Skip to main content

स्मरण दिन : नानासाहेब पेशवे पहिले

लेखक kvponkshe यांनी मंगळवार, 23/06/2026 18:34 या दिवशी प्रकाशित केले.

२३ जुन १७६१. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर अवघ्या ५ महिने आणि नऊ दिवसात पेशवे बाळाजी बाजीराव भट हे पर्वतीवर निवर्तले.

१७४० ते १७६१ या त्यांच्या काळात मराठा साम्राज्य त्याच्या सर्वोच्च यशाच्या शिखरावर पोहोचले. आणि १४ जानेवारी १७६१ ला त्यावर मर्माघात झाला.

आधीच आजारी असलेले नानासाहेब पराभवाच्या, बंधू आणि पुत्रशोकाने खच्ची झाले त्यातच त्यांचे निधन झाले.

काहींनी त्यांना सर्वात चाणाक्ष पेशवा म्हणून गौरवले, तर अनेकांनी त्यांच्या वर कोकणस्थांची नेहमी बाजू घेणे, तुळाजीच्या अधिकारातील आरमाराचा इंग्रजांच्या मदतीने नाश करणे, पानिपतावर अडकलेल्या सैन्याच्या मदतीला वेळेवर न जाणे , त्यांचे त्याकाळातलं विवाह प्रकरण, या आणि अशा अनेक आरोपांनी त्यांना टिकास्नान घातले.

हा पेशवा किती महान होता किंवा किती वाईट होता हे ठरवण्याची बौद्धिक पात्रता माझी नाही.

पण सातारा आणि कोल्हापूर या छत्रपतींच्या दोन गाद्या एक करण्याच्या या पेशव्याच्या प्रयत्नांना यश यायला हवे होते अशी खंत वाटते.


No photo description available.


वाचने 411
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मनोहर माळगावकर यांचे फार पूर्वी एक पुस्तक वाचल्याचे आठवते. आता ते कुथाळ्याal नानासाहेब पेशवे वर होते नेमके आठवत नाही. पण  काश्मीिर मधून त्या दोन मूुली आणल्या का असे  प्रेशवे विचारतात असे बरे लंपट होते असे वर्णन आहे. असे आठवते 


करून आलो. 

 

हा पेशवा किती महान होता किंवा किती वाईट होता हे ठरवण्याची बौद्धिक पात्रता माझी नाही.

 

इतिहासातील व्यक्तिमत्त्व महान होते किंवा नव्हते याचे मुल्यमापन आज करून  कही उपयोग नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे भविष्यावर काय परिणाम  झाला याचा जरूर अभ्यास  व्हावा. व त्याचा आज काय उपयोग होईल याचाही विचार व्हावा .

 

पानिपत वर मराठे लढले म्हणून इतिहास  बदलला. जर दिल्लीत जाऊन  लढले नसते तर काय झाले असते याचा विचार  कुणी करत नाही. ते लढले नसते तर आजच्या भारताचे चित्र वेगळे असते.


पेशवे म्हटले तरी इंग्रजांच्या दृष्टीने मराठा पॉवर होय. आणि मराठा शक्ती इंग्रज, निझाम, मुघल आणि आपलेच लोक ( आंतरिक कलह)या चार शक्तींशी एकाच वेळी लढत होते हे विसरता कामा नये. 


नानासाहेबांची समाधी डेक्कनजवळच्या नदीपात्रात कित्येक वर्षे उपेक्षित अवस्थेत होती. आता सध्या जरा निगा राखली जात आहे.


नानासाहेब पेशवे व सदाशिवभाऊ पेशवे ह्यांचे उदात्तीकरण मला आजीबात आवडत नाही, ह्या दोघांनी मराठी साम्राज्य मातीत मिसळले!

  शिवाजी महाराजांचे स्वप्न जे लाखो मावळ्यांनी आपल्या आहुतीने पूर्ण केले होते, बाजीराव पेशवे प्रथम ह्यांच्या मेहनतीने नर्मदापल्याड गेले होते ते ह्या नाना पेशव्यांनी आपल्या चुकीच्या निर्णयांनी मिटवले. पानीपतवरून पत्रे येणे बंद झाले असताना ह्या माणसाने सैन्य घेऊन तिथे वेळीच पोहोचणे आवश्यक होते, पण पैठण मधे हा ४० वर्षांचा माणूस ९ वर्षाच्या मुलीशी लग्न करत बसला नी तिकडे लाख मराठा बांगड्या फुटल्या.  


मला जरा वेगळीच माहिती सापडली. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या ग्रामाण्यांचा इतिहास या पुस्तकाच्या पान क्रमांक ४१ वर सखाराम हरी नामे योध्याने सदाशिवभाऊंना स्पष्ट सांगितले की तुम्ही उत्तर भारतातल्या मोहिमीवरनं सुखरूप येणं कठीण आहे. खाली माझ्याकडील सदर पानाचे पटचित्र डकवले आहे.

-गा.पै.

पानिपतचे भाकीत

गा.पै. पंत, तुम्ही दिलेला उतारा वाचला. त्यातील  "ग्रामण्य' म्हणजे काय, हे लक्षात आले नाही.  

तसेच "हिंदुस्थानातून परत आल्यावर पाहून घेईन" यावरून उत्तर भारताला त्याकाळी 'हिंदूस्थान' म्हणत असे दिसते, तर हल्लीच्या व्याखेप्रमाणे 'हिंदूस्थान' म्हणजे कोणकोणते प्रांत, आणि तात्कालीन भातातल्या इतर प्रांतांची नावे काय काय होती ? (माळवा, बुंदेलखंड वगैरे ऐकले आहे)  

 

 

 

 

 


In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त,

 

ग्रामण्य म्हणजे एखाद्या जातीचे अवमूल्यन. ठाकऱ्यांच्या जातीस वेद म्हणता येणार नाहीत अशी काहीशी टूम निघाली होती. पेशवेकाळांत सोनार उपाख्य दैवज्ञ ब्राह्मण यांच्याविरुद्धही अशी काही प्रकरणे झाली होती. वेदोक्त की पुराणोक्त हे ही असंच काहीसं प्रकरण आहे.

 

पूर्वी मध्ययुगात केवळ उत्तर भारतास हिंदुस्थान ही संज्ञा लागू होती. तर मधल्या दक्षिणेस दख्खन ( आजचा घाट, खानदेश, विदर्भ, तेलंगण, इत्यादि ) म्हणंत असंत. अतिपश्चिमेस अपरांतक ( = कोकण ) व गोमांतक असायचे. तर अतिदक्षिणेस कर्नाटक ( आजचा तामिळनाडू ) म्हणंत. केरळ व त्रावणकोर असा वेगळ उल्लेख होत असे. पूर्ण भारतास हिंदुस्थान केव्हापासनं म्हणायला लागले याची नक्की माहिती नाही. बहुधा फाळणीपश्चात सुरुवात झाली असावी.

 

आ.न.,

-गा.पै.