Skip to main content

सुपरस्पाय

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 17/10/2015 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
. . त्याने हेरगिरीच्या इतिहासात अतुलनीय काम केलेलं आहे” – जनरल डग्लस मॅक'आर्थर; दुसर्‍या महायुद्धामध्ये प्रशांत महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन सैन्यदलाचे प्रमुख.
“ त्याच्या हेरगिरीला तोड नाही.” – हॅरॉल्ड ‘किम’ फिल्बी; ब्रिटिश गुप्तचर संघटना एम.आय.६मध्ये रशियाच्या के.जी.बी.ने यशस्वीरित्या घुसवलेला दुहेरी हेर.

आमच्या गोंयची दिवाळी

लेखक प्रीत-मोहर यांनी शनिवार, 17/10/2015 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
. . सामान्य गोवेकर तसा उत्सवप्रिय. गोव्यातली हिंदू जनता आपल्या एका आगळ्यावेगळ्या 'गोंयकारपणाने' वर्षभर अनेक सण साजरे करते. ह्या सणवारांमध्ये स्थानिक जत्रा, पालखी उत्सवसुद्धा समाविष्ट आहेत, जे शतकानुशतकं साजरे केले जातात. देवाचे उत्सव साजरे करणं आणि त्यात सहपरिवार भाग घेणं हे इथल्या लोकांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

तेव्हा तू कुठं होता?

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 17/10/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
लंचटाईमला कळलं मला डब्यात लाडू होता दिला तिरीमिरीने झटक्यात उचलून खिडकीबाहेर फेकून दिला आठवड्यापूर्वी तरसलो होतो जेव्हा भुकेने कासावीस झालो होतो जेव्हा ए रासभग्रासा तेव्हा तू कुठं होता? घरी येता संध्याकाळला टॉमी कुत्रा फार आनंदला घातली कमरेत लाथ त्याच्या शेपूट हलवत जेव्हा आला लहान होतो मी जेव्हा दोन कुत्री चावली जेव्हा ए दगाबाज कुत्र्या तेव्हा तू कुठं होता? बाबा मी पडलो मी गाडीवरून सांगे मुलगा जवळ येऊन मोडक्या हाताकडे न पाहता ओरडलो त्यालाच मी उलटून शाळेत जायचो मीही जेव्हा सायकलवरून पडायचो मी जेव्हा ए सैतानाच्या पोरा तेव्हा तू कुठं होता? फाटका माणूस होता मार खात फिरायला होतो जेव्हा मी जात
काव्यरस

डिंकेल्सब्युल

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 17/10/2015 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
. . आम्ही पुन्हा रोथेनबुर्गला चाललो आहोत, हे ऐकून त्सेंटाआजी जरा वैतागलीच. "अगं, रोथेनबुर्ग सुंदरच आहे, पण सारखं काय तिथेच जाता? अजून थोडंसं, ५० कि.मी. पुढे जा की डिंकेल्सब्युलला. कितीदा सांगायचं? तेही किती सुरेख आहे. आमच्या वालरष्टाईनच्या शाळेतून तिथे सहल न्यायचे.

ड्रायफ्रूट हलवा

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 17/10/2015 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
. . दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, रांगोळ्या, आकाशदिवे, नवे कपडे, फटाके, फराळ, मिठाई आणि दिवाळी अंक! लाडू, चिवडा, चकली, कडबोळी, करंज्या, शेव, शंकरपाळे असे नेहमीचे फराळाचे पदार्थ तर असतातच.

खारीचा वाटा

लेखक सौन्दर्य यांनी शनिवार, 17/10/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
. . मी अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात राहतो. दर शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मी सकाळी न चुकता आमच्या घराशेजारील गार्डन-कम-वॉकिंग स्ट्रीपवर चालायला जातो. पूर्वी हे एक गोल्फ कोर्स होते, जे पुढे बागेमध्ये परिवर्तित केले गेले. ह्या बागेच्या अगदी मधोमध एक तलाव आहे. त्याच्या आसपास शेड्स बांधल्या आहेत आणि त्या शेड्सच्या खाली लोकांना बसायला टेबल्स आणि बेंचेस लावली आहेत.

आवाज आणि संवाद

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 17/10/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
. . “डोळे फुटले का तुमचे? तिथे बोर्ड लावला आहे तो दिसत नाही? तोच तोच प्रश्न विचारता.. साठ रुपये राइस प्लेट, ऐंशी रुपये फुल थाळी.” “काय गुरुजी, आंधळे असल्यासारखे काय चालताय? रांगोळी मिटली ना तुमच्या पायाने.” “तुमची भाषा कशी - करून राहिला आहे.. एका वाक्यात तीन क्रियापदे? व्याकरणाची पार वाट लावली तुम्ही.” “ए, ऐकू येत नाही का तुला? त्यांना पोळी हवी, पाणी नाही.” “आधी माझे ऐकून घ्या.

गढीवरची दिवाळी

लेखक pradnya deshpande यांनी शनिवार, 17/10/2015 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
. . या दिवाळीला शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घ्यायचे. जाताना हिंगोलीच्या आत्याच्या घरून जायचे ठरले, तेव्हापासून मनाला एक अनामिक हुरहुर लागून राहिलीय. का होतंय असं? पंचवीस-तीस वर्षे उलटली असतील आता, अजूनही कालच आत्याच्या घरून परल्यासारखे वाटतेय. चिमुकल्या रेल्वेस्थानकावर उतरून बैलगाडीतून धक्के खात मी आत्याच्या बोराळ्याच्या गढीत केव्हाच पोहोचलेय. कालच सहामाही परीक्षा संपली.

रोजनिशी एका काव्यदिंडीची

लेखक दिपोटी यांनी शनिवार, 17/10/2015 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
. . अमृताशी पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा सकस-समृद्ध आहे हे निश्चित. मात्र एकंदरीतच जगभर लोपत चाललेल्या वाचनसंस्कृतीमुळे वाटणार्‍या काळजीचे ढग या आपल्या संपन्न मायबोलीवरही हळूहळू दाटत आहेत. वाचनाची ओढ कायम राहावी व पुढे ती वाढावी, यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.

फाटक

लेखक ए ए वाघमारे यांनी शनिवार, 17/10/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
. a तीन–साडेतीन झाले असतील नसतील. मनोजने पानपट्टी उघडून थोडाच वेळ झाला होता. लक्झरी बसस्टॅंडवरचं उघडणारं पहिलं दुकान त्याचंच. मनोज आतलं सामान जागेवरच लावत होता, तोच त्याला दुरूनच ऑटोचा ‘टरटर’ आवाज आला. संतोषभाऊचा ऑटो, त्याने बरोबर ओळखलं. संतोषने मनोजच्या पानपट्टीपाशी ऑटो थांबवला. इंजीन बंद करून एकदाची ती ‘टरटर’ थांबवली.