अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव
अनेक मिपाकरांनी माझ्या पहिल्या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे मी हा दुसरा लेख लिहीत आहे - अमेरिकेत आल्यावर माझा पहिला हॉटेलचा अनुभव. मागच्या लेखात मी माझा अमेरिकेला येण्याबाबतचा अनुभव लिहीला होता.
http://www.misalpav.com/node/31795
मी न्यूयोर्कमध्ये पोहोचल्यावर मित्राकडे आलो. तो त्याच्या roommates बरोबर राहायचा पण त्याचा roommate समर vacation साठी भारतात गेला होता आणी त्याच्या जागी माझी राहायची सोय झाली. मित्राच्या घरी पोहोचल्यावर गप्पा वगैरे झाल्या.
मिसळपाव
