आख्खा मसुर
मला खुप आवडतो म्हणून शिकलो कराडचा स्पेशल
"आख्खा मसूर"
साहित्य :- भिजवून फुललेले मसूर दीड वाटी (साधारण अर्धी-पाऊण वाटी कोरडे भिजवावे लागतील, ७-८ तासांसाठी)
एक मोठा कांदा - बारीक चिरून
एक मध्यम टोमॅटो - बा.चि.
टोमॅटो प्युरे - दोन मोठे चमचे
कांदा-लसूण मसाला - तिखटाच्या आवडीनुसार
हिंग, हळद, मोहरी - फोडणीसाठी
तेल, मीठ
कृती
मसूर कुकरमधे वाफवा. दाणे अखंड आणि वेगळे राहिले पाहिजेत. (म्हणूनच अख्खा मसूर नाव?) तेल तापवून फोडणी करा. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटोही परता.
मिसळपाव