मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सूर्य थकला आहे

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई

डावे-उजवे

विकास ·
सध्या मेधा पाटकर यांनी राजकारणप्रवेश केल्याने त्यांना जरा माध्यमांकडून आदरयुक्त वेळ मिळत आहे असे वाटते. त्यात त्या आपकडून निवडणूक लढवत असल्याने तर काय दुधात साखर! अर्थात, त्यांच्या काही मुद्यांवर माझा जरी आक्षेप असला तरी त्यांच्याबद्दल आदर आहे. काल त्यांची एनडीटीव्ही वर बरखा दत्त यांनी तरूण स्त्री-पुरूषांच्या समोर घेतलेली मुलाखत पाहीली. काहीवेळेस स्वतःच्या डाव्या विचारसरणीस प्रामाणिक तर काही वेळेस आप ची बाजू घेत राजकारणी वृत्ती दाखवणे असे दोन्ही चालले होते.

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९

स्पार्टाकस ·
एव्हरेस्टच्या वायव्य धारेवर तिबेटच्या बाजूने चढाई करण्यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि जपानी फुकोका मोहीमेव्यतिरिक्त इतरही अनेक मोहीमा शिखरावरील चढाईसाठी तळ ठोकून होत्या. मात्रं यापैकी कोणीही १०-११ मे रोजी चढाईचा प्रयत्न केला नव्हता ! इंग्लंडच्या चॅनल ४ - हिमालयन किंगडमची मोहीम एव्हरेस्टच्या पायथ्याला होती. सायमन लोवेच्या नेतृत्वाखालील या मोहीमेचं प्रमुख उद्दीष्ट ब्रिटीश अभिनेता ब्रायन ब्लेस्डच्या एव्हरेस्टवरच्या चढाईचं चित्रीकरण हे होतं. गाजलेला ब्रिटीश गिर्यारोहक अ‍ॅलन हिंक्स या मोहीमेचा भाग होता.

शिद्दत

वेल्लाभट ·
लेखनप्रकार
गेल्या महिन्यात सावरकर जयंती होऊन गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य समर्पित केलेल्या असंख्य सेनांनीपैकी हा एक सेनानी, विनायक दामोदर सावरकर. एक युगपुरुषच म्हणावा लागेल; एक देवाचा अवतार. असीम देशभक्ती आणि ध्येयाचा पुतळा. अंदमान मधील तुरुंगात असताना त्यांनी जे हाल सोसले, ते वाचतानाही अंगावर काटा येतो. त्यांनी ते प्रत्यक्ष कसे सोसले असतील त्यांनाच ठाऊक. असेच आतोनात हाल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाने कमी अधिक प्रमाणात सोसले होते.

विकासक्रम भाषा आणि लिपीचा!

माहितगार ·
लोकप्रभा मासिकाच्या २८ मार्च करताच्या अंकात विकासक्रम भाषा आणि लिपीचा! हा मनोहर भिडेंचा माहितीपूर्ण लेख आला आहे. यात प्राच्य विद्येच्या अंगाने भाषा आणि लिपींच्या विकास क्रमाचा विचार केला आहे. यातील सातव्या मुद्द्यात ऋग्वेद पुर्व कालीन संस्कृत भाषेचा प्रमाण भाषा म्हणून विकास कसा केला गेला असावा याचे ससंदर्भ रोचक विवेचन आले आहे.

निमंत्रण --- आई आणि मी.. मस्त टीम!

इनिगोय ·
उन्हाळी सुट्टी म्हणजे कैर्‍या, आंबे, कॅरम, पत्ते, भटकंती आणि अर्थातच उन्हाळी शिबीरही! त्यातून हे शिबीर जर आई आणि मूल या दोघांसाठीही असेल तर? ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना आपल्या आईची वेगळी ओळखही यातून घडेल आणि एरवी आईचा पुरेसा न मिळणारा वेळही मनसोक्त मिळेल.

नरेन्द्र (मोदी) वर्सीस नरेन्द्र (रावत)

संतोषएकांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाजपाच्या तीसर्या यादीत नरेन्द्रमोदी वडोदराहून नीवडणूक लढणार हे निश्चित झाल्यावर वडोदरा शहर-जिल्ल्याची लोकं खूपच एक्साइट आहेत. अमदावाद, वडोदरा, राजकोट, सुरत आणी गांधीनगर अशा पाच जागे वरचे भाजपा कार्यकर मोदींची मागणी करुन त्यांना प्रचंड बहुमतांने विजयी करुन देण्याची खात्री पटवून देत होते. पण शेवट फाइनल शिक्का वडोदरावर लागला. कदांचीत मोदींच्या डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांचा तो प्रताप असावा. स्वतःच्या प्रत्येक रेलीत मोदी डाव्या हाताचे दोन बोटं वी च्या शप मधे उचलून वी फॉर वीकटरी असं म्हणत उजव्या हाताने लोकांचं अभिवादन करत असतात.

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

तुमचा अभिषेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती. तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे.

लग्न पाहावे करून

Prajakta२१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?

पवारांची विचार"पूस"

हुप्प्या ·
जाणता राजा ह्या पदवीवर शिवरायांच्या नंतर आपला हक्क सांगणारे, भारतीय लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असे म्हणाले की १७ तारखेला सातार्‍यात राष्ट्रवादीला मतदान करा आणि ती शाई पुसून २४ तारखेला मुंबईत येऊन पुन्हा एकदा मतदान करा! एक व्यक्ती एक मत अशी लोकशाहीची मांडणी होती ती राष्ट्रवादीच्या मतदारांकरता बदलली असावी. जाणत्या साहेबांना काहीही करणे शक्य आहे! अशा प्रकारे एका तथाकथित जबाबदार व अनुभवी नेत्याने असे बिनडोक आणि बेजबाबदार विधान करणे योग्य आहे का? अगदी विनोद म्हटला तरी हा जरा अतीच वाटतो आहे. निवडणूक आयोगाने पवारांची कानउघडणी करणे आवश्यक आहे.