Skip to main content

घरट्यातून पडलेलं पिलू

लेखक पथिक
गुरुवार, 16/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
परवा संध्याकाळी चालता चालता रस्त्याच्या बाजूला जांभळाच्या एका झाडाखाली पक्षाचं एक पिलू दिसलं. दोन-तीन फुटापर्यंत ते उडत होतं अन परत खाली बसत होतं. त्याच्या बाजूलाच एक बुलबुल येउन बसला. अस्वस्थपणे तो चिवचिव करत होता. बहुतेक त्या पिलाचा बाबा असावा. कारण त्याचा गळा लाल होता. मादी तशी असते कि नाही माहिती नाही. कोणी माणूस येताना दिसलं कि तो बुलबुल उडून झाडावर बसत होता अन मग परत खाली त्या पिलाजवळ येत होता. मी बाजूला पडलेली एक वाळकी डहाळी घेतली अन त्या पिलापुढे धरली. पिलू त्या डहाळीला पकडून बसलं अन मग मी ती त्या झाडाच्या फांदिजवळ नेली. पिलाने झाडाची एक बारीक डहाळी पकडली. मग मी बाजूला झालो. पिलाचा बाबा त्याच्या जवळच्या एका डहाळीवर जाऊन बसला. त्या झाडावरच त्यांचं घरटं असेल असं मी गृहीत धरलं कारण आजूबाजूला मोठं झाड नव्हतं. आणखी काही करता येत नाही हे पाहून मी तिथून निघालो तेव्हा ते पिलू तसंच त्या डहाळीला पकडून होतं आणि त्याचा बाबा बाजूला चिवचिव करत बसला होता आणि अंधार वाढत होता. पुढे काय झालं असेल ते जाणकार बहुदा सांगू शकतील…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2279
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अरे रस्त्यापलीकडल्या झाडावरच्या सोसायातील्या कुलकर्ण्यांचा मधु ना रे तु ? इथं कोणी आणून सोडला तुला ?

छान आहे लेख. मदत करण्याची तत्परता दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दुसर्या दिवशी चेक करायला हवं होतं. असो.

In reply to by जडभरत

ते पिलू नक्कीच वाचलं असेल. ते परत घरट्यात न जाता त्याच्या आई बाबांसोबातच राहील असं एका जाणकाराने सांगितलं.

आमच्या घराच्या बाल्कनीतल्या घरट्यातली बुलबुलाची पिले एक दोन तासात उडणे शिकलेली पाहिली आहेत. त्यावरून ते पिल्लूही काही वेळाने भुर्रकन उडून गेले असेल असाच आशावाद ठेऊया !

निदान काही वाईट बघावे लागले नाही नशीब!