Skip to main content
लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 04/10/2026 10:55 या दिवशी प्रकाशित केले.

स्पष्टीकरण-: ताडोबाच्या जंगलात  एक म्हातारा वाघ फिरताना दिसला होता. त्याची वृद्धावस्था बघून दया आली आणी काही ओळी सुचल्या. कृपया बादरायण संबध जोडू नये.

 

वाघ आणी नवरा दोघेही म्हातारे झाले की त्यांची एकसारखी अवस्था होते.  बायका मुले,नातवंडे घाबरत नाहीत.  कितीही आरडाओरड केली तरी ढुंगण आपटत खालीच बसावे लागते. 

कधी कधी बायको नवर्‍याचा धाक इतरांना दाखवायचा प्रयत्न  करते पण शेतातल्या स्केअरक्रो प्रमाणेच त्याला इतर लोक समजतात.  नातवंडांना कही काम सांगीतले तरी टाळंमटाळ करतात. आणी हेच मला ताडोबाच्या जंगलात  फिरताना वाटले.

आता,ज्या की रही भावना जैसी....

तिन मुर्त देखी तैसी......

 

वाघांची आता भिती वाटत नाही
ताडोबातले म्हणून प्रेम दाटत नाही

सर्वकाळ गुफेत झोपून रहातात 
सटीसामासी फिरताना दिसतात  

चिरकुट कोल्हा डरकाळी फोडतो
वाघोबा येणार म्हणून दवंडी पिटतो

गंडस्थळ फोडू म्हणून,"गर्जना", करतात.

वाघोबाच्या गल्लीत ससे मोकाट फिरतात

जंगलच्या राजाचे निघाले दिवाळे

मोहरर्मच्या  सणातही काम नाही मिळाले......

चावता येत नाही म्हणून आता  केळी खातो

सांगा,कवळीवाल्या वाघाला कोण भितो!

काव्यरस

वाचने 179
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आज दादा , उद्या भाउ, परवा अजुन कोणी

कालचक्र फिरतच राहणार. 

 

कविता आवडली, पण काही ओळी लाल आणि बोल्ड केल्याची प्रयोजन समजले नाही. असे केल्याने धाग्याला राजकीय रंग चढेल की काय अशी शंका आली. म्हणजे डिस्क्लेमर मधे वेगळेच सांगुन कवितेत वेगळाच अर्थ असे काहीतरी?


वाघ आणी नवरा दोघेही म्हातारे झाले की त्यांची एकसारखी अवस्था होते.  बायका मुले,नातवंडे घाबरत नाहीत.  कितीही आरडाओरड केली तरी ढुंगण आपटत खालीच बसावे लागते. 

कधी कधी बायको नवर्‍याचा धाक इतरांना दाखवायचा प्रयत्न  करते पण शेतातल्या स्केअरक्रो  प्रमाणेच  इतर समजतात.  

 

नातवंडांना कही काम सांगीतले तरी टाळंमटाळ करतात. 

 

आणी हेच मला ताडोबाच्या जंगलात  फिरताना वाटले.

 

आता,ज्या की रही भावना जैसी....

तिन मुर्त देखील तैसी......