तो वेडा आहे भाग १
तो वेडा आहे !
आजपर्यन्त जितक्या वेळा मी माझ नाव ऐकलं नसेल त्याहून जास्त वेळा मी हे वाक्य ऐकलं आहे. वेडा! वेडा! वेडा!. कधी कधी वाटतं हेच आपलं नाव आहे का? नाही..नसावं. आईने कधीच मला या नावाने हाक मारल्याच आठवत नाही. कधी कधी बाबा वैतागून म्हणतात.पण लगेच आई त्यांना रागावते. माझा दादा पण नावानेच हाक मारतो. पण मग बाकी सगळे मला वेडा का म्हणतात. लहानपणी वर्गातल्या बाईंनी वेडा म्हणून मला वर्गाबाहेर काढलं. नंतर मुख्याध्यापक बाईंनी शाळेबाहेर काढलं. म्हणाल्या की कोणत्याच विषयात याची प्रगती नाही. खरं म्हणजे चित्रं चांगले काढायचो मी...अजूनही काढतो. तर म्हणाल्या की चित्रकला हा काही विषय नाहीये.
मिसळपाव