Skip to main content

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

लेखक दमामि यांनी शुक्रवार, 05/06/2015 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा ! नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा। होशील बकरा। ताजाताजा।। लेख तू टाकसी । झुंडीने जमती शिंगे उगारती। जुने नवे ।। जास्त त्या रे माशा। करिती तमाशा। पण काही खाशा। भृंग त्यात ।। रेवा पै अजया। अनाहिता ताया। कौतुक कराया। येती पुढे ।। श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे मधाची रे पुटे। जिभेवरी ।। मग येई पुढे। चांडाळचौकडे। ब्याट्या प्रगो सुडेचिमणा क्याप्टन ।। चिमटे ते घेती। हैराण करती। गुर्जीही पळती । तांब्या संगे ।। चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।। कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं। स्वबोल ते सत्य। वाटे यासी।। दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप। डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।। नाखु आणि टका। वल्ली मापं मिकास्वॅप्स आणि बिका। भली मने।। जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या। आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।। जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।। ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव। चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 19332
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by दमामि

माझं वय माहितीये तुला म्हणजे आपण रिसेंटली भेटलो असणार नै का? केवढा आहे रे मी? =))

आयडी वय २ आठवडे आणि बर्‍याच कुंडल्या मांडल्यात की हो! बाकी असो. पण जयंतराव आणि माईसाहेब ही दोन नावे एका दमात घेतलेली बघून बेशुद्ध पडले आहे.

In reply to by पैसा

पण जयंतराव आणि माईसाहेब ही दोन नावे एका दमात घेतलेली बघून बेशुद्ध पडले आहे.
पैसा ताई..तुम्हीच काय साक्षात माई पण बेशुद्ध पडतील

चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।
यासाठी सलाम ! ..जबराट

In reply to by चिनार

चौकडीमधे माझा उल्लेख केलाय म्हणुन सांगतो. सगळ्या अनाहितांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्या अ‍ॅटलिस्ट माझ्यासाठी काठी आणणार नाहीत ह्याची खात्री. आणि पळुन नक्कीचं जाणार नाही =))

छान लिहीले आहे. इसे बात पे एक कट्टा आप के साथ. पण........ "ज्ञानोबा पैजार । माई कुरसुन्दीकर । आणि जयंतराव। लोकं थोर ।।" पैजार बुवांच्या आणि जयंतरावांच्या पंगतीला "माई"?????????? ये बात कुछ हजम नही हुई.दोस्त, फिरसे कोशीस करो.

In reply to by मुक्त विहारि

जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।

In reply to by दमामि

चूक करतो तो माणूस... केलेली चूक मान्य करतो आणि ती परत-परत होवू देत नाही, तो भला माणूस. चुक अमान्य करून, उगाचच वाद-विवाद करत चिखल-फेक करतो तो, राक्षस. असो, चुक मान्य करून सुधारलीत, भले माणूस दिसता. एक कट्टा आप के साथ. (नेहमीच, भल्या माणसांच्या शोधात असलेला सामान्य माणूस) मुवि

In reply to by मुक्त विहारि

मुवि, धन्यवाद! कट्टा करायला नक्कीच आवडेल. बघु, कधी योग येतो. (पण बरेच कट्टे कस्काय वर ठरतात म्हणे, आणि मी। कुठल्याच ग्रुप वर नाही.)

In reply to by दमामि

मी पण नाही. कट्ट्याचे धागे येतच असतात. निदान मी तरी, कट्टा ठरला की, धागा काढतो. (कदाचित एखाद-दोन अपवाद असतील) मुंबईच्या आसपास असाल तर, १५ जूनला डोंबोली कट्टा आहे. पुण्याच्या आसपास असाल तर, ६आणि ७ जून, असे २ कट्टे आहेत. परदेशी असाल तर, तुम्ही इथे आलात की, तारीख सांगा, करू कट्टा.

In reply to by दमामि

सगळे मिपाकट्टे मिपावरच धागे काढून, (कधी कधी जरा जास्तच ;) ) चर्चा करून, प्रकटपणे होतात. काही लोक फक्त व्हॉट्सपवर चर्चा करून करत असल्यास ते खाजगी कट्टे समजा. मिपाचा त्यांच्याशी काही संबंध नाही :)

=))

कल्पकता आवडली.
श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे
या ओळीतला श्रीरंग म्हणजे मीच का? मिपावर चित्रपट परिक्षणासाठी प्रसिद्ध असलेला श्रीरंग हा आयडी अन त्यामागचा व्यक्ती वेगळा आहे.

In reply to by दमामि

मी तर फाटक्या तोंडाचा म्हणून कुप्रसिद्ध आहे हो मिपावर. बाकी प्राडॉ अन वेल्लाभट यांच्यासारख्या विभूतींच्या रांगेत मला बसवले हा मी माझा सन्मान समजतो.

In reply to by असंका

सगा नावाचा सोगा सोडायला तयार नाहीत असे दिसतें !
>"नेमका गुंड्याभाऊ कट्ट्याला गेलाय नाही तर त्यासच सांगीतले असते शोधावयांस" इती चिमण.
पुन्हा चर्‍हाट नाखुस

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लिहायची पद्धत कळते.
ते आहेच. एका "बहू"रुपी आयडीला आम्ही तिच्या प्रत्येक रुपात केवळ लेखनशैलीवरुन ओळखलं आहे.

भली मने या सदर्‍यात 'तिमा' नाही म्हणून जाहीर निषेध! निदान चौकडीमधे पांचवा घुसवायचा.

हाफशेंच्युरी निमीत्त टक्या आणी दमामि चा सत्कार हमाम सोप आणी हिमामी तेल देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक - जेपी आणी तमाम हेवनवाशी कार्यकर्ते.

@ आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत>> अस्सं व्हय!!! बरा प्रयत्न केलायत हो आत्म हत्येचा! ;-)