Skip to main content

पटली तर पळवा

लेखक पाटीलअमित यांनी शनिवार, 17/10/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html मूळ कविता http://www.misalpav.com/node/३३१७६ लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर मुलगी मागताच मुलीचा बाप विचारतो घर जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा गोरी किवा काळी ,पटव आणि पळवून कर चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू मग कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य ल
काव्यरस

आवडलेलं काही...

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 17/10/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हा अभिव्यक्तीचा सहजसोपा आणि तितकाच हवाहवासा आविष्कार. मला कविता आवडते. अगदी हायकू, चारोळी, छंदबद्ध आणि मुक्तछंद हे आणि असे सगळेच प्रकार आवडतात. उर्दू शायरी हा असाच जिव्हाळ्याचा विषय. हायकू तीन ओळींचा, त्याहून कमी, म्हणजे दोनच ओळींमध्ये केवढं सांगता येतं, ते सिद्ध करणाऱ्या अशा असंख्य ओळी भेटत राहिल्या. नकळत मनात रेंगाळत राहिल्या. रचनाकार नाही माहिती, पण या ओळींचा उल्लेख आला की त्या शब्दप्रभूंना मनोमन सलाम केला जातो. अशाच काही ओळी देतेय...

आठचा थाट

लेखक मांत्रिक यांनी शनिवार, 17/10/2015 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आठचा थाट ( चारचा चहा, सहाचा वडा आणि बाराचा बार झाल्यावर त्यात आमचीही एक भर. सदर कथा पूर्णतः काल्पनिक असल्याने लई लोड घेऊ नये.) पाच वाजून गेले होते. सगळा स्टाफ चुळबुळत घड्याळाकडे पहात होता. तो देखील आता अस्वस्थ झालेला होता. त्याला जास्तच राग आलेला. कारण सकाळपासून काही तरी अगम्य पनवती त्याच्या मागे लागलेली होती. सकाळी येताना गाडी घराबाहेरच पंक्चर झाली. ऑफिसचा प्रवास लोकलमधली घामट गर्दी सहन करत करावा लागला. ऑफिसात गेल्यावर बॉसने उशिरा आल्याबद्दल झाडणी केली. वर पुन्हा दिवसभर सगळी तुंबलेली कामं अगदी आग लागल्यासारखी भराभरा डोकं वर काढू लागली.

मळली तर वाळवा

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 17/10/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा : सांगायलाच पाहिजे का ? ) रस्त्यांवरच्या डबक्यांपासून जरा जपून फिर भिजेल विजार खाशी तुझी, ढळता लक्ष्य जर जबरदस्तीने उडतात काय, शिंतोडे कधी सांग तूच आपल्या पाटलुनीला, नीट पोटरीवरी धर यंदा रस्त्यात हाकू नकोस, बीआरटी लेनमध्ये ने कामी येई अश्यावेळी, मधला डांबरी थर सुटच फुल्टू वेगाने तू, बाकी बघू मग कोण सापडे मामाला आणि, कोण निसटे भुर्र किती मळणार रे तूझी, ओली विजार आज मळली तर वाळवणे, हेच तुझे कार्यालयीन काज
काव्यरस

मी असा त्या बासरीचा सूर होतो

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 17/10/2015 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाॅट्सप वर ही कविता पावली, सुरेश भटांची म्हणे. सुरेश भट मी असा त्या बासरीचा सूर होतो! नेहमी ओठांपुनी मी दूर होतो! प्रीतही आली फुलांच्या पावलांनी हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो! राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता... मी घरोब्याचे जुने काहूर होतो! तू किती केलास भेटीचा अचंबा.. भूतकाळाचा जणू मी धूर होतो! मी न साधी चौकशी केली घनांची ऐन वैशाखातला मी पूर होतो! कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ? जीवनाला मीच नामंजूर होतो! तेवते आहेस तू पूजेत कोठे? एकदा मीही तुझा कापूर होतो! मला असे वाटले हे कवी जन "Lateral Thinking" करतात. म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता, आधी कवितेची चवथी ओळ लिहीतात म

ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 17/10/2015 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
79 साल मध्ये एक हिंदी फिल्म आली होती, सरगम. काहींना ते आठवत असेल, हिट पिक्चर होतं, गाणीही खुप गाजली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं. गीतकार होते आनंद बक्षी. 'परबत के इस पार' या गाण्यात ते लिहून गेले, ग़म इक चिठ्ठी जिसमें ख़ुशियों का सन्देश गीत तभी मन से उठता है जब लगती है ठेंस ह्या ओळी आनंद बक्षी साहेबांनी का लिहील्या असतील ? हा प्रश्न मला अनेक वर्षे पडला आहे. बरं,स्टोरीलाईनची गरज म्हणून लिहीलंअसेल म्हणावं तर बक्षी हे सिध्दहस्त कवी होते.

विधान परिषदेचे गणित भाग २

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या विरोधी बाकांवरची हवा खात असल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुका एकत्र लढववाव्यात असा निर्णय तातडीने घेऊन टाकला. नुकतीच विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखेंच्या शासकीय निवासस्थानी अशोक चव्हाण विखे, माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे नेते व राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजितदादा पवार व जयंत पाटील असे एकत्र बसले व त्यांनी आघाडीची घोषणा करून टाकली. मुंबई मनपामध्ये मागच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष निरनिराळे लढले होते आणि शिवसेनेची सत्ता तिथे आली होती. दीडच वर्षात पुन्हा मुंबई मनपाच्या निवडणुका येत आहेत.

विधान परिषदेचे गणित: भाग १

लेखक अनिकेत एस जोशी यांनी शुक्रवार, 16/10/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गांधी भवन या काँग्रेस मुख्यालयात नारायण राणेंची जी पत्रकार परिषद झाली, त्यात अन्य प्रश्नांबरोबरच "तुम्ही परिषदेची निवडणूक मुंबईतून लढवणार का?" हा एक प्रश्न आलाच. अर्थातच राणे हे मुरलेले राजकारणी असल्याने त्यांनी त्या प्रश्नाला सहज बगल दिली. शेजारी बसलेल्या प्रवक्ता सचिन सावंतांकडे इशारा करत "यांची शिफारस करू" असे राणे म्हणाले. पण माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सातत्याने विधीमंडळात पुन्हा प्रवेश करण्याची धडपड करतच आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.

एक होती म्हातारी

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 16/10/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला. "उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली. आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला.