Skip to main content

बारिश की मेमरी

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 03/07/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
बारिश की मेमरी भी बड़ी अजीब होती पत्तो को हरा कर देती है, इंसान को सुखा । खैर वो छोड़ो खिड़की से बाहर हाथ निकालकर देखा है कभी, वोही बारिश अपने पन का भी एहसास देती है । तुम्हे याद है 'सखी' वो बारिश का दिन जब हम दोनों हाथ में सैंडल लिए, नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे । उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो । वैसे तो एक अर्सा गुजर गया है इस बात को पर आज भी वो दिन याद से गया नहीं । वो एक दिन था, और आज एक दिन है उस वक़्त हम साथ होने के सपने बुनते थे, आज सपने सच हो के साथ है । ‪#‎Gypsy‬ ‪#‎सखी‬

भेट १२ वर्षानंतरची.. { भाग १ }

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 03/07/2015 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त दोन दिवस राहिले होते माझ्या विसाव्या वाढदिवसाला. त्याचे प्ल्यानिंग करण्यात गुंतलो होतो. आणि आईने हाक मारली. " संजय , अमिताचा फोन आहे. " मी चमकुन तिच्याकडे पाहिलं आणि हातात मोबाईल घेतला. अमिता माझी सख्खी मामेबहिण. पण आमची भेट जास्त वेळा झाली नव्हती.लहान होतो तेव्हा लक्ष्ात आले नाही पण मोठे झालो तसे ही बाब खटकू लागली होती. मामाकडुन कधी मला बोलावणे आले नव्हते आणि आम्ही जरी बोलावले तरी ते कधी जास्तवेळा आल्याचे स्मरत नव्हते. फक्त मी आठ वर्षाचा असताना तिला कोणाच्यातरी लग्नात पाहिले होते. लग्नाकडे दुर्लक्ष करुन आमच्या गप्पा चालल्या होत्या. पुढच्या दिवशी तिने आमच्या घरी येण्याचे कबुल केले.

चेनै (मद्रास) मध्ये किंवा १५-२० किमीच्या आसपास कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 02/07/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, बहुदा पुढच्या आठवड्यापासून , कदाचित सोमवारपासून, मी चेनै (मद्रास) येथे काही कामा निमीत्त जाणार आहे. मुळात आमही कट्टेकरी, त्यामुळे जिथे जावू तिथे आम्ही "मिपाकर" शोधतो आणि कट्टा करतो. आत्ता पर्यंत आम्ही बरेच कट्टे केले. पार अगदी दुबई पासून ते थेट कळवा व्हाया जिजामाता उद्यान. यान्बूत तर बरेच कट्टे केले. ते असो. तर एखादा कट्टा चेनैत पण करायचा विचार आहे.(काम तो सिर्फ बहाना हय.) कळावे, लोभ आहेच तो चेनैच्या कट्ट्याच्या निमित्ताने वाढावा ही चेनैच्या मिपाकरांना विनंती. कृपया, चेनैकर मिपाकरांनी व्यनि मार्फत संपर्क करावा. आपलाच (कट्टेकरी) मुवि

पुन्हा पाऊस

लेखक सटक यांनी गुरुवार, 02/07/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला रे पाऊस, असे असे बरसले अधीरल्या धरतीचे, लाजू लाजू पाणी झाले ! अंगप्रत्यंगी थरार, गात्रे ओथंबू वाहाती एका रात्री असे झाले, काय सांगू तुल किती ! किलकिले डोळे होतं, वाटे थांबल्यासारखे... आळसल्या त्या सकाळी, देता आळोखे पिळोखे ! हाय! परतुनी आला, पुन्हा रत अविरत.. सुखांताने अंधारून, देई आकाश संगत ! धुंद धरा धुंद पाऊ, माग कुणालाच नाही उद्या सकाळी परंतु, वर येई नवलाई ! तरारून येता कोंब, पहा झुलतात झुले मीलनाच्या एकांताला, येती हिरवाळी फुले ! हिरवाळीत नवोढ्या, मन भटक भटक उगी रोखू पाहू नको, होई पाऊल "सटक" !
काव्यरस

रामायण कथा - रुमा - एक मूक स्त्री

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 02/07/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
रामायणात रुमाची ओळख सुग्रीव पत्नी असे आहे. जिथे ताराच्या प्रखर व्यक्तित्वाची जाणीव रामायणात होते, तिथे रुमाच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. कारण स्पष्ट आहे, रुमा एक सामान्य स्त्री होती. सर्व अन्याय चुपचाप सहन करणारी. अश्या सामान्य स्त्री साठी कोण कवी आपले शब्द सामर्थ्य खर्च करेल. तरीही तिला काय सहन करावे लागले याची कल्पना आपण करू शकतो. वानर समाजात पतीच्या मृत्यू नंतर स्त्री पुन:विवाह करू शकत होती. वालीने जर सुग्रीवचा वध केला असता तर रुमाला सुग्रीवच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा तरी मिळाला असता.

असं काहीतरी...

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 02/07/2015 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
अवघडच आहे हे वळण, चालवतही नाही आणि थांबवतही नाही.. झालंय असं काहीतरी. वेळ काढणंच चालू आहे सध्या, शेवटचाच आहे हा प्रवास नाहीतरी. कणाकणाने मी झालीच आहे जीर्ण, टाकवतही नाही आणि ठेववतही नाही.. झालंय असं काहीतरी. मोडलंस एकदाच तर बरं होईल, तुझी मुळं आता पसरलीत नाहीतरी. तू यावस म्हणून रेंगाळलेय दारात, बंद करवतही नाही आणि उघडतही नाही.. झालंय असं काहीतरी. तोही सोपस्कार करून जा, मनाची दारं बंदच आहेत नाहीतरी. स्वप्नांचे डाव माझ्या रचलेस खरे, खेळवतही नाही आणि मोडवतही नाही..

मौरिशस ला जातोय..तरी काही माहिती हवी आहे

लेखक स न वि वि यांनी गुरुवार, 02/07/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या ऑक्टोबर मध्ये मित्र-मैत्रिणी सोबत मौरिशस ला जातोय. ३ जोडपी आणि एक २.५ वर्षाचे मुल सोबत आहे. आमचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे. तरी काही माहिती हवी आहे आणि ती मिळेल ह्याची खात्री आहे. आम्ही Coin de mire attitude - Mauritius मध्ये राहणार अहोत. आमच्या ६ दिवसाच्या ट्रीप मध्ये पहिले ३ दिवस sightseeing आहेत आणि बाकी चे ३ दिवस मोकळे जे आम्ही आमच्या सोयीनुसार घालवायचे. ह्या ट्रीप संधर्भात काही प्रश्न आहेत, जसे: १. साधारण जेवण कितपत खर्चाचे असते? आपली currency, MUR च्या दृष्टीने बरीच कमी आहे जसे. आपले INR १० = MUR ५. ५५. तसे हॉटेल चा हाफ बोर्ड चा (BF + Dinner ) प्लान घेतला आहे.

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/07/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
फसवले काळासही मधुमास होते भोगले जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला जानकीने का इथे वनवास होते भोगले ? दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली यार, फसलेले किती अदमास होते भोगले वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ? स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा काफिया : मधुमास, मरणास, वनवास, परिहास, सहवास, उपहास, अदमास रदीफ़ : होते भोगले विशाल
काव्यरस