Skip to main content

.......!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 24/02/2014 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा. कशाचा तमाशा होइल ठावं नाही भावा, माझ काळीज काढुन टांगल तरी खुळं वाजवतय पावा. कधी यायच भान म्हणते मी कधी यायच भान म्हणते मी पण सांग मला त्यानंतर जीवंत असेन का रे मी? कुठल्यातरी आशेवर कुठल्यातरी आशेवर पावल तरी उचलतात दिसत नसली सुखं तरी बळ वाढवुन जातात नऊ महिन्याच वज्ज नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते. नऊ महिन्याच वज्ज माय शेजीच घर बघुन वाहते काय ठाव तिला काय ठाव तिला त्या वज्ज्याचा नशिब दगड करु पाहते. कुठं हसु उमलत कुठं हसु उमलत साजरा मुखडा बघुन. कुठं डोळं पाझरतात काळजाच तुकडं होउन. सगळ आतल्या आत सगळ आतल्या आत नुसत सोसायच तमाशा होउ नये म्हणुन आतल्य

डिनायल

लेखक धन्या यांनी सोमवार, 24/02/2014 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
डिनायल (denial) या इंग्रजी शब्दाचा शब्दकोषातील अर्थ आहे काहितरी नाकारण्याची कृती. या शब्दाच्या अर्थाच्या जवळपास जाणारा मराठी शब्दप्रयोग आहे "कानावर हात ठेवणे". आपल्यावरील प्रतिहल्ला परतवून लावणे ही कुठल्याही प्राण्याची उपजत प्रेरणा असते. त्यामुळे जेव्हा हल्ला करणार्‍याचा आपण सामना करु शकतो अशी खात्री त्या प्राण्याला पटली की तो पलटवाराला तयार होतो.

मटार पॅटिस

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 23/02/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ५-६ उकडलेले बटाटे,३-४ स्लाइस ब्रेड, साधारण २.५ ते ३ वाट्या मटारदाणे, साधारण पेरभर आलं ,२-३ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या , मीठ, तेल, रवा किवा ब्रेडक्रम्स कृती- आलं मिरच्या लसणीची पेस्ट करुन घ्यावी. बटाटे उकडून सोलून घ्यावेत, नंतर ते कुस्करावेत.त्यात चवीनुसार मीठ,चमचाभर आलं मिरची लसणीची पेस्ट घालावी.ब्रेडचे स्लाइस पाण्यातून काढून नंतर दाबून पाणी काढून ते बटाट्यात मिसळावेत.मळून गोळा करुन घ्यावा. चमचाभर तेलावर मटार वाफवून घ्यावेत, त्यात १.५ ते २ चमचे आलं मिरची लसणीचे वाटण घालावे, चवीनुसार मीठ घालावे व चांगली वाफ काढावी. बटाट्याच्या गोळ्यातून लिंबाएवढा गोळा घेऊन खोलगट आकाराची पारी कर

क्रोमबुक्स - एक झलक...

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 23/02/2014 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
लॅपटॉपची खरेदी करताना त्यासाठीची संगणक प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) म्हणजे विंडोज असे समीकरणच आपल्या मनात पक्के झालेले असते. मात्र मायक्रोसॉफ्टच्या स्पर्धकांचे या क्षेत्रातली मायक्रोसॉफ्टची अनिर्बंध मक्तेदारी मोडून काढण्याचे प्रयत्नही सुरू असतात. आजवरचे असे प्रयत्न एकतर अयशस्वी ठरलेले आहेत किंवा त्यांना माफक प्रमाणात यश मिळालेले आहे. असाच एक प्रयत्न क्रोमबुक्स बाजारात आणून गुगलनेही केलेला आहे. क्रोमबुकमागची मूळ संकल्पना: सर्वसाधारणपणे मनोरंजन, संपर्काचे एक माध्यम आणि थोडेफार काम अशा वापरासाठी लॅपटॉप विकत घेणारे ग्राहक त्याचा उपयोग आंतरजालावर किती वेळ करतात आणि ऑफलाईन असताना किती वेळ करतात?

