Skip to main content

'राहून गेलेलं काही...'

लेखक एस यांनी सोमवार, 29/06/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
'राहून गेलेलं काही...' 'वेडीच्च आहेस तू कशाला केलंस बरं माझ्यासारख्या सडाफटिंगाशी लग्न? आणि तू हसून म्हणावं तुम्ही हुशार आहात ना, म्हणून. हे तुझं वेडेपण समजून घेणं राहूनच गेलं किनार्‍यावरल्या रेतीत तुझा हात हातात घेऊन पहिल्यांदाच चाललो होतो असे हरवलो होतो की कळलंच नव्हतं कधी तुझ्या पायातलं जोडवं पळवलं होतं लाटांनी ते परत आणण्याच्या बहाण्यानं पुन्हा फिरलो होतो दोघं तसं परत एकदातरी फिरायचं राहूनच गेलं तसंही गजराबिजरा आणायची मला कुठली असायला आठवण आणि राहू द्या, फुलं झाडावरच चांगली दिसतात हे तुझं नेहमीचं समजूतदार वागणं पण तुझ्या लांबसडक वेणीतही ती तितकीच छान दिसतात हे तुला म्हण

वॉट्सअप आणि वॉट्सऍप

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 29/06/2015 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
"वॉट्सअप म्हणजे रे काय भाऊ?" "अरे,वॉट्सअप म्हणजे तो एक पश्चिमी देशात दोन व्यक्तीत संवाद साधण्य़ापूर्वी उच्चारलेला वाक-प्रचार आहे.हेलो आणि हाय ह्या ऐवजी हा वाक-प्रचारही वापरला जातो." "म्हणजे भारतात,दोन मराठी माणसं भेटल्यावर, "काय चालंय?" म्हणतात. किंवा दोन गुजराथी माणसं भेटल्यावर, सुं चाले छे?म्हणतात. किंवा दोन हिंदी भाषिक भेटल्यावर, "क्या चल रहा है?" म्हणतात असं म्हटल्यासारखं का रे भाऊ?" "अगदी बरोबर.वॉट्सअप हा वाक-प्रचार त्यांच्याकडे पूर्वापार आहे." "अरे,मग, वॉट्सऍप म्हणजे रे काय भाऊ?" "अरे,स्मार्ट फोनवर संवाद साधण्यासाठीची एक ऍप आहे ती." "ऍप म्हणजे रे,काय भाऊ?" "अरे,ऍप म्हणजे ऍप्लीकेशन.

"मालवून टाक दीप"

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 29/06/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ती संध्याकाळ मंतरलेली…। या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे. आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 28/06/2015 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मग मि ही फार विरोध न करता , 'एकदा आणू हिला आणि पोरांना त्या महाराजाच्या मांडवाखालून . मी असल्यावर करणार काय तो लबाडी? अहो महाराज असला ,तरी आमच्याच शेजारच्या मांडवातला..सांगुन सांगुन सांगेल काय??'...असा विचार करुन हिच्या आणि मामा गोडश्याच्या सह जायला तयार झालो.... पुढे चालू... ========================= मग ती अमावस्या आली .आणि ठरल्याप्रमाणे आम्ही महाराजाकडे जायला तयार झालो.

रिटर्न गिफ्ट

लेखक रातराणी यांनी रविवार, 28/06/2015 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज तोही आला होता त्याच्या आईबरोबर. ठिगळ लावलेला शर्ट आणि मळकी पँट.

कृष्णबन- २

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 28/06/2015 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी:- कृष्णबन- १ दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच खोलीबाहेरच्या बाल्कनीत खुर्च्या टाकून कितीतरी वेळ समोरच्या त्या डोंगरमाळा निरखत राहिलो. उंच उंच घनदाट गर्द हिरवे सूचीपर्णी अरण्य लांबून अगदी काळेसावळे दिसत होते. आता अगदी पटलेच हे नाव कसे पडले ते! गर्द हिरव्या रंगात मिसळलेली सावली सारं रान सावळंकाळं करून टाकते आणि आकाशातून पाहताना तर ते अजूनच पटते. . आवरून मग नास्त्याच्या हॉलमध्ये आलो.

द स्केअरक्रो - भाग ‍६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 28/06/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ द स्केअरक्रो भाग ६ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली ) सोनी लेस्टर आणि मी वँडा सीसम्सच्या घरातून जेव्हा निघालो तेव्हा सगळी वस्ती जागी झालेली होती आणि कामात होती.

अधिक महिना व जावया साठी वाण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/06/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
अधिक महिना व जावया साठी वाण .............................. अधिक महिना होता.. सावित्री बाईंची लगबग चालू होती.. जावई केशव व मुलगी सुनंदा प्रथमच परगावा हून धोंड्या च्या महिन्या निमित्त सासुरवाडीला येणार होते.. जावई केशव तसा साधा भोळा माणूस असतो..लग्ना नंतर प्रथमच तो सासुरवाडीला येणार असतो.. आपला मुलगा प्रथमच सासुरवाडीला जात असल्याने केशवच्या आई वडिलांनी सासुरवाडीला कसे वागावे याचे सल्ले दिलेले होते.. मोजकेच बोलावे..