Skip to main content

जळक्या बोटांच्या मुलीच्या वहीची मायक्रो-गोष्ट

लेखक चिन्मय खंडागळे यांनी मंगळवार, 25/02/2014 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
जळक्या बोटांची मुलगी धावतपळत बागेत येते. आज आपल्याला उशीर तर झाला नाही ना, अशी शंका तिच्या मनात चुकचुकते आहे. घाईघाईने ती इकडून तिकडे पळणारी मुलं, संथपणे एकेक पाऊल टाकत चाललेले आजीआजोबा, एकमेकांच्या हातात हात घालून रमतगमत फिरणारी जोडपी, या सगळ्यांमधून वाट काढत बागेच्या पश्चिम टोकाकडे येते. तो अजून त्याच्या नेहमीच्या बाकावर बसला आहे. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडतो. त्याचा डोळा चुकवून ती हळूहळू तिच्या नेहमीच्या बाकावर, त्याला सहज दिसणार नाही पण त्याच्यावर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी जाऊन बसते. मावळत चाललेल्या सूर्याकडे एकटक बघत तो बसलेला आहे. अचानक तो उठून उभा राहतो.

श्रीनगर ट्रीप बाबत सल्ला हवा आहे ..

लेखक आरोही यांनी सोमवार, 24/02/2014 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकर उत्साहाने मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे ... पुढील महिन्यात आम्ही पती पत्नी आणि माझा मुलगा वय ३ वर्षे , श्रीनगर ट्रीप ला जात आहोत तर सोबत अजून चार कुटुंबे आहेत त्यात ३ मुले पाच वर्षाच्या आतील आहेत. मला हे विचारायचे होते कि खासकरून गुलमर्ग ,सोनमर्ग,पहलगाम या ठिकाणी जाताना मुलांच्या सोयीसाठी कोणत्या वस्तू सोबत घ्याव्यात ...

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : २ : नॉम् पेन्

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 24/02/2014 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

कारल्याच्या काचऱ्या

लेखक आरोही यांनी सोमवार, 24/02/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी अत्यंत साधी सोपी अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी देत आहे ..हि करायला खूप साधी आहे ..बऱ्याच जणांना माहित हि असेल कदाचित ... साहित्य : कारली ४,कांदा १ ,लाल तिखट १ चमचा ,हळद १ चमचा ,मीठ आवडीनुसार ,आमचूर पावडर अर्धा चमचा ,जीरा पावडर अर्धा चमचा ,तेल ३ चमचे . कृती: सर्व प्रथम कारली धुऊन त्याच्या गोल गोल पातळ चकत्या करून त्याला मीठ लावून १ तास ठेवून द्या .. आता कढाई मध्ये तेल तापत ठेवून द्या . कारल्याला आता चांगले पाणी सुटले असेल ते पाणी हाताने पिळून काढून घ्या ..या मध्ये कारले कुस्करले जातील पण हरकत नाही चालतात तसे. आता तापलेल्या तेलावर ते कारले टाका व बारीक gas वर शिजू द्या ,आपल्याला का

मिट्ट

लेखक विकास यांनी सोमवार, 24/02/2014 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महीन्यापासून बघण्याचे डोक्यात असलेला एक माहितीपट बघायची संधी मिळाली... भारतीय निवडणुकांच्या हंगामात अमेरीकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एका राजकारण्याच्या व्यक्तीगत वर्तनाची एक झलक बघताना नकळत तुलना होते. अर्थात येथे कुठे कुणाला आदर्श समजत नसून आपण कुठले वर्तन मिस करत आहोत इतकेच डोक्यात येते... त्या माहितीपटाचे नाव आहे MITT. अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार मिट्ट रॉमनी यांच्यावरील हा वेगळ्याच पद्धतीने घेतलेला माहितीपट आहे. २००६ साली सर्वप्रथम मिट्ट रॉमनी यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले.

