काही फोटोग्राफी प्रयत्न
मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे.
अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा
उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.
बौद्धिक कृष्णविवर
बौद्धिक कृष्णविवर:
लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते.
बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४]
युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.
भयकारक भानगड
माझा भुताखेतांवर किती विश्वास आहे, हे मलाच माहिती नाही. भुतासारखी अक्राळविक्राळ माणसे बरीच भेटली. त्यांना सहन केल्यामुळे कदाचित भीती थोडी कमीही झाली असेल. पण खरे सांगायचे तर, अतींद्रिय शक्ती या विषयावर माझे मत अजून तयार व्हायचे आहे. अर्थात भुताटकी म्हटले की कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला आकर्षण वाटतेच. कदाचित त्यामुळेच राजस्थानमधील "झपाटलेला" भानगड किल्ला पाहायची सुप्त इच्छा फार दिवसांपासून होती.
आंतरजालावर भानगडबद्दल अनेक चर्चा होत असतात. 'सनसनी' टाईपचे टीव्ही शो सुद्धा इथे कॅमेरे घेऊन येऊन गेलेले आहेत.
ए फ्यांड्री SSSS ईई ..
ए फ्यांड्री SSSS ईई ..
अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..
"ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.
यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.
दुसर्याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?"
तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे .....
अहमदाबाद-गांधीनगर_१
तर मग ठरले! अचानक मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपभोग घेण्याचा निश्चय करूनच कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यास सुरुवात केली. त्याचे झाले असे कि १६ फेब्रुवारीला महारक्तदान असल्यामुळे कॉलेजमध्ये पाटी टाकावी लागली. त्याची भरपाई सुट्टी मंगळवारी व बुधवारी शिवजयंती असा भांगयोग नशिबात कधी नव्हे तो जुळून आला. पण हे सगळे सोमवारी दुपारी कळले. त्यामुळे नशेतच सगळे विचारचक्र घुमू लागले. पहिल्यांदा खिशात हात घातला व सुटकेचा निश्वास टाकला. मग सगळ्यात पहिल्यांदा ओरंगाबादचा विचार आला पण ते इथे पलीकडेच असल्याने जेवढ्या लवकर आला त्याच वेगात निघून गेला.
भुजबळचा भयानक भ्रष्टाचार!
भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी.
http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trou…
वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे.
गणपत आणी कोंबड्या
गणपत आणी कोंबड्या
गणपत गावातील गरीब माणूस होता. त्याचे कोंबड्या वर प्रेम होते. त्याची स्वताची एकही कोंबडी नव्हती, परंतु त्याच्या आजू-बाजू ला बरयाच कोंबड्या होत्या. ह्या कोंबड्याना बघून तो खूप आनंदी होत असे. कधी कधी ह्या कोंबड्याना तो दाणे टाकीत असे.
कोंबड्याना दाणे मिळाल्यामुळे त्या पण गणपत वर खूप खुश होत्या. त्याने टाकलेले दाणे कोंबड्या लगेचच फस्त करीत. ह्या सगळ्या
कोंबड्या मध्ये काही कोंबड्या रोज एक अंडा देत. काही कोंबड्या फक्त दाणे खात पण अंडी देत नसत. अश्या कोंबड्याचा गणपतला खूप राग येइ.
सगळ्या कोंबड्यानी दिलेल्या अंड्या मधून गणपत फक्त एक अंडा रोज उचलत असे.
गुडबाय, अमेरिका!
अमेरिकेतले आता काहीच (७) दिवस राहिलेत आणि इथे घालवलेल्या या ६.५ महिन्यांच्या वास्तव्यातील आठवणी मनात येत आहेत. भारतात परत गेल्यावर त्या आणखी जास्त येतील...सुरुवातीला थोडी धास्ती होती. लक्ष्मण देशपांडेंच्या 'वर्हाड निघालंय लंडनला' मधल्या "कस्स होईल? क्काय होईल?" सारखी मनस्थिती होती. पहिल्यांदाच बायकोला सोबत घेऊन इतक्या लांबचा प्रवास आणि वास्तव्य करणार होतो. इथे येऊन पोहोचलो आणि सगळं सुरळीत होत गेलं. माझ्या एका सहकार्याने (गगन) माझ्या नावावर आधीच अपार्टमेंट घेऊन ठेवलं होतं; त्यामुळे हॉटेलात न राहता आम्ही सरळ आमच्या अपार्ट्मेंटमध्ये रहायला आलो.
मिसळपाव