Skip to main content

'किल्ला' आणि प्रेक्षक!

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 02/07/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(चित्रपट पाहिला नसल्यास सूचना: काही किरकोळ स्पॉइलर आहेत, त्यामुळे नंतर तक्रार चालणार नाही :) ) काल रात्री किल्ला पाहण्याचा योग आला. चित्रपट निश्चित आवडला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून काही (अस्वस्थ करणारे) प्रश्न पडले. चित्रपटाचा विषय खूप तरल आहे आणि विनोदी प्रसंगांची पेरणी असली तरी ती गरजेनुसार वातावरण निर्मितीसाठी किंवा असे म्हणूयात एकसुरी/संथ होणे टाळण्यासाठी केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट खूप बोलत नाही. दृश्य-परिणामकारकता(शब्द चुकल्यास सुचवावे), पार्श्वसंगीत आणि शांतता यातून खूप गोष्टी सांगून जातो. हा चित्रपट एक अनुभव म्हणून आपल्याशी जोडून घ्यायचा आहे असे मला वाटले.

मुंबई-पुणे-मुंबई-१

लेखक वाचन प्रेमी यांनी गुरुवार, 02/07/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपाव रसिकांना नमस्कार ! प्रथमता मी स्वताची ओळख करून देतो. मी मुंबईचा पण नेहमी प्रमाणे मुंबईकर हे आता मुंबईच्या बाहेर राहू शकतात (ठाणे आणि त्या पुढे ). असाच ऑफिस मध्ये बसल्या बसल्या बेत ठरला. बरेच महिने कुठे बाहेर जाण्याचा योग आला नव्हता. बायकोला फोन करून सांगितला आपण शनिवार रविवार पुण्याला जातोय, थोडी आश्चर्य चकितच झाली की अचानक काय मनात आल? बायकोची चुलत बहीण राहते पुण्यातल्या नवी पेठेत म्हटलं त्यांना पण भेटता येइल. नेहमी प्रमाणे माझ्या ऑफिसच्या बॅचमेट्सना whatsapp वर message केला,"शनिवार-रविवार पुणे" कुणी येणार का? २-३ मित्र मैत्रिणी म्हणाले चालेल पण प्लान काय आहे?

लंपन मालिका वाचून संपली!

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 02/07/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस/महिने बाजूला ठेवत आलेलं 'झुंबर' आज वाचून संपलं. हुरहूर लागणार माहित होती आणि मलपृष्ठ वाचून शेवटच्या कथेत काय असणार याचा अंदाज आला होता पण वाचत असताना वेगळंच काही तरी होत होतं. 'स्पर्श' वाचत असताना सुरुवातीला 'संकेश्वर', 'गडहिंग्लज', 'आजरा' ही ओळखीची आणि जवळची गावे बघून छान वाटत होत, त्यात लंपन च्या आई-बाबांचं गाव बहुधा 'पुणे' असावं असंही सुचित झालं जे आज पर्यंत माझ्यासाठी कोड होत किंवा लक्षात नव्हत आलं . एकंदरीत या कथेचा बाज थोडा वेगळा वाटत होता, आतापर्यंतच्या इतर कथांपेक्षा.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/07/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४ खराब हवामानाने जर्मनीच्या समादेश साखळीत चांगलीच शिथिलता आली. जवळजवळ सगळ्याच मुख्यालयातून ‘आता लगेच काही आक्रमण होत नाही’ असे बोलले जाऊ लागले.

आयुष्य आणि करीअर...

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 02/07/2015 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
career
चिनार यांच्या माझं करीयर मार्गदर्शन (!) या लेख व प्रतिसादांवरून सुचलेले व कायम साचलेले विचार आणि निरिक्षण (काही चुकत असेल तर अवश्य सांगा): एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात.

अर्थक्षेत्र भाग 7 : "ट्रेंड" ते ट्रेड (ब)

लेखक ज्ञानव यांनी बुधवार, 01/07/2015 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थक्षेत्र भाग ७ : अ मी शेअर्स घेतले हे लक्षात घेऊन "मार्केटने" मंदी करताच कामा नये ते केवळ वरच गेले पाहिजे ? पण मार्केट तर कुणाचे नाही आणि कुणासाठी थांबत नाही मग गेले तेल लावत मी पण मार्केट कधी माझ्या पदरात पैसे टाकेल ते पाहत बसणार नाही. शेवटी जो ओरडतो त्याचेच चणे विकले जातात मेहनत आहेच कुठे हि आणि कुठ्ल्याही क्षेत्रात. मग थोडे प्रयत्न आपण हि करू की ! ५०० रुपयाने मी जर एखादा शेअर घेतला तर माझी मानसिकता अशी की माझा ब्रेक इव्हन हा रुपये ५००+१०% व्याज =५५० आहे.

भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी

लेखक वडाप यांनी बुधवार, 01/07/2015 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी- ३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याला भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी होती ती फार आवडून डुआइडींनी चट्टामट्टा केला. वरिजिनल आइडींनी त्यात विंटरेस्ट दाखवल्याने पाककृती देत आहे. मध्यवर्ती ठिकाण येथील एक कट्टाफेममुवि नामक आइडी पाककृती लिहितांनाही बराच द्विपात्री वगैरे काही मसाला मारतात आणि "घरच्यांची आणि दारच्यांची " वाहवा मिळवतात असे ऐकून आहे.