लेखकविवेकपटाईतयांनी रविवार, 01/02/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
लांब सडक केंसावरी
हात फिरविला तिने
विग खाली पडली. दर्पणात छवी पाहुनी
जोरात ती हसली
कवळी खाली पडली. उचलताना कवळी
चष्मा पडला खाली
दिसे केवळ अंधार.म्हातारी ग मैना
कर भक्तीचा शृंगार
झाला फिका संसार.
लेखकजेपीयांनी रविवार, 01/02/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळ आणी पॅकेज;काही किस्से १
वेळः साल २००५
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दुष्काळग्रस्तांनसाठी १०७५ कोटीचे पॅकेज जाहिर केले.एकीकडे हे पॅकेज जाहीर झाले व दुसरीकडे सरकारने कापसाच्या हमीभावावर दिला जाणार २०% बोनस रद्द केला.त्यामुळे विदर्भातील शेतकर्यांना पहिल्या वर्षी १७०० कोटी,दुसर्या वर्षी १४०० कोटी तर तिसर्या वर्षी १५०० कोटीचा फटका बसला.
लेखकबटाटा१यांनी रविवार, 01/02/2015 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मोठा मुलगा सव्वा दोन वर्षाचा आहे, त्याची आयपॅड ची सवय घालवण्या खुप प्रयत्न केला पण दिवसातुन थोडावेळ तरी त्याला आयपॅड वापरायचा असतो. आयपॅड ला शिक्षणाचे साधन म्हणून कसे वापराता येईल याचा शोध घेतांना काही चांगली आणि काही बरिचशी पेड अॅप्स मिळाली.
मुलांसाठी चांगली अॅप्स सुचवावी म्हणून हा धागा काढत आहे. सध्या मी माझ्या मुलासाठी वापरत असलेली अॅप्स-
१.
लेखकमुक्त विहारियांनी रविवार, 01/02/2015 05:37 या दिवशी प्रकाशित केले.
कधी-कधी एखाद्या सिनेमात पार्श्वसंगीत म्हणून एखाद्या गाण्याचे तुकडे घुसडल्या जातात.
उदा, "सुहाग" ह्या सिनेमात एका शॉट मध्ये, परवीन बाबीच्या एंट्रीला, "बॉनी-एम" चे "मा-बेकर" ऐकू येते.
आज ओशन्स-१२ परत बघतांना, "लेझर डान्स"च्या वेळी वाजणारे संगीत आठवले,थोडा-फार शोढ घेतला तर, मुळ गाणे पण मिळाले.
हे सिनेमातील पार्श्र्वसंगीत ====>https://www.youtube.com/watch?v=mr834Cs9ncs
आणि
हे मुळचे गाणे =====> https://www.youtube.com/watch?v=kATa1ypyZCQ
तुम्हाला पण असाच काही खजिना मिळाल
लेखकआतिवासयांनी रविवार, 01/02/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, २, ३, ४
इथं आल्यापासून माझी ‘सकाळची शाळा’ सुरु झालीय. दिवस लवकर सुरु होतो इथला – पहाटे चारपासूनच वातावरणात माणसांची चाहूल लागते. माझं नाव सूर्याच्या अनेक नावांपैकी एक असलं तरी आमचं घड्याळ एकमेकांशी जुळण्यात अडचणी येतात.
लेखकवडापावयांनी रविवार, 01/02/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज तिला विचारायचंच, असं मी ठरवलं होतं.
अगदी घट्ट मैत्री झालेली नसली तरी ओळख बर्यापैकी झाली होती. एकाच ग्रुपात होतो दोघंही. एकमेकांशी बोलणं फारसं होत नसलं तरी कधी अवघडलेपण जाणवलं नव्हतं एकमेकांसोबत. शाळेत असल्यापासून मनावर बिंबवलं गेलं होतं की स्त्री-पुरुष हे दोघंही समान आहेत. जी वागणूक पुरुषांना मिळते ती स्त्रियांनादेखील मिळायला हवी. मला हे अगदी मनोमन पटलं होतं आणि मी अजूनही यावर ठाम आहे. म्हणूनच मी जसा माझ्या मित्रांशी बोलायचो तसाच मुलींशीही बोलायचो.
साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस , दहा चमचे साखर , छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.
कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्याचवेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून
लेखकविशाल कुलकर्णीयांनी शनिवार, 31/01/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले
देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले
भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?
आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्याचे वार झाले
वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !
***********************************
(वृत्त:मंजुघोषा)
लेखकअत्रुप्त आत्मायांनी शनिवार, 31/01/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग..
शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे.
पुढे चालू...
=======================
आमचा अनुष्ठानाचा महिना कोणता? तर पौष. दरवर्षीचा अगदी ठरलेला. मग आंम्ही रानातून सदाशिव दादा बरोबर जाऊन लाकडं/फाटी/गाठी आणि येता जाता जेव्हढ्या म्हणून गोळा होतील तेव्हढ्या शेण्या समिधा असं अगदी १ महिना आधिपासून आणून गोठ्यामागे रचायला लागायचो.
लेखकस्वप्नांची राणीयांनी शनिवार, 31/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.