आज गजर दोनदोनदा रिसेट केला, अंथरुणातनं उठायचा अगदी कंटाळा आला होता. सवापाच झाले तसं डोळे उघडले आता उठलो नाही तर पुढच्या प्रवासाचे तीन तेरा वाजणार एवढं नक्की होतं. होय नाही करता पटापट आवरुन निघालो, कधी नव्हे ती रिक्षासुद्धा घराबाहेर पडल्या पडल्या मिळाली.
लोकलने कर्जत गाठलं. इंद्रायणीच्या डब्यांच्या स्थितीबद्दल स्पीकर कलकलत होता. बरेचसे हुंबैकर पेंगुळलेल्या डोळ्यांनी इंद्रायणीची वाट बघत होते. गाडी आली, माझ्या जागेवर आधीच एकजण बसला होता. रिझर्वेशन आहे म्हणताना तो उठला आणि मला जागा मिळाली. अर्थात ती मिळणारच होती.