[शतशब्दकथा स्पर्धा] काळजाचा ठोका
"झालं सगळं! आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता आपण." संकेत आनंदी होता.
"हो ना, पण कर्ज खूप मोठं आहे रे. आपल्याला झेपेल ना हे?" सानिकाच्या स्वरात काळजी डोकावत होती.
"काळजी नको करूस. सॉरी, तुझ्या आवडत्या बांगड्या मात्र विकाव्या लागल्या..."
"नो प्रॉब्लेम! बांगड्या पुन्हा करता येतील.”
"हम्म…कर्जाचा ईएमआय थोडा कठीण जाईल. बघू, महिन्याभरात माझं प्रमोशनही होईल बहुतेक..."
दुसऱ्या दिवशी सकाळी संकेतच्या मोबाईलवर कंपनीच्या एमडीचा फोन आला. संकेतला ताबडतोब भेटायला बोलावलं होतं.
मिसळपाव
"खरेतर अशोकानंतर लगेचच मौर्यसाम्राज्याची पडझड झाली , त्याआधी बांधलेल्या लेण्यांपैकी ही एक !" प्रो.लँग्डन तल्लीनतेने सांगत होते.
"पण मग अशोकाने जमावलेल्या बुध्दिस्ट रेलिक्सचे काय झाले ?