मित्रांनो,
दै. 'लोकमत' च्या दर बुधवारच्या 'युरेका' या पुरवणीत डॉ. साने मॅडमचे वृक्षपरिचयाचे लेख येत आहेत. दि. ११/०९/२०१३ च्या पुरवणीत कमळाबद्दल मस्त लेख आलाय तो इथे मुद्दाम देत आहे....
'पद्मपुराण'..........
'इचिरो ओहगा (Ichiro Ohga) एक जपानी तज्ञ. गोष्ट १९५० ची. त्यांना कोळशाच्या दलदलीत काही बिया सापडल्या. 'कार्बन १४' या कालमापन पद्धतीनं ओहगा यांनी त्या बियांचं वय आजमावलं. ते निघालं अंदाजे दोन हजार वर्षे. ओहगा महाशयांनी नंतर या बियांवर काही संस्कार करून, त्या रुजवल्या. बिया रुजल्या. रोपं उगवली. ओहगांनी ती दलदलीत लावली. आश्चर्य म्हणजे, या रोपांच्या छान वेली वाढल्या. त्या वेलींवर कमलपुष्पं फुलली. ओहगा तर या फुलांचं वर्णन करताना कवीच झाले. कमळाची कळी त्यांना 'साके' या मद्याची सुरई वाटली. दुसर्या दिवशी कळी उमलून त्याचा पेला झाला. तिसर्या दिवशी वाडगा, तर चौथ्या दिवशी बशी.
प्राचीन भारतीय संकल्पना आहे, की कमल-वेल अर्थात पद्मकमल अमर आहे. प्रत्येक देवतेच्या मूर्तीच्या पार्श्वभागी एक महिरप, कमान असते. त्या कमानीच्या तळाशी प्रत्येक बाजूला एक अक्राळ विक्राळ मुख असतं. हे मुख म्हणजे मकर, अर्थात मगरीचं तोंड. म्हणून हे मकर, किंवा मखर, (तोरण). या प्रत्येक तोंडातून एक वेल फुटलेली असते. मूर्तीच्या शीर्षस्थानी या दोन्ही वेली एकमेकांना मिळतात. मकराच्या तोंडापासून निघालेल्या वेली या कमलवेली मानल्या जातात. मगर (मकर) जशी दीर्घजीवी, तशीच कमलवेलीही. ओहगांच्या प्रयोगावरून कमलवेलीचं दीर्घजीवित्व सिद्ध झालं आहे. बियाण्यांच्या स्वरूपात का होईना, सुप्तरुपानं कमलवेल टिकून राहिली होती.
या कमळाचं शास्त्रीय नाव नेलम्बो, म्हणजे आपलं पद्म.


वाचने
3768
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान शास्त्रीय माहिती.
कमळ हे अमर असते,ही माहिती
In reply to छान शास्त्रीय माहिती. by आयुर्हित
कमळ हे अमर असते,ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे. छान शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.+७८६आपले संसारिक जीवन असेच हवे.
In reply to छान शास्त्रीय माहिती. by आयुर्हित
आता बस्स कि राव!
In reply to आपले संसारिक जीवन असेच हवे. by आत्मशून्य
स्टेपल धागा
एक रीपोर्ट सापडला इथे http:/
फारच किचकट
मी पण इथे अत्यल्प असे काहीसे
In reply to फारच किचकट by शशिकांत ओक
+१
In reply to मी पण इथे अत्यल्प असे काहीसे by प्रचेतस
बरोबर
In reply to मी पण इथे अत्यल्प असे काहीसे by प्रचेतस
सुरेख .....
काही
उद्बोधक माहिती
In reply to काही by कंजूस
हे पटतंय .
सुंदर ते ध्यान !
वा वा ... आनंदाचे डोही आनंद तरंग....