा

एक सीट का सवाल है बाबा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 29/10/2013 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
अस्मादिकांना एलर्जी, हृदय आणि मणक्याचे दुखण्याचा त्रास असल्या मुळे मेट्रोत तास भर उभे राहून प्रवास करणे त्रासदायकच. म्हणतात न ‘जहाँ चाह, वहाँ राह’ बसायला सीट कशी मिळवावी या वर बरेच विचार मंथन केले. वय मोठ दिसाव म्हणून पांढऱ्या झालेल्या केसांना रंगविणे सोडून दिले. मेट्रोत चढल्या बरोबर, सीट वर बसलेल्या लोकांचे निरीक्षण करतो. तरुण दिसत असलेल्या व्यक्ति जवळ उभे राहून विनम्र आवाजात ‘थोडी जगह मिलेगी क्या' म्हणून विचारतो. तरुण व्यक्ती सभ्य असल्यात पांढऱ्या केसां कडे पाहून थोडीशी जागा बसायला देतो.

अन्याच्या बापाची पार्टी !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 29/10/2013 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मितान ह्यांचा हा धागा वाचला आणि अस्वस्थ झालो. साहजिकच मुलाचा विचार करायला लागलो आणि ४ महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला...... हुश्श... बर्‍याच दिवसांनी एका कार्यक्रमाचं निवेदन करून नुकताच घरी निघालोय..... शेवटचा कार्यक्रम केला होता २००४ साली... म्हणजे ९ वर्षं झाली की.... गुड मॅन....... चांगला झाला...... असं ७० - ८० प्रेक्षकांसमोर बोलणं नेहेमीच आवडतं. कलाकाराला प्रोत्साहन मिळण्याइतक्या टाळ्याही मिळतात आणि एक निवेदक म्हणून प्रेक्षकांशी संवाद पण साधता येतो.

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 29/10/2013 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

अधिकार

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 29/10/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्री रोग़ तज्ञ डाँ. पाटील याच्या क्लिनिक बाहेर एक युवती क्लिनिक उघडण्याची वाट पाहत होती.जिन्स पँन्ट घातलेल्या त्या युवतीकडे येणारे जाणारे काही लोक पाहत होते. काही वोळातच क्लिनिकमध्ये नर्स म्हणुन काम करणारी सारिका आली,तीच्या पाठोपाठ ती युवतीही क्लिनिक मध्ये ग़ेली.