“माझी जडण घडण”
माझे वडील इतिहास आणि गणिताचे शिक्षक आहेत. पण इंग्रजी व्याकरणावर सुद्धा त्यांची चांगली पकड आहे. मी शाळेत असताना त्यांनी माझ्याकडून active voice - passive voice, affirmative, negative हे सगळे प्रकार पक्के करून घेतले होते, आणि त्यांनी शिकवलेल्या इंग्रजीचा मला आयुष्यभर फायदा झाला.
अभियांत्रिकी डिप्लोमा झाल्यावर, माझ्याकडे नोकरी नव्हती. घरात किती दिवस बसून काढणार? काहीतरी करायला हवं म्हणून हात पाय मारायला सुरुवात केली. मोजून १७ ठिकाणी कॉलसेंटरच्या मुलाखती दिल्या. प्रत्येक ठिकाणी शेवटच्या HR मुलाखती पर्यंत गेलो, आणि HR ने हे सांगून मला नकार दिला कि, तुमच्या इंग्रजी भाषेवर मातृभाषेचा प्रभाव आहे.
मिसळपाव