भारतरत्न (?) विराट कोहली (??)
मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले.
ज्योतिषशास्त्राचा फायदा
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत.
ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो.
निरागस
पावसाचे अजूनही काही लक्षण दिसत नव्हते. लागोपाठ तिस-या वर्षी दिसणा-या दुष्काळच्या सावटाने लोक चिंताक्रांत होते.
" आज संध्याकाळी सगळी संगत पावसासाठी प्रार्थना करायला गुरुद्वारात जमणार आहे " सरदार सोहन सिंग शौकत अलींना सांगत होते.
" हो तेवढंच उरलंय आपल्या हातात, प्रार्थनाच करू शकतो आपण, जर ह्या वर्षीही पाउस आला नाही तर कठीणच दिसतंय सगळं " शौकत अली म्हणाले.
" आम्ही पण येऊ प्रार्थना करायला? शौकत अलींचा नातू रेहान मधेच म्हणाला.
शौकत अलींचे तोंड आश्चर्याने क्षणभर उघडेच राहिले, सरदार सोहन सिंगही गोंधळले.
" आमच्या मास्टरजींनी पण सांगितलं आहे सर्वांना पावसासाठी प्रार्थना करायला " रेहान म्हणाला.
शिवरात्र जागवोनी...
कालच्या दिवसाच्या निमित्ताने!
नेहमी कामानिमितानी
शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा?
सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो!
अजंठा ...........भाग-२
अजंठा ...........भाग-१
वत्सगुल्म शाखा : वाकाटकांची अशी काही शाखा आहे हे १९३९ पर्यंत माहीतच नव्हते. तसे अजंठामधे यांचे बरेच शिलालेख आहेत पण वाईट अवस्थेमुळे त्याच्यातील नावे चुकीची वाचली गेली. अकोला जिल्ह्यात वाशीम येथे एक ताम्रपट सापडल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर.
फॅण्ड्री आवडणे , न आवडणे
एकदाचा फॅण्ड्री पाहिला. फेसबुकवर रोज येणारी परीक्षणं पाहून फॅण्ड्री पाहीलेले लोक आपल्याला खिजवतात असं वाटू लागल होतं. मग ज्या जिद्दीने सिनेमाबद्दल खूप काही कळत नसतानाही पाहीला त्याच जिद्दीने गद्यात लिहीणं जमत नसतानाही लिहायचं ठरवलं. लिहायचं ठरवलंच आहे तर तांत्रिक गोष्टी कळत नसताना काय लिहायचं ?
तर एक गोष्ट खरी की हा सिनेमा असा आहे की तो पाहीलेल्यांना त्याबद्दल चांगलं वाईट इतरांना सांगावंसं वाटत राहतंं हे खर आहे.
मंगळ कार्य !
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा?
मिसळपाव
