सन्मान बीच रिसॉर्ट(वर्सोली बीच)
तस माझ मिपावर आणि एकुणातच लिखाण खुप कमी असते. थोडीशी लुडबूड फक्त पाककृती विभागात होते तेवढेच. तर आता भटकंतीमध्ये थोडा प्रयत्न करते तो गोड मानून घ्यावा ही विनंती.
बरेच दिवस कुठे बाहेर जाणे झाले नव्हते, म्हणुन जवळच कुठेतरी जावु या असा विचार केला. मध्ये मितान ताई वेळासला जावून आली होती आणि आता तिथे कासव बघायला(आता तिथे खुप कासव असतात म्हणुन) जावु असा विचार करून मितानताईला फोन केला कुठे थांबली होतीस वै. विचारायला पण तिच्या कडून कळले की रस्ता खूपच खराब आहे सो तो प्लान कॅन्सल करून अलिबाग ठरवले. ट्रीप adviser वर सर्च करून हॉटेल सन्मानला फोन केला बुकिंगसाठी तर त्यांनी संगितले ½ तासात बघून सांगतो, मला वाटले की बहुतेक नाही करणार फोन, पण खरच सांगितल्याप्रमाणे ½ फोन आला आणि त्यांनी फेबमधले सर्व Friday-sat. फुल्ल आहेत म्हणुन संगितले. मग विचार करून रविवार –सोमवारचे बुकिंग करून टाकले.
रविवारी सकाळी 5:30 ला घर सोडले आणि 9:00 वाजता अलिबाग बीचला पोहोचलो. त्यावेळी ओहोटी होती आणि बरेच लोक पायी किल्ल्यात जाताना दिसत होते पण माझ्या चालण्याच्या क्षमतेची पुर्ण जाणीव असल्याने घोडागाडीतून ठरवले
400 रुपयात जावून येवून.
आता मुक्कामच्या ठिकाणी जायचे असल्याने हॉटेलला फोन लावला नक्की कसे यायचे म्हणुन. तर त्यांच्या कडून रीप्लाय आला तुम्ही आता आहात तेथेच थांबा, तुम्हाला घ्यायला येतो. 15 मिनिटात एकजण 2 व्हीलरवर घ्यायला आहे(मी नाव विसरले त्यांचे).
सन्मान बीच रिसॉर्टचे सी फेसिंग 3 एसी रूम्स आणि 3 एसी cottages आहेत(फक्त कॉटेज नो 6ला थोडा sea view) आहे.
रूम नं. 2ला सर्वात चांगला sea view मिळतो.
मलातरी खुप चांगले वाटले हे रिसॉर्ट आणि स्टाफ सुद्धा खुप चांगला आहे.
मुंबई, पुणेकरांनी एकदा जायला हरकत नाही.
वाचने
10336
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
मी पिकासावर फोटो टाकताना 640
In reply to मी पिकासावर फोटो टाकताना 640 by त्रिवेणी
पिकासासोफ्ट्वेअरमध्ये फाईल
रिजॉट छान दिसतंय .काही रेटचा
३५०० रूमचे आणि बहुतेक ३०००
छान फोटो
छान फोटू व राहींनी दिलेली
छान माहिती. फोटोही मस्त!
वाव! सॉलिड आहे. आराम करायला
आहा!
मस्त आहेत फोटो ..खरेच बीच वर
तिकडचं जेवण कसे काय आहे ते
मौ ताई,
व्वा व्वा मजा केलेली दिसतेय..
छान आहेत फोटो, अर्थात जागाही,
सुन्दर
मस्त आलेत फोटो!
मस्त!
आंजर्ले बीच
फोटो
In reply to फोटो by नितिन५८८
ही लिंक उघडल्यावर खालील मेसेज
अलिबागला ३ वर्ष राहिलोय.
छान झकास वृतांत अन सुंदर फोटो
सर्व छायाचित्रे सुंदर.