Skip to main content

प्ले इट अगेन

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 18/10/2015 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . . Image (चित्रः प्रतिमा खडके) त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोक, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. संजय. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला तो एक हुशार मुलगा होता.

तेव्हा तुम्ही कुठे होता?

लेखक बाप्पू यांनी रविवार, 18/10/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर कुल्बर्गी यांच्या हत्ये नंतर कर्नाटकातील बऱ्याच साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. सुरवातीला हि गोष्ट कर्नाटक पुरतीच मर्यादित होती. पण हे लोन आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेय. आणि याला कारण म्हणजे दादरी येथे झालेली घटना. नेमके आज च तुम्हाला भारतात असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार झाला काय? हि घटना खरच दुर्दैवी होती. पण या घटनेचे भांडवल करून खूप राजकारण पेटले आहे. आणि या वाहत्या गंगेत हाथ धुवून घेण्याचे काम साहित्यिक करत आहेत. मला कोणत्याही प्रकारे दादरी येथील घटनेचे समर्थन करायचे नाहीये. फक्त एकच प्रश्न या सर्व साहित्यिकांना विचारायचा आहे.

अल्केमिस्ट

लेखक रातराणी यांनी रविवार, 18/10/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची नेहमीसारखी गर्दीची वेळ. तो चढला त्याच्यानंतर काही स्टॉप सोडून ती. खच्चून गर्दी होती बसला. सगळे लोंबकळत होते. काहीशी त्रस्त होऊन ती उभी होती. इतक्या गर्दीतही तिचा चेहरा त्याच्या बरोबर लक्षात राहिला होता. संध्याकाळीही दिसली पुन्हा. यावेळेस तिला खिडकीशेजारी जागा मिळाली होती. वार्याने उडणारे केस ती वैतागून मागे सारत होती. एका सीटवर जागा असूनही तो बसला नाही. त्या सीटवरून त्याला ती व्यवस्थित दिसणार नव्हती. त्याची नजर आपोआपच पुन्हा पुन्हा तिला न्याहाळत होती. खिडकीतून बराच वेळ बाहेर पहात होती ती. आपल्याला कुणीतरी बघतंय याच्याशी पूर्ण अनभिज्ञ. कंटाळल्यावर मग तिनं पुस्तक काढलं.

उडाली हो!

लेखक निनाद यांनी रविवार, 18/10/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
हार्ड डिस्क उडाली असे ऐकले की घाबरायला होते! आपल्याला हार्ड डिस्क फेल होणे हा मोठा धक्का असतो. यात बहुदा आपले फोटो आणि व्हिडियो जातात, जाऊ शकतात म्हणून जास्त मानसिक त्रास असतो. शिवाय काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे असतील तर ते पण जातात. यामुळे अर्थातच या तबकडीशी आपली भावनीक जवळीक असते! स्मित त्यात रिसर्च पेपर आणि त्याचा डाटा बॅकअप वगैरे असतील तर अक्षरश: हार्टफेलच व्हायचे बाकी असते. सर्व प्रथम - मी काही यातला एक्स्पर्ट वगैरे नाही! अनुभवाने जे काही लक्षात आले ते लिहितो आहे. पहिले सत्य असे आहे की. कोणतीही डिस्क घ्या - ती एक दिवस फेल होणारच आहे. डेटा रिकव्हरी महाग असू शकते.

शेवरीचा पाला आणि म्हसरं

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 18/10/2015 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
"झोप झाली का आप्पाराव, वाफश्यातनं पाणी भाईर याय लागलयं, दार मोडा तेवडं" आप्पानं जरा डोळं किलकिलं करत शीतलीकडं बघितलं. खरतर त्यानं नुकतचं दार मोडुन नव्या वाफ्यावर पाणी लावलं हुतं. शेताच्या मधावरचं आंब्याची पाच धा झाडं. या झाडांमध्येच लक्ष्मीचं एक देऊळ कमरंऐवढ्या उंचीचं. पण त्याचा कठडा लांबवर पसरत गेलेला. जेवन झाल्यावर आप्पा दुपारचं या कठड्यावरचं डुलकी घ्यायचा. आमराईच्या हिरव्या गारठ्यात त्याला गारगार झोप लागायची.

माझा गांव..

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 18/10/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझा गांव, अता गांव नाही राहिला. नदीचा ओढा अन ओढ्याचा नाला झालाय. तुंबलाय, बरबटलाय, आणि सडलाय पण. पुर्वी दाट वडांच्या सावलीत गार निजायचा आज रखरखत्या इमारतींत तगमगतोय. सुटू शकत नाही. निसटु ही शकत नाही. नाही, तसा प्रयत्नच होत नाही. रानं काळवंडलित पूर्वी ती फुलायची अता त्यांचे लिलाव होतायत. आजु-बाजुने, आडवा-तिडवा नुसता फुगत चाललाय. डाम्बरी नांग्या फुटताय त्याला इखान् डबडबलेल्या. भुलवतोय मला, तेवढेच आतून छळतोय मला माझा गांवअता माझा राहिला नाही.

काही कविता

लेखक शीतल जोशी यांनी रविवार, 18/10/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
. 1 रुक्मिणीचा कृष्ण / रुक्मिणीचा कोण तू? मीरेचा तू कृष्णसखा, तर आणिकही कुणासाठी भगवान तू देवकीचा कान्हा तर राधेचा मनमोहन तू पण कोणी कधीच न वदले मज रुक्मिणीसाठी आहेस कोण तू?

पान १५

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 17/10/2015 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
. . या महानगरीत राहायला आल्यापासून कामावरून घरी परतायला मी उपनगरी मेट्रो रेल्वेचा वापर करतो. माझे शिक्षण आणि नोकरीचा बहुतेक सर्व वेळ मध्यम आकाराच्या शहरात व्यतीत झाला आहे. त्यामुळे या महानगरीतल्या संस्थेच्या मुख्यालयामध्ये अचानक झालेली बदली स्वीकारावी की नाही, यावर घरात बराच खल झाला होता.

सुंदर रूपाचं चांदणं....! (भारत उपासनी)

लेखक दिवाळी अंक यांनी शनिवार, 17/10/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
. . तुझ्या रूपाचं चांदणं पोरी जपून ठेवावं आणि नक्षत्राचं दान त्यात ओतून ठेवावं //१// असं टिपूर पडलं तुझ्या रूपाचं चांदणं तुला कसं गं सुचलं माझ्या नावाचं गोंदणं //२// तुझ्या रूपाचं चांदणं माझ्य

कळते रे!

लेखक रातराणी यांनी शनिवार, 17/10/2015 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
. . वेणू कधी कधी स्वप्नात येते माझ्या. मोठ्या घेराचा फ्रॉक घातलेली. लांबसडक केसांच्या चापूनचुपून तेल लावून दोन वेण्या बांधलेली. हातात हात घालून आम्ही नदीकाठी जातो. मी पाण्यात डुंबत असतो आणि ती किनार्‍यावर बसून शंखशिंपले असं काहीतरी गोळा करत बसते. पाण्यात खेळून झालं की मी काठावर येतो. तिच्या अंगावर पाणी उडवतो. ते तिला अजिबात आवडत नाही. पण ती चिडत नाही. मग मीच थांबतो.