Skip to main content

श्रीखंडाच्या वड्या

लेखक मधुरा देशपांडे यांनी शनिवार, 31/10/2015 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
. . प्रत्येक घरात किंवा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांच्यात प्रत्येक व्यक्तीची काही ना काही खास पदार्थाची खासियत असते. काकूच्या हातचे काही, मामीच्या हातचे काही, आजीचे काही.. न संपणारी यादी. बरेचदा मग सवयीने आपल्याला तो पदार्थ त्याच व्यक्तीच्या हातचा आवडतो, अशीच आमच्या समस्त गोतावळ्यात 'श्रीखंडाच्या वड्या' हा माझ्या आईच्या काही पेटंट पदार्थांपैकी एक.

महिला बसमधील पुरुष कंडक्टर - अर्थात, जंबिया मधातला!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 31/10/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
. . मंदमंद पावडरी, लाडिकलाडिक लिपष्टिका छंदीफंदी अत्तरं, हलक्याहलक्या टवाळ्या तिन्ही ऋतू सातही वार, सगळ्या ड्युटया मारतो, एकपण खाडा करत नाही, महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही! नाजुकनाजुक पर्सा, मखमली पिशव्या झुळझुळीत साड्या, झिरझिरीत ओढण्या त्यांच्या रुमालातली नाजुक चिल्लर मी कधी मोजत नाही, महिला बसची ड्युटी मी कधी चुकवत नाही! गरोदर बाईला, ऐंशीच्या म्हातारीला शाळकरी पोरीला, कॉलेजच्या त

होळी आणि गटारी (विडंबन)

लेखक दमामि यांनी शनिवार, 31/10/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्ना हॅास्टेलच्या आठवणी... रूमभर पसरलेल्या बाटल्यांच्या गराड्यात चाळीशीतून ग्लास शोधणारा , तू कसा दिसत होतास रे , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? देवदास मधल्या शाहरुख सारखा तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. गच्चीच्या कठड्यावर बसुन नवलाइने पोटात देशी सामावून घेणारा. आतशा दोघांचेही ब्रान्ड वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा दिवस 'होळी 'चा असतो, आणि माझा ' गटारी ' चा.

ताकाचा मसाला

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 31/10/2015 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील. साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण. masala कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा.

कौतुक

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 31/10/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हात अलगद सोडवून तू जायला निघतेस उन्हं डोक्यावर येतात सावल्या ... फेर धरून गोळा होतात माझ्याभोवती ! वेशीपाशी तू थबकतेस मनमोर नाचायला लागतो "सावली मागेच राहिली रे" तू कसंबसं हसून सांगतेस सावलीचा हात धरून पुन्हा चालायला लागतेस तिच्या पदराचा शेव... माझ्या छातीपाशी अडकलेला तू तशीच.... नेटाने चालत राहतेस कशाचं कौतुक करू ? तिच्या ओढीचं ... किं... तुझ्या नेटाचं .... ? विशाल
काव्यरस

मिपाकरांची मनकी बात अर्थात मिपाकर फर्माईश.

लेखक नाखु यांनी शनिवार, 31/10/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
. . फार पूर्वी रेडिओ सिलोन 'बिनाका गीतमाला' हा एक लोकप्रिय कार्यक्रम सादर करीत असे. त्यामध्ये लोकांच्या पसंतीची गाणी त्यांना मिळालेल्या गुणपसंतीने क्रमवार वाजवीत असत आणि त्यात एक गाणे सरताज गीत म्हणून शेवटी वाजवले जात असे. त्याची वार्षिक मानांकन पद्धतही होतीच. आमचा स्वतःचा असा काही रेडिओ नाही आणि तसेही आम्ही स्वतःच एक रेडीओ झालो आहोत.

करवाचौथ आणी संकष्टी चतुर्थी

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 31/10/2015 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी, तू कशी दिसत होतीस गं , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? DDLJ मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा. आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो, आणि माझा 'संकष्टी चतुर्थी' चा. जिप्सी
काव्यरस

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे.. !

लेखक सुहास झेले यांनी शनिवार, 31/10/2015 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
. . हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता.

खीरकदम

लेखक सूड यांनी शनिवार, 31/10/2015 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
. . माताय, मिपावर एवढे रथीमहारथी असताना लिहायचं म्हटलं की प्रश्न पडतो. कविता लिहावी, तर अजूनपर्यंत कधी ठरवून लिहू म्हटलं आणि लिहिली असं झालं नाही. लेख? तो सुचेना. मग म्हटलं, आता होम पीचवर उतरावं. बरं, त्यातही व्याप कमी नाहीत. मिपाचा मुदपाकखाना सुगरणी आणि बल्लवाचार्यांनी परिपूर्ण! सणासुदीची म्हटल्यावर रेशिपी थोडी हटकेही पाह्यजे ना राव!!

माझ्या मराठी मातीत

लेखक सायकलस्वार यांनी शनिवार, 31/10/2015 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
- या कवितेची प्रेरणा विशाल कुलकर्णी यांच्या 'माझ्या सोलापुरी मातीत' या कवितेवरून मिळाली, त्याबद्दल त्यांचे, आणि त्यांनी ज्यांच्या कवितेवरून प्रेरणा घेतली(!) त्या बोरकरांचेही आभार ;) ******* माझ्या मराठी मातीत पडे छाया आभाळाची दरी-खोर्‍यांतून जाती संथ पावले काळाची माझ्या मराठी मातीत येते गाज सागराची गंध वाहे मोहराचा हवा खारी आगराची माझ्या मराठी मातीत वाहे शांतरस साचा समाधिस्थ आहे तीत कुणी पोर संन्याशाचा माझ्या मराठी मातीत रंग दूर्वांनाही लाल रक्त सांडलेले इथे पावनखिंडीत काल माझ्या मराठी मातीला नाद टाळ-मृदंगाचा देई विश्वाला अवघ्या वर पसायदानाचा