Skip to main content

विकावी म्हणतोय लुना…

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 04/02/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते . सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_ खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना… धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो … ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी … बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो? निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो… एक होता गवई तो येताजाता लसूण खाई गुरू कोण त्याच्या, तर म्हणे ठकार बाई …

कथाश्री २०१४

लेखक नाखु यांनी बुधवार, 04/02/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे. या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.
  • कुमार सप्तर्षी यांची मुलाखत त्यांची राजकीय जडण घडण , सामाजीक भान आणि वैचारीक स्पष्टता अगदी तपशीलवार उलगडली जाते. आजच्या राजकीय प्रगल्भतेच्या (दिवाळखोरीच्या) पार्श्वभूमीवर त्यांची पक्षविरहीत मते नक्कीच विचारात पाडतात
  • दुसरी मुलाखत ही विनय सहस्त्रबुद्धे यांची "रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी" च्या वाटचालीबद्दल आणि योगदानाबद्दल आहे.

राँग नंबर - २

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 04/02/2015 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्‍याचे हात सळसळायला लागले होते. कालच ७०-८० हजाराला बांबु बसला असल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घालायचे नक्की केले होते. तसेही त्यांचे अंतर्मन काही वेगळीच ग्वाही देत होते. आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडणार असलं की अशी फिलींग्ज यायची त्याला. नव्याने येणार्‍या अनामिक साहसाच्या कल्पनेने त्याचे बाहु स्फुरण पावायला लागले होते.

वै. विष्णुबुवा जोग महाराज

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 04/02/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा) त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला - " पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा, एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !" कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने ओळखतात.

दोघी … (भाग ३)

लेखक फिझा यांनी बुधवार, 04/02/2015 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी … (भाग ३) भाग ३ पुढे काही दिवस लोटले . सुलभा आणि किरण भेटल्या नव्हत्या बऱ्याच दिवसात . फोनवरच एकदोनदा बोलणे झाले तेवढंच . एके दिवशी संध्याकाळी सुलभाने घरात आदित्य च्या लग्नाचा विषय काढला . तिने आदित्य ला आधीच किरण बद्दल विचारले होते . तेव्हा त्याने जरा लाजूनच 'पुढे जायला काही हरकत नाही' असे सांगितले होते . आई ने स्वतःच त्याला किरण बद्दल विचारल्यामुळे त्याला तर जणू मनातले ओठावर आले होते आपसूकच . अर्थात तो आई पुढे तसं दर्शवत नव्हता पण सुलभा ला ते कळल्यावाचून राहिला नाही . मग काय , किरण ला तर ती ओळखत होतीच आणि किरण ने आपली सून व्हावं असं तिला मनापासून वाटत होतं .

माझे स्मार्टपण !

लेखक स्नेहन्कित यांनी बुधवार, 04/02/2015 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून ,.... माझे माहेरपण, किव्वा माझे बालपण, असे काहीतरी वाचकाच्या मानता यावे, हा उद्देश ! कारण, एखादी नववधू, जेव्हा लग्न करायचे ठरवते, त्यानंतर साधारण, १-२ वर्ष ती आणि तिचे कुटुंब, चांगल्या स्थळाचा शोध घेतात, ४ ठिकाणी चौकशी करतात, इतराना लाभलेल्या नवर्यांचे भले बुरे गुण जाणून घेतात आणि मगच योग्य त्या स्थळाशी सौरिक जूळवतात. इतके सारे करून देखील, सप्तपदी मधील शेवटचे पा उल टाकताना ती शासंक असते … काय होईल ?, कसे होईल?, मला जमेल का ?...माझे आयुष्य कायमचे बदलून जाणार ….मी चांगला निर्णय तर घेतला आहे ना ?….

आशावाद

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 04/02/2015 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
“काय आज तुझी बाई नाही आली का? “नाही” “२६ जानेवारी, नॅशनल हॉलीडे का?” “तिला तिच्या मुलांना फिरायला घेउन जायचे आहे” “काय?” “हो तीन चार महीन्यातून एकदा मुलांना कुठेतरी फिरायला घेउन जायला सुट्टी घेते.” मी अवाक. खरे म्हणजे मुलांना फिरायला घेउन जाणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते आपण ते नेहमीच करतो परंतु कामवाली बाई ही मुलांना फिरायला घेउन जायला नियमित सुट्टी घेते हे जरा नवीन होते. त्यामुळे आश्चर्य वाटले पण तसा विचार केल्यास ही फार आशादायी अशी घटना होती.

मेक्सिको: भाग २ : सफरीची सुरुवात - मेरिदा

लेखक समर्पक यांनी मंगळवार, 03/02/2015 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: प्रस्तावना मेक्सिको विस्ताराने मोठा देश असल्याने एका कोप-यातून सुरुवात करून मग मध्य भागाकडे प्रवास केला. युकेतान द्विपकल्प हा मेक्सिकोचा दक्षिण-पूर्व कोपरा. हा संपूर्ण विभाग भूगर्भीय गुहा, भूमिगत तळी व नद्या अशा जगावेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. हवामान ऊष्ण-दमट, झाडी बरीच, तीन बाजूंनी चंदेरी वाळूचे कॅरिबिअन किनारे... पूर्वापारचे माया लोकांचे घर. आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेली दोन मोठी शहरे, मेरिदा व कॅनकून.

पुन्हा एकदा राजगड तोरणा!!--भाग १

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 03/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र गडकिल्ल्यांच्या बाबतीत समृद्ध आहेच , आणि विविध हौशी ट्रेकर मंडळी आणि ट्रेकिंग ग्रुपनी वर्षानुवर्षे या स्थानांना भेटी देउन आणि बर्याच ठिकाणी चांगले उपक्रम राबवून हि ठिकाणे जागती ठेवली आहेत . याच परंपरेला जागुन आणि बऱ्याच दिवसात एखादा भन्नाट ट्रेक झालेला नसल्याने आलेली खुमखुमी जिरवण्याच्या उद्देशाने आम्ही राजगड तोरणा ट्रेक आखला .जानेवारी महिना असल्याने पाण्याची चिंता नव्हती.मी स्वत: २००४ मध्ये तोरणा राजगड असा उलट ट्रेक केला असल्याने रस्ता बऱ्यापैकी ओळखीचा होता (असे मला वाटत होते,पण ते नंतर सांगतो :) ) तोरण्याविषयी काही दंतकथा ऐकिवात असल्याने आणि राजगड मुक्कामाला ज

दिल शाबूदाणा वडे

लेखक सुघोषा यांनी मंगळवार, 03/02/2015 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाव ची silent observer (मराठी शब्द??) आहे.. बर्याच पाककृती येत आहेत.. म्हंटल आपणही एखादी पाककृती इथे टकवावी. शाबूदाणा वडा ……!!!! नवर्याला खुष करण्याचा मार्ग पोटातून जातो . मग त्याला खुश करण्यासाठी बनवले ****दिल शाबूदाणा वडे **** असाही आत्ता फेब्रुवारी उजाडलाच आहे .♡♡♥♥ साहित्य :-
  1. शाबूदाणा १-१/२ वाटी भिजवलेला
  2. बटाटा १ उकडून
  3. शेंगादाण्याच कुट ४ चमचे
  4. मिरची २-३ आवडीनुसार
  5. मीठ चवीनुसार
  6. साखर अगदी थोडीशी
  7. दही २-३ चमचे
पाककृती:- वरील सर्व पदार्थ एकत्र करून घेणे आणि दिल आकाराचे वडे करणे.