Skip to main content

'आपलेपणाला' / आपला माणूस

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 16/01/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका वृत्तपत्रातील बातमीनुसार खालील बातमी प्रसिद्ध झाली आहे "एखाद्या भारतीयवंशाच्या व्यक्तीने यश प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीचं भारतीयांकडून प्रचंड कौतुक केलं जातं आणि त्याचं हे भारताचंच यश असं चित्र आपण रंगवतो. मात्र भारतीयांच्या या 'आपलेपणाला' लुइसियानाचे गर्व्हनर बॉबी जिंदल यांनी चांगलीच चपराक देत, भारतीयांच्या खोट्या अभिमानाला जमिनीवर आणले आहे. दुहेरी ओळख ठेवण्यात माझा बिलकूल विश्वास नाही, मी पूर्ण अमेरिकी आहे, अशा कडक शब्दात आपण भारतीय वंशाचे आहोत ही ओळख बॉबी जिंदल यांनी खोडून काढली आहे.

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती.

चोराच्या उलट्या .....

लेखक उडन खटोला यांनी शुक्रवार, 16/01/2015 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने ...मोबाईल चोरताना रंगेहाथ एका चोराला पकडला ट्रेन मध्ये, मग हिरो स्टाइल त्याला घेवून दोघे तिघे पोलिस स्टेशन मध्ये गेले .....अपेक्षा हि, कि आता त्याला ताबडतोब आत टाकतील आणि चोप चोप चोपतील. ड्यूटी ऑफिसर शांत पणे म्हणाला, तुमच्या पैकी फिर्याद जर कोणी नोंदवली तरच आम्ही यावर कारवाई करू किंवा याला सोडून देवू ....कामाचा खाडा कोण करेल म्हणून बरोबरचे, निघून गेले. मित्राचा ! स्वतःचा फोन असल्यामुळे आणि तो ही महागडा, त्याने सगळी कारवाई पूर्ण केली आणि साहेबांना विचारले, माझा फोन आता मी नेवू शकतो का ? साहेब म्हणले !

नवे संस्थळः पाहावे मनाचे! तुमचे स्वागत आहे

लेखक पाहावे मनाचे यांनी शुक्रवार, 16/01/2015 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत अनेक प्रकारच्या लेखनाला वाहिलेली काही संस्थळे अस्तित्वात आहेत. त्यावर उत्तमोत्तम ललित लेखन, माहितीपूर्ण लेखन, चर्चा, पाककृती, कथा, कविता इत्यादी अनेक गोष्टींची रेलचेल असते. मात्र एखाद्या विशिष्ट चौकटीत किंवा विषयाला धरून लिहिले जाणारे लेखन, ब्लॉग्जच्या स्वरूपात विखुरलेले आहे. याच दरम्यान, गेल्या महिन्यात आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन आमच्या आवडत्या विषयाला वाहिलेले संस्थळ काढायचे ठरवले - आणि लगोलग बनवले देखील.

श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सव, सनीवेल, कॅलिफोर्नीया अमेरिका

लेखक स्वाजो यांनी शुक्रवार, 16/01/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
॥ गण गण गणात बोते ॥ श्री गजानन महाराज अमेरिका परिवारातर्फे श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव सनीवेल, कॅलिफोर्नीया येथे १४ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ साजरा केला जाईल. श्री गजानन महाराज परिवारातर्फे ह्या सोहळ्याचे आपणा सर्वांना मनापासून निमंत्रण आहे. ह्या उत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे श्री महाराज पालखी सोहोळा, 'पादुका-दर्शन' (श्री पुंडलीक भोकरे ह्यांना दिलेल्या पादुकांची प्रतिकृती) आणी 'नामस्मरण सत्र'. उत्सवाची सांगता भंडार्‍याने होईल. बे एरीयातील भक्तगणांकडून जमवलेल्या 'शिध्यातून' महाप्रसाद रांधला जाणार आहे.

भारतिय लोकं अन व्यवसाय

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/01/2015 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सगळीकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगले वातावरण आहे. इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे अन त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणे सुकर आहे. नवीन विचार, नवीन technology, बऱ्याच व्यवसायांमध्ये disruptive model आलेले आहे. मी इथे कॅलिफोर्निया पाहते आहे किती लोकं किती वेगवेगळ्या दिशेने जग नेत आहेत. लोकं एकमेकांना reference, सल्ला इ. मदत करून प्रचंड प्रमाणात पुढे जात आहेत. यात भारतीय लोक इतर भारतीयांना फारसे मदत करणार्यातले नाहीत हे अगदी लगेच लक्षात आल.

पोरगीपटाव शास्त्राचे नियम

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 16/01/2015 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर - १)A - फक्त प्रौढांसाठी ! यत्ता दुश्ली तुकदी ब च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी ताबडतोब ही टॅब बंद करावी आणि पुढील लेख वाचणे टाळावे . शॉव्हिनिझम शॉव्हिनिझम म्हणुन दांभिक दंगा करणार्‍यांना दुर्लक्षित करण्यात येईल. २) स्टॅच्युटरी वार्निंग - पोरगी पटवणे हे येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे तेव्हा खालील लेखातील गोणत्याही गोष्टींची अंमलबजावणी स्वतच्या रिक्स वरच करावी . ३) माणणीय स्पांडुजींनी लाल रंगाचा डबा संपवला असला तरी मी थोडाफार उरल्या सुरल्या लाल रंगाचा वापर करुन धागा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे . तेव्हा राग लोभ मानु नये .

जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत?

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत एकीकरण करणे होय. किंवा जागतिकीकरण म्हणजे एकाचवेळी सर्व जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे. जागतिकरणामुळे देशांच्या सिमा फिकट होउन जग हे एक राष्ट्र असल्याचा अनुभव येत आहे. जागतिकीकरण मुळे उत्पादन करण्यास अनुकुल असणार्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढत आहे. परंतु काहींच्या मते जागतिकीकरणामुळे देशातील गृह उद्योग लोप पावत असुन देशी वस्तुंची जागा ही विदेशी वस्तुंनी घेतली आहे म्हणजेच लोक विदेशी वस्तु खरेदी करत आहे. परंतु माझ्या लोक ही वस्तु ही देशी आहे की विदेशी हे न बघता त्या वस्तुची उपयोगिता व किंमत बघुन विकत घेतात. जर आप

मुसाफीर

लेखक यमन यांनी गुरुवार, 15/01/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी "मुसाफीर "वाचायला मिळालं . परत एकदा गोडबोले सरांची "range "बघून अवाकलो . त्यांचं प्रत्येक पुस्तक मराठी माणसाला घडवतंय . त्यांना आणि त्यांच्या व्यासंगाला आपला कुर्निसात . किमयागार , अर्थात ,बोर्डरूम ,मनात, मुसाफिर हि पुस्तकं प्रत्येक मराठी घरातल्या कुंकवाच्या करंड्या इतकीच महत्वाची आहेत . आधी "बालकांड" आणि आता "मुसाफीर "एकूणच "मनुवादी "(म्हणजे आडनावाने "मनुवादी"… विचारांनी नाही म्हणत मी)आत्माचारीत्रांना बरे दिवस आलेत असं दिसतंय . एवढ्या सगळ्या गोष्टी शिकताना ,अनुभवताना वेळ कसा मिळतो ? हे मला खरोखरच इंजिनीरिंग च्या कित्येक विषयान सारखं अनाकलनीय आहे .