Skip to main content

जडण- घडण : 23

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 22/07/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
सौम्य मंगळाच्या प्रसंगानंतर वेगात धावणाऱ्या गाडीला गच्चकन ब्रेक लागावा, तसं झालं. आत्तापर्यंत आपण एकतर्फी किंवा एकांगी विचार करत होतो का, ते तपासून बघावं, असं वाटू लागलं. ... मी स्वत:ला लादतेय का याच्यावर, हा पहिला विचार मनात आला. अरे बापरे... लादलेलं कोणतंही नातं वाईटंच. आणि हे कळत असूनही मी तेच करत असेन तर ते आणखी वाईट. खरंच मी स्वत:ला लादत असेन, तर आत्ता इथेच थांबावं. मला त्रास नक्कीच होईल. खूप वाईटही वाटेल. पण लादलेली नाती नाही टिकत. त्यामुळे तसं असेल तर इथेच थांबलेलं बरं. आणखी एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. अगदी ठरतंय, असं वाटणारं एक लग्न रहित झालं खरं.

स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 22/07/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर.

सुर्याची लेकरे

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 22/07/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला.

चलते क्या....पानिपत....२४-२५ जुलै..!!!

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी मंगळवार, 21/07/2015 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
तर...अचानक दिल्लीत काम निघाल्याने शुक्रवार २४ जुलै ला दिल्लीत जायचे आहे. १-२ तासाचे काम आहे. ते झाल्यावर बॉस परत जाणार आहे. आता जातिवंत भटक्याला वीकांत मिळाल्याने पानिपतची मोहीम ठरवून टाकली. आधीच तिथे जायची फार इच्छा होती त्यात सारथी, बिपीन कार्यकर्ते आणि जयंत कुलकर्णी यांनी जोरात लेख लिहून आगीत तेल ओतले आहे. तेव्हा २४ च्या संध्याकाळ पासून २५ च्या संध्याकाळ पर्यंत मुक्काम पोस्ट पानिपत. कोणी दिल्लीकर बरोबर येणार असल्यास स्वागत आहे. तसेही एकट्याने जाणे आणि शोध घेणे भलतेच काम आहे. कोणी चांगला मार्ग, ठिकाण, ऐतिहासिक जागा, किल्ले सुचवू शकत असेल तर जरूर सुचवा.

पाऊस आणि 'ती'

लेखक शब्दानुज यांनी मंगळवार, 21/07/2015 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिमणार्या पावसाने मला कुशीत घ्यावे माझे अस्तित्वही त्या क्षणी हरपावे अोघळणार्या थेंबाच्या प्रतिबिंबात तुला पहावे पाहुन मला तू खुदकद गालात हसावे हरपलेले अस्तित्व मला पुन्हा गवसावे तुझ्या हातांनी पावसाचे थेंब अडवावे वेगवान वारयाने पार्श्वसंगित द्यावे अचानक तुझा हातांना लकवे भरावे हातातुन निसटून तू उडुन जावे हाती फक्त तुझे हॅंडल रहावे गाडीने चिखलाचे चित्र कपड्यांवर काढावे रिमझिमणार्या पावसाने मला कुशीत घ्यावे..

"ती" - २

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 21/07/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" - १ पत्रिका आलीय हे कळल्यावर नैराश्याचा झटका वगैरे येतोय की काय असे वाटले. एका खोलीतून दुसर्या खोलीत जायचे देखील त्राण उरले नाही. जेवणावरची तर इच्छाच उडाली. असे कसे अचानक लग्न ठरलं. विचार करुन करुन डोकं फुटायची पाळी आली. असेही मी कोण होतो जे तीच्या घरचे लोक माझी परवानगी घेणार होते कींवा मला कळवणार होते. मी होतोच कोण. एक तथाकथीत सुशीक्षित बेरोजगार. काम ना धंदा. आणि असला तरी ते मला का विचारतील. मी तर गेली कित्येक वर्षे त्यांच्या कुटूंबीयांना भेटलो नव्हतो. येणे जाणे नाही, फोन नाही. मी उगाच आपला आभासी विश्वात जगत होतो.

बेच दे !…… (शतशब्दकथा )

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 21/07/2015 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं… "अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?….

आंबा कलाकंद

लेखक तळ्यात मळ्यात यांनी सोमवार, 20/07/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.

आंबा कलाकंद

आंबा कलाकंद आंब्याचा सिझन संपून गेलाय खरा, पण हल्ली मँगो पल्प तर वर्षभर मिळतो आणि मिपावरची माझी पहिली रेसिपी गोड असावी म्हणून आजचा मान आंब्याला! हे हलवाई कशा बाई एवढ्या सुंदर बर्फी तयार करतात असं लहानपणी वाटायचं. पण स्वैपाकघरात वावर रोजचा सुरु झाला आणि रेसिपी कमी पडू लागल्या. नेहेमीचीच पक्वान्नं करण्यापेक्षा असे वेगळे प्रयोग सुरु झाले. हे अशक्य वाटणारे पदार्थ यशस्वी झाल्याचा केवढा आनंद असतो नाही का!

शरदातला स्वित्झर्लंड : ०८ : टिटलिस-एन्गेलबर्ग, देवदूतांचे क्रिडांगण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 19/07/2015 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

~ संस्कृती ~ (शत शब्द कथा)

लेखक पुणेकर भामटा यांनी रविवार, 19/07/2015 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे येडXव्या!" त्याच्या नकळत त्याचा आवाज टिपेला पोचला. इतक्यात शेजारून "हाऊ चीप ! डिस्कस्टिंग ! दिस ब्लडी विलेजर्स न देअर कल्चर !