फंडे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 23/02/2014 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
हिस्सार रोड रोहटक मधे लक्ष्मी प्रिसिजन नावाच्या नावाचा कारखाना आहे तिथे वसुलि साठी गेलो असता गुप्ता नावाच्या फायनांस मधल्या अधिका~याशी मैत्री झाली होति.. तो पण आपल्या सारखाच गप्पिश्ठ होता .. गप्पा मारताना त्याने व्यवसायातले/व्यवहारातले ३ फंडे(सुत्र) सांगितले १)साथि साथका पैसा पासका २)देन सच लेन झुटी. ३)वोह सोना किस कामका?

मदत हवी आहे...

लेखक nandan यांनी रविवार, 23/02/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मला एक मदत हवी आहे. तुम्हाला scythe कुठे मिळेल किंवा कुठे बनवून मिळतील याची काही माहिती आहे का ? https://lh4.googleusercontent.com/-9qKODmP4ZFw/UwoECz1G9ZI/AAAAAAAACRc/… https://lh4.googleusercontent.com/-BDfeFz1Ay68/UwoEHjs_0aI/AAAAAAAACRg/… आपल्याकडे इंधनावर चालणारे गवत काढणी यंत्रे खूप आहेत.

सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/02/2014 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वी गोल आहे हे विज्ञानानी सांगितलेल सत्य आपण बहुसंख्य भारतीय लोक बर्‍यापैकी सहजतेन स्विकारतो नाही ? पृथ्वी गोल आहे हे सत्यच आहे पण युरोपियन आणि ख्रिश्चन लोकांना हे सत्य स्विकारण एककाळी कठीण गेल हे ठिक पण आजही आमेरीकेत फ्लॅट अर्थ सोसायटी आहे ज्यांच्या मतानुसार पृथ्वी सपाटच आहे. हा विनोद नाही आजच्या काळात अत्यल्प असेल पण एका अत्याधुनिक राष्ट्रातलेही काही नागरीक का होईनात वस्तुस्थितीस नाकारतात.

चिंता

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 23/02/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
''वंदनाला दोन दिवस फोन करत आहे पण ती उचलत नाही . mobile वर काहीच उत्तर येत नाहीये . तू जरा तिला फोन करून बघ ना. आणि मला कळव.'' मी केलेला फोन उचलला गे ला नाही तेव्हा वंदनाच्या मुलाला फोन केला .

कोकण दर्शनासाठी पर्याय सुचवा

लेखक वात्रट मेले यांनी रविवार, 23/02/2014 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एप्रिल महिन्यात परीक्षा संपतात म्हणून कोकण वारी करण्याचा मानस आहे. साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जाण्याचे ठरवले आहे. ३/४ दिवसांची झकास कोकण सहल होईल असे काहीतरी सुचवा. मी नाशिकला असतो म्हणून पर्याय सुचवताना नाशिकचाही विचार करा आणि राहण्यासाठी स्वस्त असे पर्याय पण सांगा.

उभारी देणारे असे काही

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 23/02/2014 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
struggle शब्दाचा एक लोचा आहे . आपल्याकडे हा शब्द आर्टस ला admission घेणाऱ्या , नाटक -चित्रपट क्षेत्रात career करू इच्छिणार्यां आणि दहा ते पाच ची चाकोरी सोडून वेगळी वाट चोखाळणार्या लोकाना उद्देशुन वापरला जातो . मुळात मला अस वाटत की प्रत्येकजण हा त्याच्या / तिच्या पातळीवर एक struggle करतच असतो. म्हणजे बापाशी बिघडलेले संबंध पुर्ववत करण्यासाठी धडपडणारा पोरगा हा एक struggle च करत असतो . नौकरी मध्ये बॉस आपली ठासत आहे हे कळत असून पण नौकरी टिकवण्यासाठी धडपड करणारा मध्यमवर्गीय माणूस पण रोज संघर्ष करीतच असतो.