युद्धाचे वादळ या पुस्तकाचे मुखपृष्ठ.....
मित्रांनो,
मी माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः तयार केले आहे. ( आपल्याला आठवत असेल यातील दोन पूर्ण प्रकरणे मी मिपावर टाकली होती एक होते ज्यूंच्या शिरकणाबद्दल आणि दुसरे एक होते. असो) आता मी पुस्तक पूर्ण केले आहे (८३० पाने). हे जे मी मुखपृष्ठ तयार केले आहे ते ठीक आहे का याबद्दल आपली प्रांजळ मते मागवीत आहे. जर तुम्हाला आवडले तर मी दुसरे कव्हर डिझाईन करणार नाही व माझा बराच वेळ वाचेल.
विचार
तुला प्रेमपत्र लिहतांना साक्षी ठेवलेल्या,
प्रेमदेवतेला विचार...
तु येण्याची वाट पाहत जिच्यावर तासन् तास बसलो,
त्या वाटेला विचार...
दिवसरात्र तुझीच स्वप्ने बघणार्या,
माझ्या डोळ्यांना विचार...
चंद्राची व तुझी तुलना करतांना,
तयार झालेल्या कवितांना विचार...
तुझ्या आठवणीत रात्री जागतांना, ज्यांना मला पाहिलं,
त्या चांदण्यांना विचार...
माझं तुझ्यावर किती प्रेम आहे,
हे तेव्हा तुला कळेल...
माझ्या राखेतील अस्थींतुन सुद्धा,
तुला तुझेच नाव ऐकायला मिळेल...
ज्याचे करावे भले.....
भिकाऱ्यांच्या त्रासाने गणपतराव त्रासले होते. जेथे बघावे तेथे भिकारी. ह्या भिकाऱ्यांचे करायचे तरी काय?असा प्रश्न गणपतरावांना पडला. सकाळी ऑफिसला जायला निघाले तर नाक्यावरचा भिकारी पैसे मागायचा.त्याचे झाले कि ट्रेनमध्ये कळकट भिकारी अंगचटीला येवून पैसे मागायचे कि त्यांच्या जवळकी पेक्षा पैसे देणे गणपतरावांना प्रशस्त वाटायचे.गणपतरावांचा मूळ स्वभाव हा भिडस्त होता. लोक काय म्हणतील याची त्यांना नेहमी भीती वाटत असे. इतर माणसे जशी भिकाऱ्यांना हाकलून लावत, खर्जातला आवाज काढून त्यांच्यावर ओरडत ते काही केल्या गणपतरावांना जमत नसे. त्यामुळे ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून त्याची सुटका काही होत नसे.
खरा काँग्रेसभक्त
कुमार केतकरांचा अवतार छ.गडमधे जन्माला आला की काय अशी शंका यावी असा हा एक अस्सल काँग्रेसप्रेमी भारतीय!
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-chhatisgarhs-rajeshwara…
राजेशराव पवार नामक छत्तीसगडमधील कुणी विभूती महाराणी सोनिया, युवराज राहुल, युवराज्ञी प्रियांका यांची रोज साग्रसंगीत पूजा करतात. आपले जाणते पवार ह्यातून काही स्फूर्ती घेतील काय ?
असो.
मंगलयान - उत्तरार्ध
अवकाशाच्या निर्वात पोकळीत इतर काही नसले तरी निरनिराळ्या ग्रह आणि ता-यांच्या गुरुत्वाकर्षणाचा जोर (फोर्स) एकमेकांना आकर्षित करत असतो. या जोराचा प्रभाव अंतराच्या वर्गाच्या (स्क्वेअरच्या) व्यस्त प्रमाणात कमी होत जातो. म्हणजे अंतर दुप्पट झाले तर तो पावपट होतो आणि अंतर वाढून दहापट झाले तर तो जोर एक शंभरांश इतका कमी होतो.
अरूप
अरूप उमजोनी जाय,
दाविते पंथ गुरुमाय,
अज्ञान विलया जाय,
तत्काले...
जन्मोजन्मीच्या ग्रंथी,
पाडिती जीवा गुंथी,
गुरुस्पर्शे निघे पंथी,
मुक्तीचिया...
सर्व स्थळी सर्व देही,
एकतत्व निश्चये पाही,
नित्यानुसंधानी राही,
आत्ममग्न...
फिटता भ्रमजाल,
जेथे तेथे पाहाल,
एकत्व अनुभवाल,
चित्शक्तीचे...
- सागरलहरी -
२३.११.२०१३
शिव्यांना शिव्या देऊ नये.
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.]
सुरुवात झाली 'अईला!!' पासून.
दुष्ट योगायोग!!
अद्वैत आणि सीमा एकाच कॉलेजात होते. दोघांत मैत्री होती. कॉलेज संपलं, आणि एकमेकांचा विरह सहन होईनासा झाला. दोघं पुन्हा त्यांच्या ग्रुपच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटायला लागले. हळूहळू जाणीवपूर्वक दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच-सहा वर्षं उलटली. सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती. तिला कामात लगेच बढती मिळायला लागली. अद्वैतला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप हालअपेष्टा सहन करून, खस्ता खाऊन त्यानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली. पण काम भरपूर होतं. प्रेशरही खूप.
ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी - २
ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी -१
पहिल्या भागात आपण तवांगजवळच्या वॉर मेमोरियल पर्यंत आलो होतो.
तिथून पुढे गेल्यावर न्युरानांग फॉल्स लागले. थोडी फोटोग्राफी करुन पुन्हा निघालो.
आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला.
आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला.
मिसळपाव