व्यायामी ओव्या
ब्लॉग दुवा हा
अवघ्या जगाला
नको त्याची हाव
आरोग्याचा ठाव
घेतो कोण
ठेविले अनंते
तैसे न रहावे
नेटके ठेवावे
शरीरासी
पायात सामर्थ्य
हातामधे बळ
स्नायूंना हो पीळ
असावाच
असो जिम किंवा
असो खोली छोटी
असावी सचोटी
व्यायामात
कुणी उचलती
वजने ही फार
संसाराचा भार
पुरे कुणा
वेल्ला म्हणे जेथे
सहा बिस्किटे
पहा असे तेथे
पहिलवान
करावेच अॅब्स
भले प्लँक बिंक
नेहमीच थिंक
पॅाझिटिव्ह
करावी न व्यर्थ
जनाचिया पर्वा
पहा आणि ठरवा
आरशात
आरोग्यचि एक
उद्दिष्ट असावे
आपण झटावे
त्याच्यासाठी
जरी देव पूर्ण
करेल कामना
संकटी सामना
स्वतःचा
अग अग म्हशी
अग अग म्हशी
...............
एका गावत एक ब्राह्मण रहात असतो..
पत्नि व २ मुले असतात..बंड्या अन काशी
थोडी शेति असते ..
कथा वडगावच्या लढाईची...
ॐ नमो जी गणपतये
वरदमूर्ती प्रमथपतये
आरंभी नमून तुम्हाला
उभा शाहीर कवन गाण्याला
नमन तुज मयुरवाहिनी
वीणाधारी बुद्धीदायीनी
शाहिरावर कृपा करुनी
वाणी वरदान दे त्याला
नमन असो कुलदैवताला
म्हाळसाकांताला, बानू भरताराला
जेजुरी गडी जो बैसला
मर्दुनी मणीमल्लाला
नमन पुढे आराध्य देवाना
संत माउलीना आणि सत्पुरुषांना
विठोबा, ज्ञानबा, तुकारामाला
चोखोबा, सावता, नामदेवाला
नमन माझे भवानी मातेला
अंबाबाई, यमाई, रेणुकेला
आदिशक्ती जगदंबेला
वरदायिनी मातृदेवतेला
नमन माझे शिवबाला
संभाजी, बाजी, शाहूला
देशाचा मान ज्यांनी राखला
स्वरुज्या स्थापुनी धर्म राखला
नमन माझे गुरुमाउलीला
मातापिता, बंधू भगिनींना
वाढवूनी ज्यांनी पोसला
श
कोलंबीची मॉली
मला वेगळे प्रकार करायला न् खायला भयंकर आवडतं.पाचवीत असल्यापासून आईल २-३ दिवसांसाठी कामासाठी गावी गेली की स्वयंपाक करावा लागत असे.न आई करून जात असे पण तेव्हा फ्रीज नसल्याने कधी खराब झालं तर काही भाजी, आमटी करायची वेळ येत असे. आई स्वयंपाक करताना पहत असे. वाटून कातून द्यायला मदतही करत असे.मासे भाज्यांपेक्षा करायला सोपे वाटत.एक वाटण वाटले की काम झाले. माझ्या वडिलांचा न्यूज पेपरचा धंदा असल्याने साप्ताहिके,मासिकेही भरपूर असत.
"क्षणोक्षणी तापणारी समई….संजूमावशी"
"चेतन…. ए चेतन…" आईनं हाक दिली.
मी माझे जवळपास कपडे आवरले होते. एल.एल एम, ला पुण्यात अॅडमिशन घेतली होती. त्यासाठीच्या सामानाची आवराआवर चालू होती. तीन-चार हाका देऊनही मी अगदी अपेक्षितपणे उत्तर दिले नव्हते. आणि ह्याचीही सवय असल्याने अगदी शांतपणे तिनं पुन्हा हाक मारली.
"आलो गं" मी.
आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत आई माझं सगळं व्यवस्थित आवरून ठेवत होती. माझी बॅग भरत असताना ती म्हणाली.
"हे बघ… हे आहेत भूकलाडू… नाश्त्याच्या वेळी खात जा. उजव्या कप्प्यात ठेवतीये. खव्याच्या पोळ्या पण देतीये, आठवडाभर चांगल्या राहतात. खूप भूक लागली असेल आणि जवळपास काही नसेल तेंव्हा खात जा…. चारीमुरीला तुला आवडतो तो …….
रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ
वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे.
वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला.
द स्केअरक्रो - भाग ५
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
द स्केअरक्रो - भाग ५ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली )
कार्व्हर त्याच्या आॅफिसमध्ये बसला होता. आॅफिसचा दरवाजा बंद होता. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता आणि अगदी एकटक समोरच्या कॅमे-यांच्या फीडकडे बघत होता. प्रत्येक कॅमेरा एका माॅनिटरला संलग्न होता आणि प्रत्येक माॅनिटर ३६ वेगवेगळ्या कोनांतून दृश्य दाखवू शकत होता.
धुंदी कळ्यांना! भाग-१
दिवसभराच्या धावपळीनंतर आता रात्री जरा कुठे अपर्णा विसावली होती. बाहेर अगदी धो धो नाही आणि अगदी मुळूमुळू नाही असा पाउस पडत होता. छान गारवा पसरला होता. आता पांघरून घेऊन गुडूप व्हायचं असा विचार करून अपर्णा बेडवर गेली खरी पण बेडरूमच्या उघड्या राहिलेल्या खिडकीतून गार वार्याचा झोत अंगावर आला आणि ती शहारली. खिडकी बंद करायला म्हणून खिडकीत गेली आणि तिथेच उभी राहिली. सगळा थकवा, झोप कुठल्या कुठे पळून गेली. किती आवडतो असा पाउस आपल्याला ती मनाशीच म्हणाली. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती, अगदी एखाद दुसर वाहन जात होतं. अंगणातला प्राजक्त नखशिखांत ओलाचिंब झाला होता.
चीनी कम
आजवर भारतीय उपखंडामधे(सार्क) केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या रस्सीखेचीलाच फार महत्त्व मिळे पण भारताने आपल्या पश्चिमेकडून आता थोडे पूर्वेकडे पाहणेही आवश्यक आहे असे प्रतिपादन केले जाऊ लागले. पूर्वीच्या सरकारने त्याचे वर्णन लूक-ईस्ट पॉलिसी असे केले होते. सध्या त्यापुढे एक पाऊल जावून अॅक्ट-ईस्ट पोलिसीचा बोलबाला आहे. पंतप्रधानांच्या मंगोलिया, बांगलादेश भेटीनंतर याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.
मिसळपाव