Skip to main content

आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 15/10/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
आरोग्यशास्त्रात सतत नवे शोध लागत असतात आणि त्यामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणार्‍या अनेक व्याधींवर नवनवीन उपाय निघाले आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. पण हे सर्व कसे होते याबद्दल त्या क्षेत्रातले काही शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ सोडले तर इतर लोक अनभिज्ञ असतात. हे बरेचसे संशोधन रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये (अंडर लॅबोरेटरी कंडीशन्स) रुक्ष काटेकोर नियम पाळून केले जाते. मात्र हे सर्व करण्याअगोदर, करताना आणि ते करून मिळालेल्या निष्कर्षांचा अन्वयार्थ लावताना शात्रज्ञ आणि तंत्रज्ञ किती कल्पकता वापरतात याचा इतिहासही मनोरंजक असतो.

संध्याकाळचे विचार

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 15/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
( www.misalpav.com/node/30211 यावरुन सुचलेले काहीबाही) ............................................................................ काल संध्याकाळी मी ढाब्यावरचं होतो. खाऱ्या शेंगदाण्याची पुडी मीच फोडली. डाव्या बाजुला उकडलेल्या अंड्याच्या फोडी, टेबलावर गलास, बाटली, कांदा, शेवचिवडा बेत अगदी फक्कड जमला. सत्यानं बाटली फोडली. आणि गलास भरायला घेतले.

शेवयांचा तिखटमीठाचा शिरा

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 15/10/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
शेवयांचा उपमा मी पूर्वी एकदा दिला होता. आता हा शेवयांचा तिखटमीठाचा शिरा- साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा,१ लहान टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, ४-५ कढिलिंबाची पाने, १ मूठभर शेंगदाणे, मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर, फोडणीचे साहित्य, एक पळी तेल ओले खोबरे, कोथिंबिर, २ वाट्या गरम पाणी कृती- शेवया कोरड्याच तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. जर भाजलेल्या शेवया असतील तर किंचित भाजून घ्या. फोडणी करून त्यात कांदा व टोमॅटो घाला व परता. झाकण ठेवून शिजू द्या. भाजलेल्या शेवया घाला.

धरसोड

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/10/2015 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात. आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते. आजोबा आले की आई मला काम सांगणार. पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची. हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत. “आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं. “ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले. भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल. कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा. आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग? असंल कायतरी.

कांद्याच्या पातीचा घोळाणा

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 15/10/2015 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे नेहमी मेथी, पालक याचा घोळाणा करतात. त्याबरोबर कांद्याच्या पातीचा घोळाणा सुद्धा करतात. पोळी बरोबर खायला छान लागतो. साहित्य: 1. कांद्याची पात 2. शेंगदाण्याची पुड 3. मीठ 4. साखर 5. तेल कृती: कांद्याची पात बारिक चिरून घ्या. एका बाऊल मध्ये चिरलेली कांद्याची पात,शेंगदाण्याची पुड,मीठ,साखर,तेल (सर्व अंदाजाने)टाका. सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करा.

मेजवानी

लेखक अनाहिता यांनी गुरुवार, 15/10/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
सहभाग - इशा१२३, मितान, Maharani, स्वाती राजेश, प्रश्नलंका, स्मिता श्रीपाद, विशाखा राऊत. .

किचन टिप्स

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 15/10/2015 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
* लाटणे फ्रिजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. * मासे खाताना काटा घश्यात अडकल्यास एक-दोन केळी खावीत. * काजू व इतर ड्रायफुट मध्ये किड लागू नये म्हणून डब्यात दोन-तीन लंवग टाका. * कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. * स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा.

अ-'रुचि'क कहाणी(ण्या)-प्रीतमोहर पिशी अबोली

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 15/10/2015 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
'रुची' म्हटलं की खास मिपासंदर्भात पाकृ दालनात आलेल्या असंख्य तोंपासु आणि डोनि (डोळे निववणार्‍या) रेशिप्या आठवणं साहजिक आहे. पण काही मिपाकर सुगृ असले म्हणून काय झालं, अनेक मिपाकर तर नुसते गृ सुद्धा झालेले नाहीत अजून. (सं.-द्यायला पाहिजे का? एक ४-५ खव उघडा रँडम. सापडतील अनेक सारे ;)) किचन नावाच्या रणभूमीवर पदार्पण करताना अनेक लोकांच्या थेट पोटावर वार होत असतात. तरीही पोटात भूक कोकलत असताना हे 'सुरीधाराव्रत' सांभाळणं येरागबाळ्याचे काम नोहे. रुची विशेषांकात या पहिल्या लढायांच्या 'रम्या कथा' आल्याच पाहिजेत असं आम्हाला मनापासून वाटलं.

रेट्रो कांदेपोहे

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 15/10/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
ढिसक्लेमर : ( खालील लेखाचा पूर्ण आस्वाद घेण्यासाठी लेख १९१३च्या एखाद्या मराठी चित्रपटाची नायिका ही आपल्या फ़्लशबॅकमध्ये जाऊन सांगत आहे अशा टोन मध्ये वाचा. ) सन १९९९ जानेवारी. नुकतेच ऑक्टोबर मध्ये १८ पूर्ण केले होते आणि अचानक घरामध्ये आमच्या शुभमंगलाचे वारे वाहू लागले आणि आम्ही सावधान झालो. अरे माझे वय काय आणि एवढ्यातच मला ही काळ्यापाण्याची शिक्षा? पण तेव्हा वडीलधाऱ्याचा नजरेचा धाकच असा की हे विचार वादळासारखे मनात घुमत राहायचे. पण विचार जरी मनात घुमत असले तरी वयानुसार मनात स्वप्नांचे वसंत फुलतच होते आणि त्या वसंत बहरातून आमच्या मनीच्या राजकुमाराचा धुसरसा का होईना एक चेहरा अस्पष्ट दिसू लागायचा.

वजन कमी करण्यासाठी आहार

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 15/10/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वजन २०१२ पर्यंत ७५ किलो होते ते ६ महिन्यात ५८ किलोवर आणले आणि आमच्या घरात मी न भूतो न भविष्यति असा इतिहास घडवला! काही केल्या मी खाण्याच्या बाबतीत काहीही कंट्रोल करु शकत नाही आणि वजन तर या जन्मी कमी होणं शक्य नाही इतका माझ्या घरच्यांना माझ्यावर दांडगा विश्वास. पण मी त्या विश्वासाला तडा देउ शकेन हा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता. वजन जास्त असताना शिर्डी पदयात्रा केली तेव्हा घरातल्यांच्या एका विश्वासाला तर मी तडा दिलाच होता पण त्यावेळी मला भरपूर त्रास झाला होता हे मी अनुभव कथनात दिलेले आहेच.