Skip to main content

तुझ्याशिवाय

लेखक Sanjay Kokare यांनी मंगळवार, 27/01/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------- @@ तुझ्या शिवाय मी जगु शकत नाही @@ ----------------------------------------------------- ----------------------------------------------------- बघितल नाही तुला दिवसातुन एकदातरी, दिवस माझा सुरेख जात नाही!! दिसताच क्षनी तु माझ्या, मनामधील आनंदाला पारा उरत नाही!! येते तु जेव्हा माझ्यासमोर, मुखातुन एकही शब्द निघत नाही!! खुप काही बोलायच असत तुझ्यासोबत, पण तुझ्यासोबत मी काहीच बोलु शकत नाही!! अनेकदा लपुनछपुन पाहतो मी तुला, पण भान असत की तुला मी दिसणार नाही!! माझे मित्र देतात तुझ्यानावाने हाक मला तरीही तुला पाहील्याशिवाय मी राहु शकत नाही!! कळत

हृदयाचा फोन

लेखक महेश अशोक खरे यांनी मंगळवार, 27/01/2015 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉटस् ऍपवर एक हिंदी मुक्तकाव्य आलं होतं. आवडलं. वाटलं, हे मराठीत असेल तर छान होईल.
काव्यरस

हॉस्टेल लाईफ आणि नवरस

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 27/01/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॉस्टेल ला राहाण हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो . हॉस्टेल लाईफ बद्दल एकदम वाईट अनुभव असणारे लोक आणि एकदम भन्नाट अनुभव असणारे लोक असे दोन गट . अधल मधल काहीच नाही . सुदैवाने मी दुसर्या गटात मोडतो . खालचे अनुभव माझे असले तरी थोड्या फार फरकाने हॉस्टेल मध्ये राहिलेल्या प्रत्येकाचेच . हास्य रस - माझ इंग्रजी तेंव्हा यथातथाच होत . छोट्या शहरामधून आल्यामुळे mannerism चा पत्ता नव्हता . सकाळी शिक्षकांना आल्या आल्या good morning म्हणायचे असते हे नुकतेच कळले होते . एकदा रात्री रस्त्यावर फिरताना रेक्टर सर भेटले .

निंगे सासरी ...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी मंगळवार, 27/01/2015 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
निंगे सासरी नवरी मनी फाटलं अभाय नोता निंगता निंगत कसा घरातुनं पाय १ भिरं भिरं लानं भाऊ फिरे तिचया पाठी मांगं घळी घळी पुसे तिले आजं कुठी जातं सांगं २ केला साजं शिनगारं जशी लक्षमी नटली जाता माय बापा जोळं घऴी डोयाची फुटली ३ टाके दमनीतं पायं डोया पाये घराकळे फुलं पानं तोरनाचे आता सोकाउनं गेले ४ उभी आंगनात मायं हाती डाबलं कुकाचं टाके खुरावरं पानी डोयातलया आसवाचं ५

बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मंगळवार, 27/01/2015 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते. बायोमेडीकल हा काय प्रकार? तर मुख्यतः ऑटीझम हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. मेडीकल फिल्डमध्ये ऑटीझम हा जेनेटीक म्युटेशनने होतो, तसेच काही वातावरणातील फॅक्टर्सदेखील काराणीभूत असतात असे मानले जाते. थोडक्यात ऑटीझम बरा होत नाही.

सरस्वती पूजन

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 26/01/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!

क्लासमेट्स - दर्जा!!

लेखक श्रीरंग यांनी सोमवार, 26/01/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजच्या म्युझिक डिपार्टमेंटच्या उद्घाटनासाठी जवळपास वीसेक वर्षांनी एकत्र भेटलेले क्लासमेट्स.. बर्याच वर्षांनी एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, नोस्टॅल्जीया, जुने चेहरे इतकया वर्षांनी दिसल्यावर उसळून आलेल्या आठवणी, ज्याच्या नावने हे म्युझिक डिपार्टमेंट चालू होतंय, त्या कायमच्या दुरावलेल्या मित्राच्या आठवणीनी हळवी झालेली मनं.. अशातच आगमन होतं सत्याचं. सत्या.. कॉलेजचा एक काळ गाजवलेला, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा सत्या. ज्याच्या स्टाईल आरशासमोर उभे राहून मुलं कॉपी करायचा प्रयत्न करायची, तो कॉलेजचा हीरो सत्या. ज्याच्या आवाजात एका हाकेत कॉलेज बंद पाडण्याची ताकद होती, असा सत्या.

गुपित- एक गुढ रहस्यमय रुपक कथा -एकाच भागात संपुर्ण

लेखक जेपी यांनी सोमवार, 26/01/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले. "जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई. पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे. त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा. पार्थ लहानपणापासुन आपल्या आजोबांना पुजा क

येल विद्यापीठ ,अमेरिका >> अंतिम भाग

लेखक बेमिसाल यांनी रविवार, 25/01/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे विद्यापीठ अमेरिकेतील " कनेक्टिकट " राज्या मधे आहे, खरे सान्गायचे तर या विद्यापीठाचा इतिहास खूपच प्राचिन अहे. याचा मूळ स्रोत इंग्लंड मधिल शिक्षण तज्ञांचा विचार आहे. इथे पदव्यूत्तर शिक्षणासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात, भारतातून येणारे विद्यार्थी ही बहुसंख्य आहेत.आम्ही अर्थात "प्रवासी" म्हणून या विद्यापीठास भेट दिली होती.

येल विश्वविद्यालय, अमेरिका परीसर भाग ३

लेखक बेमिसाल यांनी रविवार, 25/01/2015 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
1 काळ्या मेघांच्या पार्श्वभूमीवर ह्या इमारतीचे आकाशात घुसलेले टोक एक वेगळाच नेत्रसुखद अनुभव देतात.... 2 हरित आणि रम्य परिसर....... 3