Skip to main content

आषाढस्य प्रथम दिवसे ... महाकवी कालिदास दिवस

लेखक साहना यांनी शुक्रवार, 17/07/2026 13:56 या दिवशी प्रकाशित केले.

 

महाकवी कालिदास ह्यांची जयंती हल्लीच झाली ( आषाढ कृष्ण प्रतिपदा) त्या निमित्ताने काही हलके फुलके.

भारतीय समाजाने मागील काही हजार वर्षांत जे काही कमावले आहे त्यांत भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृत भाषा (आणि त्यातील साहित्य/रचना) इत्यादी द्वितीय क्रमांकावर आहेत. प्रथम क्रमांकावर वेदांत. भारताची सद्य अधोगती पाहता ह्या गोष्टी ह्याच समाजातून निर्माण झाल्या आहेत का असा निराशात्मक विचार मनात येतो पण त्याच वेळी ज्या हिरीरीने आणि वृत्तीने ह्याच समाजाने वेदांत, संस्कृत आणि शास्त्रीय संगीत जिवंत आणि काही अर्थाने वाढीस सुद्धा लावले आहे त्यातून एक सकारात्मक आशा सुद्धा वाटते.

महापूरानंतरचं लोणावळा...

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 16/07/2026 21:38 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात कमी वेळेत प्रचंड मोठा पाऊस पडला. लोणावळ्यामध्ये तर पूर्ण पावसाळ्याइतका पाऊस दोन दिवसांमध्ये पडला. त्यामुळे लोणावळ्यात मोठा पूर आला आणि इंद्रायणी- पवना नद्यांनी लोणावळ्यापासून पिंपरी चिंचवड- आळंदीलाही तडाखा दिला. लोणावळ्यातले माझे मित्र श्रीरंगजींच्या परिसरात आठ फूट पाणी होतं. योगेश्वर सोसायटी, भांगरवाडीतलं त्यांचं तळमजल्यावरचं घर दोन दिवस अर्ध पाण्यात होतं. महापूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्याशिवाय लोणावळ्यातल्या हुडको भागातल्या वस्तीला महापूराचा मोठा फटका बसला. तिथे एनडीआरएफने बोटींमधून लोकांना वाचवलं. 

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

“गीता-दासबोधातील तामसिक तप, लोकशाहीचे आणि डॉ. आंबेडकरांची चेतावणी”

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/07/2026 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय तत्त्वज्ञानात तपाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. परंतु तप सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशा तीन प्रकारांत विभागला जातो. भगवद्गीता आणि दासबोध या दोन ग्रंथांनी तामसिक तपाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. आजच्या लोकशाही व्यवस्थेतही या विचारांचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 15/07/2026 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

आपणास माहिती आहे १५ मे रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता आणि  या वक्तव्याचा निषेध म्हणून, १६ मे रोजी अभिजीत दिपके यांनी समाज माध्यमांवर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंग्यात्मक सामाजिक चळवळीची स्थापना केली होती. भारतात या चळवळीची तरुणांमधे खूप चर्चा  आहे,  व्यवस्थेविरुद्ध तरुण एकत्र होऊन आपली भूमिका मांडायला एकत्र झाले आहेत.  सामाजिक माध्यमांवर या विविध विषयांचा,  मिम्ससहित सध्या बोलबाला आहे.

लिखाणाचे नवे नियम

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2026 11:34 या दिवशी प्रकाशित केले.

मिपावर लिखाणाचे नवे नियम काय आहेत?

धागा किती शब्दांचा, ओळींचा असावा असा काही नियम आहे का?

धाग्यात आक्षेपार्ह काहीच नसेल तरीदेखील धागा उडवण्याचे काय कारणे असतात?

एका सदस्याने किती धागे काढावेत असा काही नियम आहे का? (बेसीक गोष्ट आहे ती. मला समजते. पण नियम काय आहे?)

धागा काय कारणाने उडवला याचे कारण समजते काय?

अशा सर्व नियमांचा धागा कोठे आहे? 

एखादा सदस्य जवळचा अन दुसरा लांबचा असे आहे का?

आणखी इतर पुरक प्रश्न असतील तर त्यांचे समाधान होईल का? 

कोबीचे भजे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2026 06:22 या दिवशी प्रकाशित केले.

कोबीचे भजे

मैत्रीणींनो, कशा आहात सगळ्या? आधीच क्लिअर करते बाई की भजे, भजी नाहीत. भजे भजे भजे.

बहूतेक जणांना कांद्याचे भजे आवडतात. आता कांदा पडला तामसीक. आणि काही लग्न न झालेली मंडळी अन जैन गुजराती लोकं कांदा खात नाहीत. ते खात नाहीत अन इतरांनाही खाऊ देत नाहीत. 

अन कांदा महाग झाला तर आपल्या नवरोबांना अशा पावसाळी वातावरणात मस्त गरम गरम (गरमा गरम हा शब्द मराठी भैये बोलतात) भजे सायंकाळी कामावरून घरी आले की खाऊ घातले की त्यांना नंतरच्या कामाला हुरूप येईल.

विनंती धागा: कोबीची भाजी पहिल्यासारखी का दिसत नाही?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2026 00:05 या दिवशी प्रकाशित केले.

(ढिसक्लेमर: हा धागा लेखन करतांना कोणत्याही एआय टूल ची मदत घेतली नाही. स्वप्रेरणेने, स्वतःच्या बुद्धीने लेखन केले आहे.)

प्रती,

मिपा धागा संपादक मंडळ,

मिसळपाव.कॉम

महोदय,

माझे काल संध्याकाळी दोन लिहीलेले धागे डिलीट करण्यात आले आहेत. केवळ एक महिना सदस्य असलेल्या बाल सदस्याच्या पर्सनल मागणीला मान देण्यासाठी तुम्ही माझे दोन धागे डिलीट केले आहेत.