बाबा रामदेव यांचा उदय, एक आकलन

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 24/02/2014 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेव हे नाव आता सर्वतोमुखी झालेले आहे. योगापासुन सुरुवात करुन त्यांनी राजकारणात किंवा समाजकारणात म्हणुया प्रवेश केलेला आहे. मात्र हा लेख त्यांच्या राजकारणाचा किंवा समाजकारणाचा विचार करणारा नाही. त्यांच्या उदयामागची कारणे शोधणे हा या लेखाचा उद्देश आहे. आणि ही कारणे सामाजिक आणि योगिक दृष्टीकोनातुन तपासुन पाहण्याचा मानस आहे. रामदेवांचा उदयामागची कारणे शोधणे इतके महत्वाचे आहे काय? तर याचे उत्तर हे की अनेक योगसंस्था रामदेवांच्या अगोदरपासुन कार्यरत आहेत. मग रामदेवांनाच एवढी अभूतपूर्व प्रसिद्धी मिळण्याचे कारण काय? आपल्या समाजात असे काय बदल झालेत कि रामदेवांनाच लोकांनी इतकं डोक्यावर घ्यावं?

फँड्री... पड्द्याबाहेरचा !

लेखक अक्षरमित्र यांनी सोमवार, 24/02/2014 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला चित्रपट हा नेहमी चित्रपटगृहातच पहावा असे माझे आतापर्यंतचे ठाम मत होते. मात्र आता ते बदलावेसे लागणार बहुधा. चित्रपट सिंगल स्क्रीनवरुन मल्टीप्लेक्समधे आलेत, चलतचित्रांचा दर्जा सुधारलाय, ऑडीयो सिस्टीम देखील उत्तम. भिकार ते दर्जेदार असे सगळ्या प्रकारचे चित्रपट बनतायत आणि पिटातलं पब्लीक हाय फाय बनून मॉलमधे २००-२५० रु. चे तिकीट वट्टात फाडतयं. मात्र "भगवान जब अकल बाँट रहा था तब बहोत सारे लोग घास चरने गये थे" अस वाटतयं.

कान्हा नॅशनल पार्क - भोरमदेव (भाग ५)

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 24/02/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
हा भाग मिपाकर "वल्ली" ह्यांना समर्पित..!! कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १) कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २) कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३) कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४) "इथुन भोरमदेव कडे जातानाच्या रस्त्यावर...आणि आपण तिथे जायचचं.. तुला वाघ दाखवायचाच.." इतका वेळ सोडुन दिलेल्या आशा परत पल्लवीत झाल्या..शांत झालेली डोक्यातली चक्रं परत फिरु लागली..

६१७४

लेखक आतिवास यांनी सोमवार, 24/02/2014 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी ‘Our Scientists’ हे पुस्तक वाचत होते. नॅशनल बुक ट्रस्टचं १९८६ मधलं प्रकाशन आहे ते. ब-याच काळापासून मागं पडलेलं पुस्तक आहे; म्हणून त्या दिवशी जरा नेटाने वाचत होते. ‘नेटाने’ कारण पुस्तकाची शैली. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची त्यातली ओळख इतकी संक्षिप्त आहे; की कंटाळा यायला लागला मला (म्हणून हे पुस्तक दरवेळी मागे पडत गेलंय माझ्यासाठी!) हे पुस्तक शाळकरी मुलांसाठी आहे हे तर मला आणखी विशेष वाटलं; कारण या पुस्तकात मुलं रमतील असं काहीच नाही दिसलं मला. एका लेखात ‘स्थिरांक’ आढळला. काय आहे हा स्थिरांक? १. एक चार अंकी नंबर घ्या.

हायवे - दोषपूर्ण पण तरीही वेगळा

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 24/02/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
Highway व्यावसायिक हिंदी चित्रपट म्हटल्यावर साधारणपणे जे चित्र डोळ्यापुढे येते, त्याहून बराच वेगळा असा 'हायवे' एक स्मरणीय अनुभव देऊन जातो. ज्यांनी तो पाहिला आहे, त्यांना कथा माहिती असेल. ज्यांनी पाहिलेला नाही, त्यांचा रसभंग होईल. त्यामुळे कथा सविस्तर न सांगता, चित्रपट पाहून जे वाटले त्याबद्दल थोडक्यात बोलतो. १. सर्वप्रथम अभिनय. रणदीप हूडा आणि आलिया भट्ट या दोघांचा अभिनय अतिशय भावणारा. काही ठिकाणी आलिया थोडी अननुभवी जरूर वाटते.