Skip to main content

एक माणूस बनेल काढून..................

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 04/11/2015 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस बनेल काढून डोम्बिविलीत पोहचला बघता बघता रस्त्यावरी दुकान टाकून वसला. छंद जीवाला एकच लागे खुर्ची वरीला हक्क हा गाजे शिव्याशाप तो भाषणामधूनी आकांड तांडव ते दैनंदिनी किन्तु हातचा राखून गणित चुकले नजर चकवून बहुमत हुकले तरी उसने आवसान काउंटरवरुनी परी हळूच पाही मान वळवूनी इकडे तिकडे बघून झाले निकाल सगळे येऊन गेले भान आले, बाहेर आला.... लोकांनी विचारल्यावरी म्हणाला … आमची दोस्तीदुष्मनी सबकुछ मिलीजुली असते …… सेटलमेंट होत असेल तर पायवाटही खुली असते … एक माणूस बनेल काढून वांद्र्याबाहेर पडला हरवलेले सत्तेचे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
काव्यरस

सोशल मिडीया आणि नोकरी

लेखक नितीनचंद्र यांनी बुधवार, 04/11/2015 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१५ मध्ये जेव्हा I-HRD या संस्थेने एक दिवसाचा रिक्रुटमेंट युजींग सोशल मिडीया असा एक दिवसाचा वर्कशॉप घेशील का म्हणुन मला विचारले तेव्हा या विषयाची खोली इतकी आहे मला ही माहित नव्हते. जस जसा वर्कशॉप चा दिवस जवळ येतोय तस तसे माहितीच्या जंजाळातुन काय घेऊ आणि काय नको घेऊ असे झाले आहे. २००८ मध्ये मी जेव्हा एका कंपनीमध्ये एच आर मॅनेजर म्हणुन काम पाहु लागलो तेव्हा नुकतीच मंदीची लाट सुरु झाली. या लाटेत तोटा होऊ नये म्हणुन कंपन्यांनी रिक्रुटमेंट कन्सलटंट नकोत म्हणुन सांगीतले.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : १ : कशीबशी केलेली बुकिंग

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 04/11/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पहिली नोकरी होती मुंबईला "ओरॅकल फिनान्शियल सर्विसेस" येथे. तिथे माझ्यासोबत कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या आणखी काहीजणांनी एकाच दिवशी कंपनीत आणि करियरमध्ये प्रवेश केला. पुढचे २-३ महिने आमचं सोबत प्रशिक्षण झालं. अगदी पद्धतशीर वर्गात बसुन, कॉलेजसारखंच (वातावरणाच्या बाबतीत) पण दर्जा खूप चांगला. त्यानंतर १-२ वर्ष आमचे प्रोजेक्टसुद्धा सारखेच होते. आम्ही एकाच मोठ्या टीममध्ये होतो. त्यामुळे आमची सर्वांची एकमेकांशी मस्त गट्टी जमली. या ग्रुपचं नाव पडलं "डस्सुझ". थोडक्यात कारण यातले सगळे आपापल्या पद्धतीने दुसऱ्यांना डसत राहतात.

कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्‍या क्रमांकाची भाषा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्‍या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्‍या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे. कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे.

चारोळी

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी
काव्यरस

भय इथले संपत नाही.....

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्याठण्ण विहिरीच्या तळाशी- गर्द वडाच्या पारंब्याना लोंबकळते- पडक्या वाड्याच्या ची-याची-यांतून- काळ्याकपारीमध्ये दडलेले- काहीतरी...... जे आहे फार प्राचीन जे आहेदुष्ट क्रूर अन वखवखलेले ज्याचा आहे स्पर्श दाहक ज्याचा विचारही भिववणारा इथला आसमंत भारलेला इथे कशाचीतरी हुकुमत इथली शांताताही असहय इथले आवाज तसेच भयानक इथल्या सावल्या हलतात इथली झाडे कुजबुजतात इथले खडकही शहारतात सततचे नाट्य इथले थांबत नाही भय.....भय इथले संपत नाही.....

'ट्वेल्व्ह अँग्री मेन' आणि ’मॅनेजरियल ग्रिड’ .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/11/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
. . 'ट्वेल्व्ह अँग्री मेन' हा चित्रपट आजवर इतक्या वेळा बघून झालाय की आता किती वेळा पाहिलाय हेसुद्धा आठवत नाही. त्यानंतर कधीतरी एक-दोन वेळा 'एक रुका हुआ फैसला'सुद्धा पाहून झाला. आवडलासुद्धा.... पण का कोण जाणे, हिंदी आवृत्ती तितकीशी भावली नव्हती. परवा एक सन्मित्र श्री. अतुल ठाकुर यांची फेसबुकवरील या संदर्भातील पोस्ट वाचली.

अंदमान - एक अविस्मरणीय सफर -१

लेखक तिमा यांनी मंगळवार, 03/11/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २: http://www.misalpav.com/node/33589 अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो.

हेरंब कुलकर्णी यांच्याशी बातचीत

लेखक विशाखा पाटील यांनी मंगळवार, 03/11/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
. . शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने केलेली प्रगती यावर उलटसुलट चर्चा होत असते. शिक्षणाचा प्रसार झाला, गावागावापर्यंत शाळा उघडल्या गेल्या हे खरे असले, तरी प्रश्न संपलेले नाहीत. एकीकडे चकचकीत इंटरनॅशनल स्कूल, तर दुसरीकडे दुर्गम भागातल्या शाळांची दुरवस्था, हे आपल्या राज्याचे चित्र. हेरंब कुलकर्णी हे नाव शिक्षणक्षेत्राशी आज जोडले गेलेय.

लॉटरी-२

लेखक सायकलस्वार यांनी मंगळवार, 03/11/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
लॉटरी
'तिकडे प्रिन्सेस बारच्या मागे एक लॉज आहे. तिथे तासावर रूम मिळते' अमोल आणि प्रितेश दोघेही उडाले. 'भडव्या उगाच खेचतोयस का आमची' 'खेचत नाही. पुढचं ऐक' असे म्हणून समीरने पुढचा सर्व प्रसंग डिटेलवार सांगितला.
. . . त्याने काहीही सांगायचे बाकी ठेवले नाही. ते दोघे मग तिथून बारकडे गेले. तिथे खरोखरच एक लॉज होता. समीरने पैसे भरले आणि काउंटरवरच्या माणसाने त्याच्या हातात किल्ली दिली. तिने सरळ रूमकडे चालायला सुरवात केली आणि समीर तिच्या मागून गेला. त्यानंतरची स्टोरी समीरने अगदी ग्राफिक डिटेल्समध्ये ऐकवली.