मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती

राजघराणं ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

तुमचे पूर्वज किती ?

स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे . चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप असू द्या . आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत .

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ८

स्पार्टाकस ·
नील बिडलमन ११ मे च्या संध्याकाळीच आपल्या तुकडीतील सदस्यांसह साऊथ कोल उतरुन कँप ३ वर पोहोचला होता. सुमारे २५००० फूट उंचीवर पोहोचल्यावर त्याने सँडी हिलला डेक्सामेथासनचं आणखीन एक इंजेक्शन दिलं. ल्होत्से धारेच्या खालच्या उतारांवर ते पोहोचत असताना त्यांच्या मदतीला येत असलेल्या बेपाळी मोहीमेतील शेर्पांशी त्यांची गाठ पडली. त्या शेर्पाच्या सहाय्याने ते खाली उतरत असतानाच अनपेक्षीतपणे संत्र्याच्या आकाराच्या दगडांचा एक लोंढाच ल्होत्से धारेच्या वरच्या उतारांवरून गडगडत आला ! त्यातील एक दगड नेमका एका शेर्पाच्या डोक्यावर येऊन आदळला ! त्या आघातामुळे तो शेर्पा तत्काळ बेशुध्द झाला आणि उतारावर घसरू लागला !

ये क्या रे, घोडा बोला... फिर चतुर बोला... फिर घोडा....

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या लोकसभा निवडणुकीतील एक एक मजेशीर घटनांचा संदर्भ लावताना वात्रटपणाची उबळ येते. 1 पडोसन मधील स्वामी पिलैची सूर पकडायची तारांबळ आठवते. त्याची तिरपिट झालेली पाहून... आजकाल एकेकाळी विलक्षण लोकप्रिय नेत्यांची तळ्यात का मळ्यात अशी नाचानाच पाहून मजा वाटते. नातवंडांना पंचवंडांना खेळवायच्या आयुष्याच्या वळणावर पुन्हा विवाहाची हुक्की येणारा बाप जसा घरच्यांच्या अवमानाला कारणीभूत होतो तसेच काहीसे - इतके करून जर पदरात काही पडले नसेत तर - हे नाचरेपण वाटते. बर या अशा धेंडांना नव्या मंत्रीमंडळात खाती तरी कुठली देणार?

मुक्काम व पोष्ट वाडे- २

kurlekaar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- मु. पो. वाडे ४ –लायब्ररी तेंव्हा कोंकणात कांही मोजक्याच गांवांत हायस्कुल असायचं. हायस्कुल असलेलं गांव प्रगत समजलं जायचं. वाड्याला तेंव्हा हायस्कुल होतं एवढंच आठवतंय. मी स्वतः तेंव्हा मराठी शाळेत म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत बहुधा असणार आणि तेंव्हा हायस्कुल कडे पाहणं म्हणजे हायस्कुलवाल्यांनी कॉलेज कडे पाहण्यासारखं होतं. गेल्या वर्षी पाहिली ती हायस्कुल ची इमारत मात्र गोरी गोमटी-मध्यमवर्गीय वाटली—almost माझ्या लहानपणी पार्ले किंवा गिरगावातली एखादी शाळा असावी तशी. वाडयात शिक्षणाचं वारं बहुधा स्थानिक ब्राह्मण वर्गाकडून आलं व ते बरीच वर्षे त्याच वर्गाने टिकवुन धरलं.

भटकंती - ६ खेलखेलमें..

इन्ना ·
लेखनविषय:
भटकंती- ६ खेलखेल में काल एकटाकी लग्नाच्या बुंदी पाडल्या ,लगोलग फोटोही टाकता आले . पण बुंदीचा झारा थांबायच नाव घेत नाहीये. म्हणून आज खेल के मैदान में. २०१२ च्या उन्हाळी सुटेत मी , माझा लेक , माझी मैत्रीण आणि तिची लेक असे गर्मनीच्या दौर्‍यावर गेलो होतो. टिनेजर मुल बरोबर त्यातही जर्मनी ला जातोय त्यामुळे गाड्या आणि फुट्बॉल अजेंडावर होतच. एक आर्कीटेक्ट म्हणून माझ्या लिस्टीत २ स्टेडियम होती . केव्हापासून पाहायची होती. फिरून अनुभवायची होती. हळूच मी , मैदानं बघायचीयेत ना ही पण दोन बघून टाकू म्हणून ऐनवेळी घुसवली. जर्मनी मधे २ वेळा ऑलिंपिक होस्ट केल गेल. नव्यानी स्टेडियम्स बांधली गेली.

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ५

मराठी कथालेखक ·
लेखनविषय:
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981 भाग ४ - http://misalpav.com/node/27025 ५) "प्यार मिला प्रीत मिली मेरे यार को ,बड़ी प्यारी जीत मिली मेरे यार को" अनिल एका प्रेमभंगाच्या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. पण काहिशा एकलकोंड्या अनिलचे कशातच मन लागत नव्हते. दिवसा नोकरीच्या ठिकाणि वेळ निघून जाई. पण नंतर एकलेपणाचा त्रास होई. सिगारेटी फुंकूनही चित्त था-यावर रहात नव्हते. शेवटी काहीतरी सकारात्मक करावे असा त्याने विचार केला.

नरेंद्र मोदींच्या रुपाने भाजपचे 'ओबिसी' राजकारण.

नानासाहेब नेफळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते.

"चिडकी चिऊताई -" (बालकविता)

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
खिडकीत दिसली चिऊताई बाळाची बोलावण्याची घाई "ये ये" म्हणाला हात दाखवून "खाऊ घे" म्हणाला खिडकीतून - चिऊताई होती फारच चिडकी समोर दिसली बंद खिडकी चोच आपटली खिडकीवर टकटक केली काचेवर - बाळाने उघडली हळूच खिडकी पटकन शिरली चिऊताई चिडकी बाळाने दाखवला लाडूचा खाऊ चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ - बाळाने मुठीत लाडू लपवला बाळ हळूच खुदकन हसला - चिडकी चिऊताई खूप चिडली खिडकीत "चिव चिव " ओरडली . . .

अरविंद बरोबर दीड तास!

संजय क्षीरसागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली.