कडेलोट........
"हेलो.......
हेड कॉन्सेटेबल जाधव बोलतोय चारकोप पोलीस स्टेशन"
"......... "
"कधी??????"
"............."
"तुम्ही कोण बोलताय?"
"............."
" ठीक आहे तिथेच थांबा, आम्ही पोहचेपर्यंत कुणालाही बॉडीला हात लावू देऊ नका. आणि हो तुम्हीसुद्धा लांब उभे रहा"
"बिल्डिंगचे नाव काय???"
"................"
"ठीक आहे पोहचतो पंधरा मिनिटात"
एव्हढ बोलून जाधवांनी धाडकन फोन आपटला.
"भोXXच्यांना रात्री दिड वाजता सुसाईड करायची काय हुक्की येते. काय माहित?? चला चव्हाण गाडी काढा. सगळ्यांना सांगा तयार व्हायला.
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २
हंऽऽ कुठेपर्यंत बरे आलो होतो आपण ? श्री जोशी यांना एक हकिकत ऐकण्यास मिळाली.
‘‘सुमारे वीस वर्षापूर्वी म्हणजे अंदाजे १९०० साली, काही मराठे उंट घेऊन या मैदानात उतरले. हे लोक दिवसा झोपा काढीत व रात्री तंबूत खणत असत. सात आठ दिवस ते खणत होते. एका दिवशी ते अचानक निघून गेले. सकाळी गुरे चारण्यासाठी जी गुराखी मुले त्या मैदानात गेली त्यांना तेथे अनेक खड्डे दिसले.
(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र .
काव्यरस
गोव्याची साद - भाग ३
गोव्याची साद - भाग २
गोव्याची साद - भाग १
गोव्याची साद - भाग ३
तर पुढचे दोन दीवस म्हणजे नुसते खाणे-पिणे, समुद्रात सकाळ संध्याकाळ २-२ तास डुंबणे आणि जवळपास भटकणे यात घालवले.
भटकंतीमधे किल्ला काबो-डी-रामा ला भेट.
पाळोळेकडून अगोंडा किनारा रस्त्याने अजून बरेच पुढे सरळ सरळ जायचे. जाताना डावीकडे अगोंडा, खोला किनार्यांकडे जाणारे रस्ते लागतात. हा छोटा प्रवाह/नदी जिथे समुद्राला मिळते तेथून अगोंडा किनारा चालू होतो.
बेफिकीर…पण काही क्षणापुरताच
कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच…
तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या की अभद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुढत बसतो.
मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जातो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी.
तुझ्यासोबत जगलेले ते क्षण किती गोड होते. किती मदमस्त जीवन होतं.
तुझं प्रेम
काव्यरस
माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-१
"फिराला जायाचं , फिराला जायाचं"
"पण कुठं जायाचं "
"केरळला"
"का? तिकडेच का?"
तो आहे ना जळावु गणेशा त्याने त्याच्या केरळच्या धाग्यात जे काही फोटो टाकलेत त्यानं अशी जळजळ झाली की २ इनो पाकिटे घेवुनही जाईना, तेव्हा म्हंटले की तिकडे जावुनच यावे. मगच जीव शांत होईल.
तरी एका नातेवाईकांनी पाय ओढलाच.
वाss जावुन जावुन केरळलाच जाताय का? "अरे केरळांत आणि आपल्या कोकणांत फरक तो काय? आपल्या गावी जसे डोंगर तसेच तिकडचे त्यात विशेष ते काय? आणि हो छत्री घ्या नाहीतर पाऊस गाठेल. "
म्हंटले येवुदे की, इथे उकाड्याने हैराण आहे म्हणुन तर भिजायला जातोय.
इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या
आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या
येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या
खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली
इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या
येती कितीक येथे मशहूर रोज होती
गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या
लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला
विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या
झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा
लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या
माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले
आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या
विशाल...
काव्यरस
माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ५-रोम
माझी इटलीची भ्रमणगाथा: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
काप्री करून आमची सहल परत नेपल्स मुक्कामी आली तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.परत ते "प" पासून नाव असणारे पदार्थ खायची जराही इच्छा नव्हती! म्हणून एखादे फळ खाऊन घेऊ ठरवून भोजनगृहात गेले तर तिथे म्हणे आज व्हरायटी आहे इटालियन जेवणाची.खाऊन तर बघा! म्हंटलं बघूया!
मिसळपाव