द स्केअरक्रो - भाग १३
द स्केअरक्रो भाग १२
द स्केअरक्रो भाग १३ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
अँजेलाला तिथे बघून मला एवढा धक्का बसला की मी प्रतिक्षिप्त क्रियेने मागे झालो आणि माझी पाठ जोराने जवळच्या कपाटाला आदळली. त्याच्यावर एक जुन्या पद्धतीचा, लँपशेड असलेला दिवा ठेवलेला होता. तो खाली पडला आणि फुटला. रॅशेल ओरडली, “ काय झालं जॅक?”
मी कसंबसं पलंगाकडे बोट दाखवलं, “अँजेला...ती...ती पलंगाखाली आहे.”
रॅशेल माझ्या बाजूला आली आणि तिनेही पलंगाखाली वाकून पाहिलं, “ओ माय गॉड!
मिसळपाव