बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे'
काही दिवसांपूर्वी कोर्ट चित्रपटाबद्दल लिहिताना मी असे म्हटले होते कि दैनंदिन घटनांचे चित्रण पाहायला मला आवडते. 'कोर्ट' मध्ये न्यायालयातील सुनावणी ही अश्याच दैनंदिन गोष्टींपैकी होती. 'कोर्ट' पाहून झाल्यावर लगेचच तश्याच धाटणीचा एखादा चित्रपट पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. पण ती वेळ काल आली.
'आशा जावर माझे' हा बंगाली चित्रपट. पण इथे भाषा कोणती याचा काहीच फरक पडत नाही कारण चित्रपटात संवादच नाहीत. पार्श्वसंगीत सुरु असते, लोक बोलतात, रेडीओ वर गाणी सुरु आहेत पण चित्रपटामधील मुख्य पात्रे मात्र काहीच बोलत नाहीत. या चित्रपटाचे इंग्रजी मधील नाव आहे - लेबर ऑफ लव्ह. परंतु हे शब्दशः भाषांतर नाही.
मिसळपाव
आता धबधबा, तो ही जर्मनीतला सर्वात उंच धबधबा बघायचा होता. आधीच धबधबा म्हटलं की कोसळत,धबाबा येणार्या पाण्याच्या धारा,तो पाण्याचा खळाळता आवाजच संमोहित करतो, इथे तर जर्मनीतला सगळ्यात उंच धबधबा पहायचा होता. १६३ मी. उंचीवरुन कोसळत तो गुटाख नदीकडे धाव घेतो. उत्साहाने आणि उत्सुकतेने आम्ही चालायला सुरूवात केली.