Skip to main content

गोवा कट्टा

लेखक आदिजोशी
सोमवार, 04/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो आणि मैत्रीणींनो, मी पुढल्या आठवड्यात गोव्यामधे सहकुटुंब सुट्टीसाठी येत आहे. आपल्यापैकी कुणी गोव्यात राहत असल्यास १२, १३, १४ मे पैकी एक संध्याकाळ कट्टा करू शकतो. हा माझा नंबर ९९३०९३०९०१. कोण कोण आहे आणि कोण कोण उपलब्ध आहे हे नक्की कळवा. आमचा मुक्काम BENAULIM SALCETTE येथे असणार आहे. . मुंबईतल्या मित्रांसाठी पि.एस.: गोव्याहून कुणासाठीही काहीही आणण्यात येणार नाहीये. धन्यवाद.

वाचने 5023
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

१५-१६ मे ला Betalbatim येथे आहे . थोडक्यात चुकामूक :)

आम्ही तुमच्या कोल्लापूरात येणार आणि तुम्ही गोंयात? सॉरी सायबा, मी ९ ला कोल्हापूर आणि तिथून १० ला लांजा. मग बरेच दिवस तिकडे असेन. कदाचित २० पर्यंत. त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य दिसत नाही. किती दिवस मुक्काम आहे? परत कधी आणि कसे निघणार?

In reply to by पैसा

वाटलंच मला. कुणी तुमच्या गोव्यात यायचं म्हटलं तर तुम्ही लगेच लांज्याला पळता. =))

In reply to by प्रचेतस

अगदी अगदी वल्ली! स्वानुभवावरून बोलतोय बरं का मी, लांजा तर खूप लांब राहिला ह्यावेळी. ;) - (अनुभवी हलकट) सोकाजी

In reply to by सोत्रि

भेटून चहासाठी रडवणार्‍या पुणेकरांपेक्षा ते बरं!

In reply to by पैसा

मी चन्नैकर झाल्यावर पुण्यास आलीस तर त्याचे बोल मला का? मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब मी टरफल उचलणार नाही! - (बाणेदार) सोकाजी

In reply to by पैसा

पुणेकर पुण्यात आल्यावर भेटतात तरी, पण गोव्यात येऊनही, सांगूनही गोयंकार भेटत नाहीत हां! फोन पण लागत नै त्यांचा!! =)) स्वानुभव हो!

In reply to by पैसा

असं कसं असं कसं? निरागस पुणेकरांच्या चहाचा अगदी मिपाच्या नाक्यानाक्यावर उल्लेख होतो आणि हे का बरं उलोचें नाका? =))))

In reply to by पैसा

हांव आसाच गोयंकार, पुणि पुण्याचेही आसा नी :) आणि सद्दा तू मगेल्या पुण्याक नाव दवरता.. :(

In reply to by पैसा

हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं रडतात राव...पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

In reply to by पैसा

त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य दिसत नाही.
कोणताही मिपाकर गोव्यात येणार असला की तुम्ही बाहेर. कस्सं जमतं हो तुम्हाला हे?? लै म्हन्जे लैच रोचक आहे ;)

In reply to by अन्या दातार

मी वास्कोला आहे. येणार नाही म्हणून फोन करणारे कोल्लापूरकर अस्तित्त्वात आहेत. झालंच तर मुवि, पिंगू, लीमाऊजेट अमोल खरे यांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे. आता मी पैशे गोळा करायला जातेय. तिकडे मदतीला येतोस तर ये! =))

In reply to by पैसा

मी वास्कोला आहे. येणार नाही म्हणून फोन करणारे कोल्लापूरकर अस्तित्त्वात आहेत.
मग काय तर! वास्को कुठं, तुमचं फोंडा कुठं. अन त्यापुढे कोल्लापुर कुठं. कसं जमावं ते? आमच्यासोबत मुंबईकरही असत. दोष एकट्या कोल्लापूरकरांस का?
झालंच तर मुवि, पिंगू, लीमाऊजेट अमोल खरे यांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे.
पुणे, मुंबई कट्ट्यांस काय?? शक्य आहे ते. =))

In reply to by अन्या दातार

प्रतेक्ष माझ्या घरात बघितलय! आणि त्या इंट्याला एक विसरलेच! तुमचे मुंबैकर बिचारे एकसारखे बिझी बिझी. त्यांना काय म्हणायचं काम नै!

आपले कोल्हापूर्/पुणे/मुंबै/गोवा वाद नंतर सोडवू. सध्या अ‍ॅड्याभौला गुहागर-दापोलीकडेही जायचे आहे. तिकडची काही माहिती असेल तर नक्की सांगा.

In reply to by पैसा

गुहागरास घरगुती उतरायची सोय हवी असल्यास आमच्या दुर्गादेवी देवस्थानाचं विश्रामगृह आहे. शिवाय तिथे जागा मिळाली नाही तर देवीच्या मंदिरातुन बाहेर उजवीकडे पडुन ५० फुटावर एक जोशी नावाच्या काकु आहेत त्यांच्याकडे जेवाखायराहायची सोय उत्तम होते.

तो अ‍ॅड्या आधीच दापोली फिरलेला आहे, तरीही त्याला अजुन काय माहिती हवी आहे कुणास ठाऊक? http://www.misalpav.com/node/19703 या इथे जास्त माहिती मिळेल.

मूळ विषय सोडून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून मिपाच्या बँडविड्थचे सार्थक केल्याबद्दल समस्त मित्रांचे आभार :) मला माहिती गोव्यातली हवी होती, दापोली गुहागरची नाही.

In reply to by आदिजोशी

धाग्यावर विषय सोडून लिहीणे हा मिपाकरांचा आयडीसिद्ध अधिकार आहे आणि ते तो मिळविणारच !

मी आहे गोव्यात. पण आम्ही १२ वीच्या पोरांचे रिज्ल्ट डिक्लेर करत असु तेव्हा पर्वरीत. सो तुम्ही पणजी भागात येणार असलात तर कळवा. मिनी कट्टा करता येईल.

अत्ता जमणार नाही .... पण पावसाळ्या नंतर एकदा कधी तरी जोरदार मिपाकट्टा व्हायलाच पाहिजे गोव्यात !!