Skip to main content
लेखक उपयोजक यांनी रविवार, 04/10/2026 12:16 या दिवशी प्रकाशित केले.

मायकेल गॉकेलिन हा फ्रान्स मधल्या पॅरिस या शहरात १९२८ साली जन्मला. गॉकेलिनने विविध व्यावसायिक क्षेत्रातील हजारो लोकांचे जन्मटिपण म्हणजे जन्मवेळ , जन्मतारीख आणि जन्मठिकाण हा डेटा घेऊन त्यांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले.गॉकेलिनचे ज्योतिषविषयक मुख्य सांख्यिकीय संशोधन साधारण १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून १९८० च्या दशकापर्यंत चालले.
 हे करताना त्याने वैदिक ज्योतिषाप्रमाणे जन्माच्या वेळचे आकाश बारा राशींमध्ये न विभागता ग्रहाच्या जन्मस्थानावरून दिसणाऱ्या दैनिक आकाशमार्गाचे १२ विभाग केले होते. त्यामध्ये त्याला असे आढळले की पूर्व क्षितिजावर विशिष्ट ग्रहाच्या उदय बिंदूपासून लगतच्या वेळेत जे लोक जन्मले तसेच तोच ग्रह मध्यान स्थानी गेल्यानंतर (Mid heaven) च्या लगतच्या वेळेत जन्मलेले जे लोक होते ते त्या ग्रहाशी संबंधित व्यवसायामध्ये उत्कृष्ट/प्रसिद्ध कामगिरी केलेले असे लोक होते.  म्हणजे समजा जर पूर्व क्षितिजावर मंगळ उगवला असेल तर त्याच्या उदय बिंदूपासून लगतच्याच वेळेत तसेच मंगळ मध्यानावर गेल्यावर त्याच्या लगतच्या वेळेत जन्मलेले जे लोक होते ते सैन्य , मैदानी खेळ , पोलीस दल , मिलिटरी बँड तसेच अन्य अशी क्षेत्रे ज्यात शारीरिक कष्ट , जोम , धडाडी धाडस हे फार महत्त्वाचे असते अशा क्षेत्रांमध्ये नावाजलेले लोक होते.

  गॉकेलिन याने केलेले हे संख्याशास्त्रीय संशोधन फार महत्त्वाचे आहे. कारण गॉकेलिन हा ज्योतिषशास्त्र शिकला होता आणि तो अतिशय उत्तम असा संख्याशास्त्रज्ञ देखील होता. त्याने मानसशास्त्रामध्ये देखील डॉक्टरेट मिळवली होती. गॉकेलिन याच्या या संशोधन कार्यात त्याची पत्नी फ्रांसवाझ हिनेदेखील मोलाची मदत केली होती.

 गॉकेलिनच्या संशोधनातून आलेल्या अन्य काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.

१) गॉकेलिनने आनुवंशिकता या दृष्टीने ज्योतिषशास्त्रीय पडताळणी करून पाहिली त्यावेळी त्याला असे आढळले की आई किंवा वडील यांच्या जन्माच्या वेळी जे ग्रह प्रभावी(उदित बिंदूपासून लगतच्या वेळेत) होते तेच ग्रह अपत्यांच्या जन्माच्या वेळी देखील तसेच प्रभावी असलेले दिसतात. परंतु याला एक मर्यादा अशी देखील आहे की गॉकेलिनच्या मते, Caesarean किंवा प्रसूतीमध्ये वैद्यकीय हस्तक्षेप झालेल्या जन्मांमध्ये त्याने शोधलेला planetary heredity effect आढळत नव्हता.

२) ग्रहांचा प्रभाव हा विशिष्ट प्रकारचा व्यवसाय किंवा कौशल्य यासाठी लाभदायक/जुळणारे असणारे व्यक्तिमत्व निर्माण करतो. विशिष्ट ग्रह विशिष्ट व्यवसाय चालवण्यासाठी सहाय्य करतो असा त्याचा अर्थ नव्हे. विशिष्ट ग्रहाचा आणि विशिष्ट व्यवसायाचा संबंध नाही.

३) गॉकेलिनचे संशोधन प्रामुख्याने अनुभवजन्य आणि सांख्यिकीय होते. त्याने ग्रह माणसांवर कोणत्या भौतिक यंत्रणेद्वारे परिणाम करतात हे सिद्ध केले नाही; त्याने जन्ममाहितीच्या मोठ्या नमुन्यांमध्ये ग्रहस्थिती आणि मानवी वैशिष्ट्ये/व्यावसायिक यश यांच्यात सांख्यिकीय संबंध आहे का, हे तपासले. ग्रह जर माणसावर परिणाम करत असतील तर ते तो कशाप्रकारे करतात हा त्याच्या संशोधनाचा भाग नव्हता.

Gauqeline sectors

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 90
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया