दादाचा नाद नाही करायचा ss {न.ऊ.-२}
लहानपणी थोरला भाऊ म्हणजे दादा हा नेहमीच आपल्या साठी एक आदर्श असतो .त्याच्या मध्ये आपण नेहमीच आपल्या वडीलांची प्रतिमा पहात असतो .त्याचे आदर्श हे देखील आपले आदर्श असतात .त्याच्या बद्दल कोणी वाईट बोललेले आपल्याला आवडत नाही .त्याच्या बऱ्या,वाईट प्रसंगात नेहमीच आपण त्याच्या बरोबर असतो ,बऱ्याच वेळेस आपण त्याचे अनुकरण करतो . निदान लहानपणी तरी हे विचार प्रत्येका जवळ असतात .
माझा दादा माझ्या पेक्ष्या चार पाच वर्षांनी मोठा असेल ,पण तो माझ्या साठी आदर्श होता .
सायकलिंग ह्या स्पोर्टमध्ये भारतीयांनी मिळवलेला विजय,
नाशिक मधील डॉ महेन्द्र महाजन वय ३९ आणि डॉ हितेन्द्र महाजन वय ४४ यांनी जगातली एक अत्यंत कठिण सायकल रेस अमेरिकेतील RAAM आज पूर्ण केली. ही रेस त्यांनी team india:vision for tribals ह्या नावाने टीम रेस म्हणून पूर्ण केली. ३००० मैलाची ही रेस दोन जणांच्या ह्या टीमला नऊ दिवसात पूर्ण करायची होती. ती त्यांनी आठ दिवस चौदा तास आणी ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंचे अंतर ह्यात पार करायचे होते. अनेक घाटांमधून जाणार्या रस्त्यावर ९००० फूट उंचीचा सर्वात मोठा पासदेखील होता.
छायाचित्रकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा: मतदान
नमस्कार मंडळी! या स्पर्धेचा विषय जरा अवघड होता, मात्र तरीही खूप सुरेख प्रवेशिका आल्या आहेत. हा धागा मतदानासाठी. तुमच्या पसंतीचे पहिले तीन क्रमांक या धाग्यावर ८ तारखेपर्यंत नोंदवा.
भटकंती- ८ तदाओ आंदो
भटकंती - ८
तदाओ आन्दो .
आर्किटेक्चर्ला असताना कॉलेज ला दांडी मारून केलेले उद्योग पण समृद्ध करणारे होते.
उगाच एम८० वर डेक्कन वरून , मुळशी, कोंढवा, बाणेर वगैरे उन्हात भटकून तथाकथीत कंटेपररी ( पुण्यात चुकार एखाद दोनचार उदाहरण वगळता दुष्काळ होता तेव्हा ) आर्किटेक्चर चा अभ्यास! कंटेम्पररी , समकालीन हा शब्द आवडायला लागला होता. एक प्रकारच सबकल्चर/ कल्ट होउ घातलेले आम्ही काही बॅक बेंचर्स! पुण्यात काहीही नाही ह्यावर शिक्कामोर्तब करून, जगात इतर आर्किटेक्ट कसे विचार करतात , व्यक्त होतात , रुढ पायंडे मोडताना काय आणि कसा संघर्ष करतात. हे समकालीन नमुने बाकी कुठे कुठे काय आहे?
राणीच्या देशात - फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड
भाग -१
राणीच्या देशातील बरीच सुप्रसिद्ध ठिकाणं आपल्याला माहित आहेतच पण अशी ही काही प्रेक्षणीय स्थळं आहेत जी फारशी कुणाला माहित नाही किंवा त्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. जशी जशी स्थानिक ठिकाणं फिरण्याचा अनुभव घेऊ तसे तसे किंवा इतर अंतर्गत ठिकाणांबाबत माहिती ह्या लेखमालेच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. पहिला भाग हा धरुन पुढच्या भागाची, नव्या जागेची माहिती देण्यास सुरुवात करतेय.
कॅरावॅन हॉलिडेला गेलो असता गेल्या वर्षी आणि ह्या ही वर्षी फ्लॅमबराहला जाणे झाले.
आमचेही प्रवासवर्णन…
Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा)
आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं.
********************************************************
मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो.
टोचणी
रात्री दहा वाजता ऑफिसातून घरी जाताना
रस्त्यात बसलेली एक म्हातारी दिसली
ती फुटपाथवर नं बसता रस्त्यातच एका कडेला
थंडीमध्ये स्ट्रीट लाईट च्या मंद केशरी प्रकाशात बसलेली होती
खरं तर ती एक भिकारीण होती
पण नेहमीप्रमाणे ते गृहीत धरून दुर्लक्ष करून जाता आलं नाही
कारण ती हात पसरून भिक मागत नव्हती
जाणाऱ्यां येणाऱ्यांना आवाज देत नव्हती
आपापल्या घरी चाललेल्या लोकांच्या गर्दीमध्ये
त्या रिकाम्या होत चाललेल्या रस्त्यावर
गुडघ्यावर हनुवटी टेकवून खाली जमिनीकडे बघत
ती बसली होती अगदी चुपचाप....
करार
"करार...!!"
त्याच्या स्वप्नांनी जेंव्हा तिच्या रात्रींशी करार केला...
समुद्रही आनंदाने, होता अगदी उधाणलेला...
चंद्रानंही त्याचं चांदणं दिलं असं शिंपडून…
आता कसली हाय?, कसली धग?.... आणि कसलं उन...?
नदीच्याही प्रवाहानं वळण घेतलं, इतकं सुंदर….
रातराणीनंही दाही दिशांना उधळून दिलं, तिचं अत्तर...
सार्या कळ्यांनी फुलांसकट माना टाकल्या, अगदी लाजून...
सारं रान श्रावण सरींनी गेलं, एका क्षणात भिजून…
जागोजागी पडू लागली, नक्षत्रांची रासं...
...................तर, करारात ठरलं असं...
कि .. त्यानं.. त्याच्या स्वप्नांनी..
मिसळपाव