मध्यंतरी जालावरती ऐक पिंक टाकलेली पहिली, गमतीशीर वाटली. इंग्रजी चित्रपटांचे जगप्रसिद्ध डायलॉगस गुजरातीत भाषांतरित केल्यास, किती मनोरंजक होतात हे जाणवले, इथे व्याकरण, भाषांतराचे नियम, वैगरे गद्य गोष्टींना स्थान न देत, केवळ मनोरंजनात्मक हेतू ठेवून, पडलेल्या जिलब्या होत्या. त्याच/ तशाच प्रकारे आपण मराठीत हे जगप्रसिद्ध डायलॉगस भाषांतरित केले तर ? मला गुजराती तसूभरही येत नाही, तरीही अंदाजे याचा अर्थ उमगून मजा वाटली. मराठीत हे किंवा असे डायलॉग तयार करताना, व्याकरण/नियम यांचा बागुलबुवा न करता, कोकणी, वऱ्हाडी, नगरी, पुणेरी, कोल्हा/सोला पुरी, ग्रामीण / शहरी मारांग्लीश शब्द वापरून केले, तर ?