Skip to main content

शेजारचा फँड्री !!!

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 26/02/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
फँड्रीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो हे माझे अगदी ठरले होते. सर्वात मागच्या दोन रांगांमध्ये आराम खुर्च्या आहेत. त्यामुळे मी आणि बायको आरामात सिनेमा सुरु होण्याची वाट बघत मस्त रेललो होतो. पहिला शो असूनही गर्दी ब-यापैकी होती. नागराजला - फँड्रीचा कथा लेखक आणि दिग्दर्शक - लगेच SMS करून अभिनंदन केले. " nashikacha pahilaach show full ! Congrats Nagraj !!!. सिनेमा सुरु झाल्यावर नेहमी प्रमाणे लोक येतेच होते.

हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास

लेखक वैनतेय यांनी बुधवार, 26/02/2014 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकार मंडळी, राम राम! बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न... १. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात? २. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात? वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा.

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 26/02/2014 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

इंटरनेट चे भविष्य

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 26/02/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ३

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 26/02/2014 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे लेखन लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १ लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २ प्रश्न क्रमांक ९ खालीलपैकी कोणते विद्यमान मुख्यमंत्री दुसर्‍या राज्यातून लोकसभा निवडणुक लढवून निवडून आले? (अधिक स्पष्ट करायला-- समजा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राबाहेरील लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवून जिंकून आले तर ते या गटात बसतील) अ. मुलायमसिंग यादव ब. उमा भारती क. देवीलाल ड. लालूप्रसाद यादव इ.

एक झुंज तणावाशी!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/02/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालत असताना एक भिंतीवर चिटकवलेली जाहिरात नजरेस पडली. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची. तसा रोजच्या संभाषणांमध्ये असंख्य वेळा आपल्या बोलण्यात हा शब्द येतो, ‘स्ट्रेस’, पण त्या संकल्पनेवर हवा तेवढा स्ट्रेस देत नसावं कुणी. म्हणूनच कदाचित अशा कन्सल्टंट्सचा जन्म होतो. पण मग हे कन्सल्टंट्स काय सांगत असावेत? असं तर नक्कीच काही नसेल जे आपल्याला ठाऊक नाही. हं, पण आपण आत्मसात केलेलं नाही असं बरंच काही असेल. असे विचार मनात चालू होते. मुळात ताण किंवा स्ट्रेस हा एखाद्या आजारासारखा असतो. जसा एखाद्या विषाणूचा प्रतिकार करण्यास माणसाचं शरीर असमर्थ ठरतं आणि मग आजार उद्भवतो.

तसा मी... असा मी, आता मी - १

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 25/02/2014 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा 'मी' होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता हे उघड होते. त्यावेळी माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, 'असा मी' चा 'तसा मी' होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले.

सही रे सही....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 25/02/2014 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख तद्दन फालतू आणि विनोदी आहे.जास्त विचार न करता लिहीलेला आहे.तस्मात ज्यांना खूप विचार करून लेख लिहायला आणि अति विचार असलेलेच लेख आवडतात, त्यांनी हा लेख वाचू नये. =============================================================== गेली ३/४ वर्षे मिपावर वाचनमात्र होतो आणि मग एक दिवस मिपाचे सदस्यत्व घ्यावे असे वाटले.अर्ज केला आणि तो पास पण झाला.बाकी सगळी माहिती भरली पण ही "सही"ची भानगड काही सुटत न्हवती.इतरांच्या सह्या बघून झाल्या.पण सहीचे कोडे काही सुटत न्हवते.३/४ दिवस असेच गेले.आमची ही अवस्था, आमच्या बायकोच्या लक्षांत आली, आणि तिने सरळ आम्हाला घेवून बाबांचा आश्रम गाठला. त

चिंचेचा भात (tamarind rice ) आणि कलिंगड रायता

लेखक आरोही यांनी मंगळवार, 25/02/2014 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
चिंचेचा भात (tamarind rice ) कालच्या कारल्याच्या काचऱ्या खाऊन आणि काही लोक पाहून तृप्त झाले आहेत ,काहींची तोंडे कडू झाली असतील तर आज मुद्दाम काहीतरी आंबट चिंबट खाऊया ...चालेल न . चला चला चिंचेचा भात आणि कलिंगडाचा रायता बनवूया ... त्यासाठी साहित्य लागेल : बासमती तांदूळ २ वाट्या ,चिंचेची पेस्ट २ चमचे ,प्रत्येकी अर्धा चमचा मुगदाळ आणि चणाडाळ २० मी.

आज जानेकि जिद ना करो

लेखक शरद यांनी मंगळवार, 25/02/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज जाने की ज़िद न करो यूं ही पहलू में बैठे रहो हाय मर जायेंगे हम तो लुट जायेंगे ऐसी बातें किया न करो तुम ही सोचो ज़रा क्यूँ न रोके तुम्हें जान जाती है जब उठके जाते हो तुम तुम को अपनी क़सम जान-ऐ-जान बात इतनी मेरी मान लो वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर चन्द घड़ियाँ यही हैं जो आज़ाद हैं इन को खो कर मेरी जान-ऐ-जान उम्र भर न तरसते रहो कितना मासूम-ओ-रंगीन है ये समा हुस्न और इश्क की आज मैराज है कल की किस को खबर जान-ऐ-जान रोक लो आज की रात को जिद ..हट्ट, दुराग्रह. पहलू .. कूस. जान-ए-जान ..प्राणप्रिया. मासूम ..निष्पाप. समा ..दृष्य, देखावा हुस्न ... सौंदर्य, मैराज ...