मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घारापुरीचे शैवलेणे - मिपाकरांसोबत

प्रचेतस ·
a बरेच दिवस घारापुरी भ्रमंतीसाठी योजना आखणेच चालले होते पण प्रत्यक्ष जाणे काही दृष्टीपथात येत नव्हते. अचानक मुविंच्या एका मुंबई कट्ट्याच्या धाग्याच्या निमित्ताने उचल खाल्ली आणि मुविंशी संपर्क करून १ किंवा ८ मार्च अशी दोलायमान अवस्थेत असलेली भ्रमंतीची तारीख १ मार्च २०१४ अशी पक्की ठरवली आणि या निमित्ताने पुणेकर आणि मुंबईकरांच्या हृद्य भेटीचा योग जुळवला गेला. शेवटी १ तारखेची पहाट उजाडली.

तू अता ये याच रस्त्याने तुझ्यापाशी ...

drsunilahirrao ·
लेखनविषय:
हात भाग्याने न माझा सोडला होता तूच तेव्हा पाय माझा ओढला होता ! पाळला मी शब्द माझा तो युगानुयुगे ... तूच जन्माचा शिरस्ता मोडला होता ! मी तुझी अवलोकिली गात्रातली जादु मी तुझा मग हात हलके चोळला होता ! तू अता ये याच रस्त्त्याने तुझ्यापाशी ... काल मी मजपासुनी तो जोडला होता ! तू अता शपथेवरी हे सांगते आहे: परवलीचा शब्द अपुला फोडला होता ! चित्रगुप्ताची लिहू ये चोपडी आता तू स्वतःचा काल गुन्हा खोडला होता ! भक्त भगवे पळुन गेले चोरवाटेने मेघश्यामल देव त्यांनी झोडला होता! डॉ.सुनील अहिरराव

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

राजघराणं ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख ) आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला . पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती .

भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे?

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l (भगवद्गीता ६.२३ व २४) अर्थ: भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

साहिर

रामदास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कवि माझा मित्र होता. मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती. तो म्हणाला " मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "* मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली आणि विधात्याने पण मान्य केली. आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही. कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात , त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ? * साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी . *संजोपरावांचे आभार.

सन्मान बीच रिसॉर्ट(वर्सोली बीच)

त्रिवेणी ·
तस माझ मिपावर आणि एकुणातच लिखाण खुप कमी असते. थोडीशी लुडबूड फक्त पाककृती विभागात होते तेवढेच. तर आता भटकंतीमध्ये थोडा प्रयत्न करते तो गोड मानून घ्यावा ही विनंती. बरेच दिवस कुठे बाहेर जाणे झाले नव्हते, म्हणुन जवळच कुठेतरी जावु या असा विचार केला. मध्ये मितान ताई वेळासला जावून आली होती आणि आता तिथे कासव बघायला(आता तिथे खुप कासव असतात म्हणुन) जावु असा विचार करून मितानताईला फोन केला कुठे थांबली होतीस वै. विचारायला पण तिच्या कडून कळले की रस्ता खूपच खराब आहे सो तो प्लान कॅन्सल करून अलिबाग ठरवले.

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

माहितगार ·
व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात. half filled glass ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात.

श्यामची आई..

अत्रन्गि पाउस ·
परवा पुस्तके आवरतांना १९७७ साली वाढदिवसाला मिळालेले श्यामची आई हे पुस्तक समोर आले... ह्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे पुढे चित्रपट (राष्ट्रपती पदक मिळाले वगैरे) आणि एकूणच मराठी साहित्यात काही विशेष स्थान आहे वगैरे उल्लेख येत असत... माझी आई काही विशेष होती तिने माझ्यावर अत्यंत उच्च संस्कार केले माझ्यासाठी त्याग केला...वगैरे वगैर.... परंतु अत्यंत सर्वसामान्य घरगुती घटनांना विलक्षण तीव्र भावनांची फोडणी देवून सतत वाचकाच्या (ते हि बाल वाचकांच्या)मनाशी अक्षम्य आणि भडक खेळ करणारे पुस्तक असे माझे पहिल्यापासूनच मत झाले होते. अत्यंत कारुण्यपूर्ण नैराश्युक्त वातावरण..सतत मानसिक दबाव /खच्चीकरण/ गरीबीचे व

*** Light डान्स ***

मदनबाण ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता. आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल. एन्जॉय...

जीवनगाणे - ६

सुधीर कांदळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जीवनगाणे - १ जीवनगाणे - १ जीवनगाणे - २ जीवनगाणे - २ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ३ जीवनगाणे - ४ जीवनगाणे - ४ जीवनगाणे - ५ जीवनगाणे - ५ प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या पोलो खेळाडूंना आता जेम्स वॉटसनच्या रूपाने एका अस्सल पोलो खेळाडूची साथ मिळाली होती. जेम्स डिवी वॉटसन.